Holi 2025 Information In Marathi : जाणून घेऊ होळीच्या विविध पद्धती, तसेच होळीची कथा
Holi 2025 In Marathi : मराठी वर्षाप्रमाणे होळी हा सण वर्षाचा शेवटचा सण आहे. संपूर्ण भारतात होळी ह्या सण अती उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे होळी सण साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत.
Holi 2025 होळी हा सण मराठी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच फाल्गुन महिन्यात येतो. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा पाच दिवसांचा सण असतो. आधुनिक काळात होळी आणि धुलीवंदन याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
2025 मध्ये होळी आणि धुलीवंदन कधी आहे? होळी सण साजरा का केला जातो? याच्या विविध पद्धती कोणत्या? याची सविस्तर माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Holi 2025 ओरिसा प्रांतात होळी पेटवण्याची प्रथा नाहीये. तिथे केवळ कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते. तसेच घरोघरी पूजा केली जाते. महाराष्ट्रातील मुंबई, कोकण तसेच गोवा प्रांतात होळी हा सण शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो, घरोघरी होळीचा सण उत्साहाने साजरा करतात. होळीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी केली जाते. आणि होळीला नैवेद्य दाखवला जातो. गुजरात, राजस्थान या भागातही होळी सण साजरा केला जातो आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
होळी पूजनाची पद्धत
होळी हा मराठी वर्षातील फाल्गुन महिन्यातील शेवटचा सण आहे. धुलीवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्त्व आहे. होळीला अग्निपेटविला जातो तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापवण्याची प्रथा होती. फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी “ढुंढा राक्षसीनेच्या पीडेचा परिहार व्हावा, म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो” असा संकल्प करावा. नंतर होलिकेची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या आणि होळी पेटवावी.
होळीचे मुहूर्त
Holi 2025 Date And Time
गुरुवार 13 मार्च 2025 रोजी होळी आहे. 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे, तर शुक्रवार 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटापर्यंत पोर्णिमा आहे.
होळीची कथा
Holi 2025 भक्त प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशीपुची बहीण ढुंढा हिलाच होलिका म्हणतात. हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला. मात्र भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर राक्षसीन मात्र जळून खाक झाली. त्या प्रित्यर्थ हा होलीकादहन विधी करण्याची प्रथा पडली.