Indian Tourists Visa-Free Travel 2024 Update : भारतीय पर्यटकांना मिळणार या देशात व्हिसा शिवाय प्रवेश
Indian Tourists Visa-Free Travel सर्वांनाच भारतात फिरायला तर आवडतेच, पण त्याबरोबर परदेशात देखील फिरायला आवडते. परदेशात सहलीसाठी जायचं म्हणलं की पैशाचे नियोजन करावे लागते. आपल्या बजेट मधील ट्रिप, चांगल्या विमान कंपनीचे स्वस्त तिकीट, व्हिसा चा खर्च, चांगली हॉटेल अशा सगळ्यांची व्यवस्थित नियोजन करावे लागते. पण जर तुम्हाला सांगितले की, तुम्ही व्हिसा शिवाय परदेशात प्रवेश करू शकता, फिरू शकता तर यापेक्षा वेगळा आनंद तुम्हाला होणार नाही. पण जगात असे काही देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही, तर असे देश कोणते हे आपण आज जाणून घेऊ. Indian Tourists Visa-Free Travel
Indian Tourists Visa Free Travel जगात असे 26 देश आहेत, जिथे भारतीय नागरिकांना व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही, परंतु त्या प्रत्येक देशातील वेळेची कालमर्यादा ही वेगवेगळी असू शकते.

30 दिवसापर्यंत विना व्हिसा प्रवेश असणारे देश कोणते
Indian Tourists Visa Free Travel जर तुम्ही थायलंडला प्रवास करणार असाल तर तुम्हाला तर तुम्ही 30 दिवसापर्यंत व्हिसा शिवाय प्रवास करू शकता.
तुम्ही मलेशियात प्रवास करणार असाल तर 30 दिवसांपर्यंत तुम्हाला विना व्हिसा प्रवास करता येतो.
अंगोला मध्ये देखील व्हिसा शिवाय तुम्हाला 30 दिवसांपर्यंत फिरता येऊ शकते.
मकाऊ मध्ये तुम्हाला व्हिसा शिवाय 30 दिवसापर्यंत प्रवेश मिळतो.
मायक्रोनेशियामध्ये देखील 30 दिवसापर्यंत विना व्हिसा प्रवास करता येतो.
त्याचबरोबर वानूआटू मध्ये सुद्धा 30 दिवसापर्यंत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला व्हिसा ची आवश्यकता नाही.
90 दिवसापर्यंत विना व्हिसा प्रवेश असणारे देश कोणते
मॉरिशसला तुम्हाला विना व्हिसा 90 दिवसा पर्यंत प्रवास करता येतो.
केनिया मध्ये देखील तुम्हाला विना व्हिसा 90 दिवसापर्यंत प्रवास करण्याची सुविधा आहे.
बारबोडास मध्ये भारतीय पर्यटक 90 दिवसापर्यंत व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात.
तर गाम्बीया मध्ये देखील ही सुविधा उपलब्ध आहे.
त्याच बरोबर किरीबाती, ग्रेनेडा, हैटी, त्रिनिदाद आणि टोबैगो, सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडाइन्स, सेंट किट्स आणि नेव्हीस तसेच सेनेगल मध्ये तुम्ही 90 दिवसापर्यंत विना व्हिसा प्रवास करू शकता.
भूतान मध्ये 14 दिवसांपर्यंत तुम्हाला विना व्हिसा प्रवास करता येतो.
कझाकिस्तान मध्ये 14 दिवस तुम्ही विना व्हिसा प्रवास करून शकता.
फिजीमध्ये 120 दिवसापर्यंत विना व्हिसा प्रवास करता येतो.
डॉमनिका मध्ये तुम्हाला 180 दिवस म्हणजेच सहा महिन्यापर्यंत विना व्हिसा प्रवास करता येतो.
तर इराण मध्ये 4 फेब्रुवारी 2024 नंतर व्हिसा ची आवश्यकता नाही.