Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 लाख रुपये, कर्जदार शेतकऱ्यांची यादी बँकेकडून अपलोड!
Farmer Loan Waiver : महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली 2 लाख रुपये पर्यतची कर्जमाफीची प्रक्रिया टप्याटप्याने पूर्ण होताना दिसत आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील एक-एक टप्पा पूर्ण केला जात आहे.
मात्र सरकारने दिलेला शब्द सरकार कधी पाळणार असा सवाल शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. कर्जमाफीची तारीख पे तारीख अशी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि दोन लाखावरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न कायम आहे.
त्याबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पाहता सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोनदा तारखा देण्यात आल्या. मात्र त्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही. यापूर्वी 30 जून पूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असा शब्द सरकारकडून देण्यात आला होता.
सरकारही त्यावर ठाम होते मात्र ही तारीख हुकली आणि नवीन मुहूर्त म्हणजे 5 जुलै ही तारीख देण्यात आली. मात्र या तारखेलाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेले नाही आणि सरकारकडून पुढची तारीख काही देण्यात आलेली नाही. लवकरात लवकर जमा करू असे शासकीय पातळीवर सांगितले जात आहे.
आयकर भरणारे शेतकरी शोधण्याचे असल्याचे सांगून कर्जमाफी पुढे ढकलण्यात आली आहे. आता शेतकरी कर्जमाफीची नवीन तारीख काय असेल याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
मात्र दुसऱ्या बाजूला बँक कडून कर्जदार थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. मात्र सरकार कर्जमाफी कधी करणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.
2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी?
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार कर्जदारांची 2 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याची सरकारने घोषणा केली.
पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले. यासाठी 36 हजार 585 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला.
या योजनेअंतर्गत पात्र कर्जादार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर काही शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येणार आहे. मात्र ती कधी मिळते ही प्रतीक्षा अजूनही कायम आहे.
थकीत कर्जदार शेतकऱ्यांची याद्या अपलोड!
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 काळात अल्पमुदत पीक कर्ज प्राप्त आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. यामध्ये-
राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था, सोसायटी, आदी बँकांनी थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. आता संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण होत आली आहे मात्र सरकारने आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे मिळवण्यासाठी पुन्हा कर्जमाफी लांबवली आहे.
सरकारने लवकरच यात प्रक्रिया केली तर पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम याची शक्यता वर्तवली जात आहे. 2 लाख रुपये पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खातात वर्ग केली जाऊ शकते. त्यांचे कर्ज खाते, बे-बाकी निरंकार होईल. त्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्यासाठी संबंधित बँकेमध्ये अर्ज करता येईल.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी?
Farmer Loan Waiver Scheme 2026 शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांकडून सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. यापूर्वी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त हुकला आहे.
आता कधी मुहूर्त साधला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. कर्जमाफीच्या प्रस्तावावर राज्यपालांची सही अद्याप बाकी आहे. मात्र सरकारने अजून कर्जमाफीची तारीख जाहीर केली नाही. ती तारीख जाहीर झाल्यावर त्या तारखेला सरकार कर्जमाफी करणार का? असा प्रश्न अजून निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातबारा कोरा कधी ?
Farmer Loan Waiver Scheme 2026 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात हिवाळी अधिवेशनामध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची टीका विरोधी पक्षासह शेतकरी करत आहेत. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार आहे, करणार की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.