Jivhala Yojana Maharashtra 2024 In Marathi : आता कैदयांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजार रुपयांचे कर्ज

Jivhala Yojana Maharashtra 2024 Information In Marathi : जिव्हाळा योजना 2024 मराठी माहिती

Jivhala Yojana Maharashtra 2024 केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करत असतात. राज्यातील अनेक कैदी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे शिक्षा भोगत आहेत.

Jivhala Yojana Maharashtra

Jivhala Yojana Maharashtra यातील बहुतांश कैदी छोट्या-मोठ्या कारणावरून किंवा कौटुंबिक वादातून शिक्षा भोगत आहेत. अशी शिक्षा भोगत असलेला कैदी हा कुटुंबातील कमवता व्यक्ती असल्यामुळे तो कारागृहात गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या दैनंदिन गरजा तसेच विविध अडचणी चा सामना या कुटुंबाला करावा लागतो.

Jivhala Yojana Maharashtra 2024 यासोबतच या कैद्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, औषध उपचार खर्च व इतर गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ या कुटुंबावर येते. त्यामुळे असे कुटुंब घरातील वस्तू गहाण टाकून किंवा खाजगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेते.

Jivhala Yojana Maharashtra मात्र हे सावकाराचे कर्ज वेळेवर भरत ना आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने शिक्षा ओळखत असलेल्या अशा कैद्यांच्या सर्व समस्यांचा विचार करत 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रात जिव्हाळा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील अशा कैदीच्या कुटुंबातील असलेल्या समस्या सोडवण्यात मोठी मदत होत आहे.

Jivhala Yojana Maharashtra राज्यातील तुरुंगात कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना कमी व्याजदरामध्ये म्हणजेच 7 टक्के व्याजाने 50 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Jivhala Yojana Maharashtra या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात येते. या रकमेतून अशी कुटुंबे आपल्या जीवनातील दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते. जेणेकरून त्यांना दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तसेच खाजगी सावकाराकडूनही जमीन गहाण किंवा घर गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

ठळक मुद्दे

जिव्हाळा योजना 2024 मराठी माहिती

Jivhala Yojana Maharashtra 2024 Information In Marathi

जिव्हाळा योजनेची थोडक्यात माहिती

Jivhala Yojana Maharashtra In Short

जिव्हाळा योजनेची उद्दिष्ट

Jivhala Yojana Maharashtra Purpose

जिव्हाळा योजनेची वैशिष्ट्ये

Jivhala Yojana Maharashtra Features

जिव्हाळा योजनेचे लाभार्थी

Jivhala Yojana Benefisiors

जिव्हाळा योजनेसाठीची पात्रता

Jivhala Yojana Maharashtra Eligibility

जिव्हाळा योजनेसाठीची कागदपत्रे

Jivhala Yojana Documents

अर्ज रद्द होण्याची कारणे

Jivhala Yojana Maharashtra 2024

जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

Jivhala Yojana Maharashtra Apply

जिव्हाळा योजनेच्या महत्त्वाच्या गोष्टी

Jivhala Yojana 2024

जिव्हाळा योजनेची थोडक्यात माहिती

Jivhala Yojana Maharashtra In Short

योजनेचे नावजिव्हाळा योजना
विभागसामाजिक कल्याण विभाग
कधी सुरू झाली1 मे 2022
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीशिक्षा भोगत असलेले कैद्यांचे कुटुंब
अर्ज प्रक्रियाऑफलाइन

जिव्हाळा योजनेची उद्दिष्ट

Jivhala Yojana Maharashtra Purpose

आजही राज्यातील अनेक कैदी छोट्या-मोठ्या कारणावरून दीर्घकाळासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असतात. त्यामुळे कुटुंबातील कमवता सदस्य अचानक कारागृहात गेल्यामुळे कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे ही कठीण होऊन जाते. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी, घरातील वृद्धांच्या आजारपणासाठी, औषध उपचारासाठी त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अशी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत नाही.

जिव्हाळा योजनेची वैशिष्ट्ये

Jivhala Yojana Maharashtra Features

राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या कैद्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे

या योजनेमध्ये कुठल्याही जाती धर्माची अट घालण्यात आलेली नाही सर्व कैदयांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिला जातो

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे

जिव्हाळा योजनेतून सोप्या पद्धतीने 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते

या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत सोपी ठेवण्यात आली आहे.

अर्जदाराने अर्ज केल्यानंतर कर्जाची रक्कम थेट त्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते

जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून कर्ज परतफेड रकमेवरील 12% निधी कैद्यांच्या कल्याण निधीसाठी देण्यात येतो.

जिव्हाळा योजनेचे लाभार्थी

Jivhala Yojana Benefisiors

राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे जिव्हाळा योजने चे लाभार्थी आहेत

जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना 50 हजार रुपयांचे कर्ज 7 टक्के व्याजदराने दिले देते

या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जाचा परतफेड चा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही

जिव्हाळा योजनेसाठीची पात्रता

Jivhala Yojana Maharashtra Eligibility

राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कैदी

तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे

केवळ महाराष्ट्रातील कैद्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो

दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो

जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून कैदीच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेड ची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची नाही

कैद्याच्या शिक्षेचा कालावधी त्याचे कारागृहातील उत्पन्न सर्व बघूनच या योजनेचा लाभ त्या कैद्याला दिला जातो

अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्ज अधिकार्‍याकडे तपासण्यासाठी पाठवला जातो अधिकारी योजनेतील माहिती व कागदपत्रे तपासणी करतात. शिक्षा भोगत असल्या गरजेचे उत्पन्न व त्याचे शिक्षेचा कालावधी पाहून या योजनेचा लाभ दिला जातो.

Jivhala Yojana Maharashtra

जिव्हाळा योजनेसाठीची कागदपत्रे

Jivhala Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

ईमेल आयडी

मोबाईल नंबर

फोटो

शपथपत्र

बँक खात्याचा तपशील

अर्ज रद्द होण्याची कारणे

Jivhala Yojana Maharashtra 2024

  • शिक्षा भोगत असलेला कैदी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शिक्षणाचा कालावधी कमी असल्यास रद्द करण्यात येतो.
  • कैदयाला मिळणारे मानधन कमी असल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जदार खोटी माहिती दिल्यासही अर्ज रद्द करण्यात येतो.
Jivhala Yojana Maharashtra

जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

Jivhala Yojana Maharashtra Apply

जिव्हाळा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम कुटुंबातील सदस्य शिक्षा भोगत असलेल्या कारागृहात जावे लागेल. कारागृहातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर संबंधित अर्ज कारागृहातील अधिकाऱ्यांना कडे जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुमची जिव्हाळ योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

जिव्हाळा योजनेच्या महत्त्वाच्या गोष्टी

Jivhala Yojana 2024

महाराष्ट्र सरकारने जिव्हाळा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील निवडक तुरुंगामध्येच ही योजना राबवली जाते. सध्या ती पायलट टप्प्यात राबवली जात आहे. या योजनेचा प्रतिसाद बघून हळूहळू राज्यातील सर्व तुरुंगामध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना