Government Scheme For Farmers In Marathi : सरकारने सुरू केली शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक नवी योजना

Government Scheme For Farmers In Marathi : शेतकऱ्यांना होणार 30,000 रुपयांची मदत

Government Scheme For Farmers In Marathi : सरकार शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजनाची अंमलबजावणी करत असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

Government Scheme For Farmers In Marathi : यादरम्यान पूरग्रस्तांसाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 30000 रुपयांची आर्थिक मदत सरकार शेतकऱ्यांना करणार आहे.

Government Scheme For Farmers सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात, शेतात, गोठ्यात पाणी सासले. यामुळे अनेकांचे संसार पाण्यात बुडाले.

Government Scheme For Farmers या दरम्यान आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली कोणती ही नवीन योजना हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून बघू

सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना

Government Scheme

पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरींसाठी सरकारची नवी योजना जाहीर केली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत सरकार या योजनेच्या माध्यमातून करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सात दिवसात तांत्रिक अधिकाऱ्यांना विहिरीच्या स्थळ पहाणीचे आदेश दिले आहेत.

कोणाला मिळणार किती मदत

Government Scheme For Farmers

सिंचन विहिरीसाठी 30000 रुपयांची मदत सरकार देणार आहे. आगाऊ स्वरूपात 15000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान काम पूर्ण झाल्यावर उरलेला निधी मिळणार आहे पंचनामे झालेल्या विहिरींच्या शेतकऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

अर्ज सोबत शेतकऱ्यांनी विहिरीची सातबारा जोडणे आवश्यक आहे. विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधितांकडून हमीपत्र घेण्यात यावे. विहिरीचे काम झाल्यानंतर त्याचे मोजमाप घेतले जाईल. काम पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतर उर्वरित 15000 रुपयांचा निधी दिला जाईल.

आधी विहीर दुरुस्ती, नंतर फोटो अपलोड

Government Scheme For Farmers Will Get 30000 rs

या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी या आर्थिक वर्षात खर्च केला जावा. निधी शिल्लक राहिल्यास तो सरकारला परत करावा. दुरुस्त विहिरीचे जिओ टॅगिंग करण्यात यावे. विहीर दुरुस्ती होण्याआधी आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर फोटो काढण्यात यावे असे सरकारने आदेश दिले आहेत.