Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • Webstories
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
PM Jan Dhan Yojana zero balance bank account with 10000 overdraft facility

Jan Dhan Yojana 10000 Overdraft Facility in marathi : खात्यात पैसे नसले तरी काढता येणार 10 हजार रुपये

18 November 2026 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • PM Jan Dhan Yojana : केंद्र सरकारची अशी कुठली योजना आहे चला जाणून घेऊ
  • जनधन खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • पत्त्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
  • जनधन खाते कोणाला उघडता येते?
  • जनधन खात्यात किती रक्कम ठेवावी लागते?
  • जनधन खात्यावर मिळते व्याज?

PM Jan Dhan Yojana : केंद्र सरकारची अशी कुठली योजना आहे चला जाणून घेऊ

Jan Dhan Yojana 10000 Overdraft Facility in marathi : केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांना बँक खात्याशी जोडण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना केवळ बँक खातेच उघडण्याची सुविधा मिळते असे नाही तर या योजनेच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारचे फायदे देण्यात येतात. पैसे नसतानाही तुम्हाला 10 हजार रुपये काढता येऊ शकतात ते कसे चला जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्म मध्ये देशातील नागरिकांना बँकिंग सुविधाची जोडण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली. यामुळे देशभरातील नागरिक थेट बँकेची जोडले गेले, ज्या व्यक्तींची आजपर्यंत बँक मध्ये खाती नव्हती अशा व्यक्तींची झिरो डिपॉझिट वर खाते उघडण्यात आली. त्यामुळे ही व्यक्ती बँकेची थेट जोडली गेली. आणि सरकारलाही अशा व्यक्तींना सरकारी मदत करताना फायदा झाला. त्यामुळे ही योजना खूप लोकप्रिय आहे आणि या योजनेअंतर्गत अनेक सुविधा आणि लाभ देण्यात येतात.

या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट म्हणजेच बँकेकडून खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची मिळणारी सुविधा आहे म्हणजे कसे तर तुमच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम नसली तरी बँकेने मंजूर केलेल्या मर्यादेपर्यंत तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला त्याच्या खात्यामधून 10 हजार रुपये पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात शून्य रक्कम असतानाही तुम्ही म्हणजेच पात्र व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊन 10 हजार रुपयापर्यंतची रक्कम काढू शकतो.
जनधन खाते तुम्ही सहा महिने किंवा वर्षभर सुरळीत पद्धतीने चालवले तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट ही सुविधा देण्यात येते.

सुरळीत चालवणे म्हणजे काय तर खाते उघडल्यानंतर व्यवहार योग्य पद्धतीने सहा महिने सुरू ठेवावा अशी पात्रता या सुविधेसाठी ठेवण्यात आली आहे. मात्र केवळ सहा महिने खात सुरू ठेवणे पुरेसे नाही तर जनधन खात्याअंतर्गत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पात्रतेची निकष तुम्ही पूर्ण करणे गरजेचे आहेत.

जनधन खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

तुम्हालाही जनधन खाते उघडायचे असेल तर  तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय ओळखपत्र म्हणून मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड यापैकी एक कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

पत्त्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

तुम्हाला जनधन खाते उघडायचे आहे तर तुमचा कायमस्वरूपी पत्त्यासाठी पुरावा देणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये तुम्ही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, टेलिफोन बिल, लाईट बिल, पाणीपट्टीचे बिल इत्यादी पैकी एक कुठले डॉक्युमेंट देऊन शकता. याबरोबरच तुमचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो आणि अचूक माहिती भरलेले स्वाक्षरी केलेला जनधन खाते उघडण्याचा अर्ज लागेल.

जनधन खाते कोणाला उघडता येते?

केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला खाते उघडता येते. विशेष बाब म्हणजे यापूर्वी यांचे बँक खाते नाही अशी व्यक्ती ही जनधन योजनेअंतर्गत आपले बँक खाते उघडू शकते अशा व्यक्तींसाठी बेसिक सेविंग अकाउंट उघडण्याची सुविधा जनधन योजनेअंतर्गत देण्यात आली आहे.

जनधन खात्यात किती रक्कम ठेवावी लागते?

प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची कुठलीही अट नाही. इच्छुक असणारा प्रत्येक व्यक्ती जवळच्या बँक शाखेत जाऊन आपले खाते उघडू शकतो. यासाठी आवश्यक असलेली केवायसी- कागदपत्राचा अर्ज सादर करू शकतो. बँकेकडून कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर खाते सुरू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत जॉईड खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र जनधन खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक ठेवावी किंवा किती रक्कम ठेवावी लागते यासंदर्भात कुठलीही अट नाही. तुम्ही कितीही रक्कम ठेवू शकता किंवा नाही ठेवली तरी चालते.

जनधन खात्यावर मिळते व्याज?

Jan Dhan Yojana 10000 Overdraft Facility in marathi पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत खाते उघडणाऱ्या व्यक्तींना बचत खात्याप्रमाणे व्याजदर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर या खात्यामध्ये रक्कम ठेवली असेल तर त्यावर तुम्हाला बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल. याबरोबरच ही खाते विविध सरकारी योजनेच्या लाभासाठी पात्र होतात. यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना आणि मुद्रा योजना आदी योजनाचा लाभ मिळतो.

Balwaan Krishi Battery Sprayer 12 Volts x 8 Ampere (Red) | High Pressure up to 15 feet Spray | Portable Knapsack Sprayer | 18 Litre Tank Capacity

त्यामुळे प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडल्यानंतर तुम्ही बँकेशी जोडला जातात. तुम्हाला बचत खाते उघडून दिले जाते. तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते आणि सरकारच्या विविध योजनेचा लाभ ही घेता येतो. एक खाते आणि अनेक फायदे अशा प्रकारची ही योजना आहे. जर तुम्ही अजूनही जनधन खाते उघडले नसेल तर जवळच्या आपल्या कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही जनधन योजनेअंतर्गत खाते उघडू शकता.

read about : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
ABHA कार्ड म्हणजे काय? 
website : yojanamazi.com

अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.
Views: 17
Categories Daily Updates, केंद्र सरकार योजना Tags Banking Benefits, Central Government Schemes, Financial Inclusion, government schemes, Indian Government Schemes, Jan Dhan Account, Jan Dhan Account Benefits, PM Jan Dhan Yojana, PMJDY, Pradhan Mantri Jan Dhan Yojana, Zero Balance Bank Account, ₹10000 Overdraft Facility
Ladki Bahin Yojana eKYC 2026 : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी!

Recent Post

  • PM Jan Dhan Yojana zero balance bank account with 10000 overdraft facility
    Jan Dhan Yojana 10000 Overdraft Facility in marathi : खात्यात पैसे नसले तरी काढता येणार 10 हजार रुपये18 November 2026
  • Ladki Bahin Yojana eKYC 2026 and 1500 October installment update
    Ladki Bahin Yojana eKYC 2026 : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी!17 November 2026
  • Kisan Vikas Patra Scheme 2026 – Post Office KVP 1 Crore Investment and Money Double
    Kisan Vikas Patra Scheme in marathi : KVP योजनेत गुंतवणूक केलेला पैसा होतो डबल16 November 2026
  • ABHA Card 2026 – Digital Health ID Registration, Benefits and Online Application Process in India
    abha card 2026 benefits, elgibility, how to apply online in marathi : ABHA कार्ड म्हणजे काय? 14 November 2026
  • One Nation One Ration Card Scheme providing ration benefits to migrant workers across India
    One Nation One Ration Card in marathi : वन नेशन, वन रेशन कार्डचा मोठा फायदा!13 November 2026

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2026 yojanamazi.com