Farmer Digital ID Information In Marathi : फार्मर डिजिटल आयडी ची संपूर्ण माहिती
Farmer Digital ID नमस्कार वाचकहो, फार्मर डिजिटल आयडी नक्की काय आहे? कसा वापरायचा? कुठे वापरायचा? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. 60% पेक्षा अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. शेतकऱ्यांसाठी सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकार शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी सतत प्रज्ञाशील असते. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीएम किसान योजना सह इतर अनेक योजनांचा फायदा देण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षात राबवण्यात आली आहे.
Farmer Digital ID मोदी सरकार नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन येत आहेत. देशातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक आयडी दिला जाईल. त्यावर 12 अंकी नंबर असेल आणि ते कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचे ओळखपत्र असेल. शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे.
Farmer Digital Identity Card नक्की काय आहे फार्मर डिजिटल कार्ड चा फायदा? फार्मर डिजिटल कार्ड साठी कुठे करावी लागेल नोंदणी? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.
ठळक मुद्दे
फार्मर डिजिटल आयडी ची संपूर्ण माहिती
Farmer Digital ID Information In Marathi
शेतकरी डिजिटल आयडी काय आहे
What Is Farmer Digital ID
हे डिजिटल आयडी कसे काम करेल
फार्मर डिजिटल आयडी कार्ड देण्यामुळे काय होईल
Farmer Digital ID In Marathi
11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार हे डिजिटल कार्ड
कशी कराल नोंदणी
How to Apply For Farmer Digital ID
शेतकरी डिजिटल आयडी काय आहे
What Is Farmer Digital ID
Farmer Digital ID शेतकरी डिजिटल आयडी हा एक 12 अंकी नंबर असलेले ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येईल. हा 12 अंकी नंबर शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरण्यात येईल. जसा आपला आधार कार्ड असतो त्याचप्रमाणे हे डिजिटल आयडी असेल. शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे डिजिटल आयडी उपयोगी पडेल. लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येईल. शेतकरी योजना अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे शेतकरी डिजिटल आयडी कार्ड महत्त्वाचे ठरेल.
हे डिजिटल आयडी कसे काम करेल
Farmer Digital Identity Card शेतकऱ्यांना अनेक योजनांचा फायदा एका आयडी कार्ड च्या माध्यमातून घेण्यात येईल. पीएम किसान योजना, पिक विमा योजना, माती परीक्षण, माती आरोग्य कार्ड यासारख्या अनेक योजनांचा फायदा या फार्मर डिजिटल आयडी कार्ड च्या माध्यमातून घेता येईल.
एका आयडी कार्ड मार्फत शेतकरी सहजपणे योजनांचा लाभ घेऊ शकतील. प्रत्येक शेतकऱ्याचा एक डिजिटल डेटा तयार होईल. त्या शेतकऱ्याने वर्षभरात घेतलेल्या योजनांचा फायदा, त्याला देण्यात आलेले अनुदान आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर सरकारकडे उपलब्ध होईल. शेतकऱ्याला कृषी कर्ज योजना आणि आर्थिक मदतीविषयीच्या सर्व योजनांचा फायदा या कार्ड द्वारे घेता येणार आहे. यामुळे देशभरात एकूण किती शेतकरी काम करतात हे याचा आकडा सरकारकडे उपलब्ध होईल त्यावरून योजना राबवण्यासाठी सरकारकडे मोठा डेटा उपलब्ध होईल. त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्या जवळ किती जमीन आहे हे देखील लक्षात येईल आणि अल्पभूधारक, बागायतदार, बागायती क्षेत्र, जिरायती क्षेत्र याची आकडेवारी देखील समोर येईल.
फार्मर डिजिटल आयडी कार्ड देण्यामुळे काय होईल
Farmer Digital ID In Marathi
Farmer ID Card भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. पीएम किसान योजना, पीएम पीक विमा योजना इत्यादी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी डिजिटल ओळख कार्ड उपयोगी येईल. पात्र लाभार्थ्याकडे योजनेची मदत पोहोचवण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरेल. या कार्डमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. त्याला युनिक आयडी कार्डद्वारे सेवा आणि आर्थिक मदत देण्यात येईल.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध नाही. जिल्हा सहकारी बँक, सरकारी बँका, विविध एजन्सी यांच्यामार्फत काही योजना राबवण्यात येतात. कृषी खात्यासह इतर काही खात्यांमध्ये मदत पोहोचवण्यात येते. हे सर्व एकत्र आणण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे आहे.
Farmer Digital Identity Card सर्व राज्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी त्यांची स्थिती, त्यांच्याकडील शेत जमीन, क्षेत्र, शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान, शेतकऱ्यांना मिळालेला लाभ, शेतकऱ्यांना मिळालेला सवलती, योजनेअंतर्गत मिळालेली सबसिडी, त्यांच्या खतांचा वापर, जमिनीचा पोत, विविध फळ वर्गीय पिके, पारंपारिक पिके, रोग अळीचा प्रादुर्भाव, कृषी विद्यापीठांचा कारभार, तज्ज्ञांचा कृषीक्षेत्राला होणारा फायदा, कृषी अधिकाऱ्यांच्या कृषी विभागासाठी होणारा फायदा, कृषी विभाग योजना राबवण्यासाठी हवामान बदला आधारे शेतीत बदल सुचविण्यासाठी आणि इतर अनेक कामासाठी फार्मर डिजिटल आयडी चा उपयोग होणार आहे.
Farmer ID Card या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटवणे सोपे जाईल. जमिनीचे रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होतील. सरकारकडे यामुळे मोठा डेटा उपलब्ध होईल. एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती पाहता येईल.
देशात कृषी योजनांचा अनेक लाभार्थी फायदा घेतात. कृषी खात्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्यासाठी विविध योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. या कार्डमुळे पारदर्शकता वाढेल.
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योजना राबवते, परंतु नेमके त्याचे किती लाभार्थी आहेत? त्यासाठी कोणत्या बँकेकडून मदत होते? कृषी क्षेत्राची अशी माहिती एकाच ठिकाणी नाही. आकडेवारीतील हा घोळ संपवण्यासाठी आणि प्रत्येक योजनेचे लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी या कार्डचा उपलब्ध होणार आहे.
11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार हे डिजिटल कार्ड
देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांपैकी 6 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष 2024-25, 3 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष 25-26 आणि 2 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये हे डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाने या विषयीचा पत्र व्यवहार केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार आणि कृषी खात्यांना याविषयीचे पत्र देखील दिले आहे.
कशी कराल नोंदणी
How to Apply For Farmer Digital ID
कृषी मंत्रालय आणि फार्मर डिजिटल आयडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक शिबीर आयोजित करण्यात येईल. प्रत्येक भागात शिबिर आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या कार्डचे वाटप होणार आहे.