BSNL 5g sim online order home delivery in minutes information in marathi : घरबसल्या मागवा bsnl चे 5G सिम कार्ड
BSNL ने आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी 5G सिम कार्ड देणार आहे. ग्राहकांना आता 5G सिम ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे.
ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर केवळ 90 मिनिटाच्या आत ग्राहकांच्या घरी बीएसएनएलचे 5G सिम पोहोचवण्याचे काम बीएसएनएल कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना बीएसएनएलच्या योजनेचा मोठा फायदा होणार आहे आणि त्यांचा वेळही वाचणार आहे.
BSNL आपले 5G सिम आपल्या युजरच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजेच आता BSNL युजर्सही 5G सिम ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. हे सिम केवळ 90 मिनिटात युजर्सच्या घरी पोहोचणार आहे.
BSNL 5g sim online order home delivery in minutes भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही भारताची एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल लोकांमध्ये आपले स्वस्त रिचार्ज प्लॅन मुळे खूप लोकप्रिय आहे. मागील काही काळापासून बीएसएनएलचे स्वस्त रिचार्ज प्लॅन मुळे बीएसएनएलचे युजर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला बीएसएनएल कडून आपले नेटवर्क ही वेगाने वाढवले जात आहे. 4G नेटवर्क नंतर बीएसएनएल आता आपले 5 G नेटवर्कवर काम वेगाने करत आहे.
लवकरच सुरू होईल बीएसएनएल 5G
BSNL बीएसएनएल देशांमध्ये आपले 5G नेटवर्क वेगाने वाढवत आहे. मार्च 2025 पर्यंत एक लाख 4G टावर लावले जातील. यामधील 80000 टावर यावर्षीच्या आक्टोंबरपर्यंत लावल्यात येतील. सरकार सध्या असलेल्या 4G इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून 5G नेटवर्कची पण तयारी करत आहे. यामध्ये बीएसएनएल युजर्सला चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
बीएसएनएल 5G सिम करा ऑनलाईन ऑर्डर
BSNL 5g sim online order home delivery in minutes
टेलिकॉम कंपनी एअरटेल कडून यापूर्वीच सिम कार्ड ऑनलाइन डिलिव्हरी सर्विस सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता बीएसएनएल पण 5G कार्ड आपल्या युजर ग्राहकांसाठी घरी पोहोचवणार आहे. म्हणजेच बीएसएनएल युजर्सना आपल्या ग्राहकांना 5G ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे. हे सिम कार्ड ग्राहकांना केवळ 90 मिनिटात आपल्या घरी मिळणार आहे.
- बीएसएनएलचे 5G सिम कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही अधिकृत वेबसाईट https://prune.co.in वर जा.
- Bay Sim card या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या देशाची निवड करा. बीएसएनएलला आपला ऑपरेटर निवडा आणि याबरोबरच तुमचा एफआरसी प्लॅन पण निवडा.
- त्यानंतर मागितलेली सर्व माहिती त्यावर द्या आणि ओटीपीच्या मदतीने व्हेरिफाय करा.
- सिम कार्ड डिलिव्हरीसाठी आपला घरचा पत्ता द्या आणि याबरोबरच बाकी विचारलेली माहिती ही द्या. यानंतर तुमचे बीएसएनएल कार्ड तुमच्या घरी केवळ 90 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे.