Indira Gandhi National widow Pension Scheme Information In Marathi : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना 2024 मराठी माहिती
Indira Gandhi National widow Pension Scheme 2024 : सरकार देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आज आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत. ही आजची योजना विधवा महिलांसाठी आहे. राज्यातील विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना.
राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी सरकार विविध योजना सुरू करते. त्या पैकीच एक इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना सरकारने सुरू केली आहे.
Indira Gandhi National Widow Pension Scheme घरातील कर्त्या पुरुषांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आर्थिक संकट येते. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्यातील विधवा महिलांचा विचार करून केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे.
Indira Gandhi National Widow Pension Scheme इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा लाभ हा 40 वर्ष ते 65 वर्षातील महिलांना विधवा महिलांना होणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना 200 रुपये प्रतिमहा तर राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 400 रुपये प्रतिमहा असे एकूण 600 रुपये प्रतिमहा आर्थिक मदत मिळणार आहे.
ठळक मुद्दे
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना 2024 मराठी माहिती
Indira Gandhi National widow Pension Scheme Information In Marathi
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची थोडक्यात माहिती
Indira Gandhi Vidhwa Pension Yojana In Short
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची उद्दिष्ट
Indira Gandhi National Widow Pension Scheme Purpose
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये
Features of Indira Gandhi National Widow Pension Scheme
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचे फायदे
Benefits of Indira Gandhi National Widow Pension Scheme
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची पात्रता
Indira Gandhi National Widow Pension Scheme Eligibility
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची कागदपत्रे
Indira Gandhi National Widow Pension Scheme Documents
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची अर्ज प्रक्रिया
Indira Gandhi National Widow Pension Scheme Apply Online
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची थोडक्यात माहिती
Indira Gandhi Vidhwa Pension Yojana In Short
योजनेचे नाव | इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील विधवा महिला |
लाभ | 600 रुपये दरमहा आर्थिक मदत |
उद्देश | विधवा महिलांना आर्थिक मदत करणे |
वयोमर्यादा | 40 ते 65 वर्ष |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
पोर्टल | https://services.india.gov.in/ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची उद्दिष्ट
Indira Gandhi National Widow Pension Scheme Purpose
- राज्यातील विधवा महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील आर्थिक स्थिती सुधारणे.
- राज्यातील विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये
Features of Indira Gandhi National Widow Pension Scheme
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेअंतर्गत Vidhwa Pension Yojana दिली जाणारी लाभाची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा निवृत्ती वेतन सुरू होईल. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजांसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचे फायदे
Benefits of Indira Gandhi National Widow Pension Scheme
- Vidhwa Pension Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलांना सरकारमार्फत 600 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे.
- Vidhwa Pension Yojana या योजनेमुळे विधवा महिलांना कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
- Vidhwa Pension Yojana या योजनेमुळे विधवा महिला त्यांच्या दैनंदिन गरजा सहजपणे पूर्ण करू शकतील.
- Vidhwa Pension Yojana या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब विधवा महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची पात्रता
Indira Gandhi National Widow Pension Scheme Eligibility
- अर्जदार महाराष्ट्र ची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ विधवा महिलांनाच होणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 40 ते 65 वर्षादरम्यान असावे.
- 65 वर्षांवरील महिलांना इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची कागदपत्रे
Indira Gandhi National Widow Pension Scheme Documents
अर्जदाराचे आधार कार्ड
रेशन कार्ड
विहित नमुन्यातील अर्ज
पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
जातीचे प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
बीपीएल कार्ड
शपथ पत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेची अर्ज प्रक्रिया
Indira Gandhi National Widow Pension Scheme Apply Online
इंदिरा गांधी विधवापेन्शन योजना ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. त्यासाठी अर्जदार महिलेला जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / संजय गांधी योजना तलाठी कार्यालय या ठिकाणी जावे लागेल. त्यांच्याकडून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज परत करावा लागेल. त्यानंतर अर्जदार पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर केली जाईल.
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहे वयोमर्यादा?
उत्तर: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विधवा महिलेचे वय हे 40 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
प्रश्न: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
प्रश्न: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेअंतर्गत किती मिळतो लाभ?
उत्तर: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 200 रुपये दरमहा तर राज्य सरकारकडून 400 रुपये दरमहा असे एकूण 600 रुपये दरमहा आर्थिक मदत मिळते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA