Chandraghanta Devi Story In Marathi 2024 : शारदीय नवरात्रीतील देवीचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा
Chandraghanta Devi Story In Marathi : Durgamata नवरात्रात दुर्गा मातेची नऊ रूपात पूजा केली जाते. दुर्गा मातेचे पहिले रूप शैली शैलपुत्री, दुसरे रूप ब्रम्हचारीणी, तिसरे रूप चंद्रघंटा. आज आपण मातेच्या तृतीय रूपाविषयी म्हणजे चंद्रघंटा या रूपात देवीच्या आराधना केल्यामुळे काय होते हे पाहू.
Chandraghanta Devi Story In Marathi या रूपात देवीची आराधना केल्यामुळे आपलं मन निर्मळ होऊन भावनांवर नियंत्रण मिळवता येते. यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते. चंद्रघंटा नावाप्रमाणे शांतचित्त आणि आत्मबळ प्रदान करणारी शक्ती. तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात. चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूल, गदा, धनुष्य बाण, कमळ, तलवार, घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे.
Chandraghanta Devi देवी मातेला चंद्रघंटा असे का म्हणतात तर तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे त्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हणतात. ही देवी वाघावर स्वार होते. या देवीला खिरीचा नैवेद्य आवडतो. दुर्गा मातेचे हे तिसरे रूप शांती देणारे आणि कल्याणकारी रूप आहे. देवीच्या कृपेमुळे भक्तांना अनेक अमूल्य वस्तू मिळतात अनेक पवित्र दोन्ही ऐकू येतात असं सांगितलं जातं.
चंद्रघंटा देवीचे स्वरूप
Chandraghanta Devi Story In Marathi
Durgamata चंद्रघंटा देवीच्या दर्शनाने सर्व देवता आणि भक्तगण आनंदित झाले होते. त्या आनंदाच्या उत्सवात त्यांनी श्रीदेवी मातेला अनेक अलंकारांनी सजवून श्रृंगार साज शृंगारित केले होते. नानाविध सुवर्णा अलंकाराने आणि गळ्यातील चंद्राहराने देवी मातेचा कंठ अगदी फुलून गेलेला असतो. देवीचे पूर्ण शरीर सुवर्ण रंगात असून ती ही देवी दशभूज आहे. म्हणजेच हिला 10 हात आहेत. या दहाही हाताने शस्त्राने आणि विविध अलंकारांनी सुशोभित केलेली देवी आपल्याला पाहायला मिळते. दशभूजा हे दशदिशांचे प्रतीक आहे. देवी आपल्या हातातील घंटा नादाने सर्वांना भयमुक्त करून निर्भर बनवते.
चंद्रघंटा देवीला नैवेद्य
Chandraghanta Devi Story In Marathi
Durgamata चंद्रघंटा देवीला खीर अर्पण करावी. त्यासोबतच लवंग, वेलची, पंचमेवा आणि दुधापासून बनवलेल्या इतर मिठाईचा वापर देखील करू शकता.
श्री रेणुकामाता प्रार्थना मराठी
नवरात्रीची संपूर्ण मराठी माहिती 2024
देवीची महाराष्ट्रातील 9 प्रसिद्ध मंदिरे
देवी आईची नऊ रुपं, रंग, फूल आणि नैवेद्याबद्दल जाणून घेऊ!