केंद्र सरकारकडून 191 कोटी रुपये मंजूर
kapus Kranti yojana in marathi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कापूस क्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 191 कोटी रुपये मंजूर केला आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे. काय आहे कापूस क्रांती योजना चला आपण पाहू..
देशातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कापूस क्रांती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 191 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. कारण या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे कापूस उत्पादन वाढण्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.
kapus Kranti yojana शेतकऱ्यांना कापूस उत्पादन घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच दर्जेदार कापूस उत्पादन करण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती योजना) सुरू करण्यात येणार आहे. 2026-27 ते 2030- 31 या कालावधीमध्ये 5,659.22 कोटी रुपये या योजनेअंतर्गत खर्च करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील 19 कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अधिक उत्पादन देणारे वाण, हवामान बदलास अनुकूल, कीड प्रतिरोधक बियाणांचा वापर करणे, उच्च घनता लागवड पद्धती, कमी अंतरावर लागवड, एकात्मिक कापूस व्यवस्थापन यासारख्या सुधारित कापूस उत्पादन तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे लक्ष या योजनेअंतर्गत ठेवण्यात आले आहे.
याबरोबरच या योजनेअंतर्गत लांब धाग्याच्या कापसाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच उत्पादनाबरोबरच जिनिंग व प्रक्रिया कारखान्यांच्या आधुनिकरणालाही प्रोत्साहन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
kapus Kranti yojana देशातील कापूस दर्जेदार, टिकाऊ आणि जागतिक स्तरावरील विश्वसनीय उत्पादन म्हणून प्रस्थापित करण्यासाठी ‘कस्तुरी कॉटन भारत’अंतर्गत प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील 14 राज्यांमधील तब्बल 140 जिल्ह्यावर या योजनेअंतर्गत काम केले जाणार आहे. जेणेकरून दर्जेदार आणि उत्तम प्रतीचा कापूस उत्पादन आपल्या देशामध्ये होऊ शकेल.
सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान?
केंद्र सरकारने सुरू केलेल्या कापूस क्रांती योजनेचा महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांना लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत दाट लागवडीमुळे कापसाला अधिक पाण्याची गरज लागेल. त्यासाठी कापूस उत्पादकांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्याचाही सरकारकडून विचार केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.