Katyayani Devi Information In Marathi 2024 : दुर्गामातेचे सहावे रूप कात्यायनी देवी मराठी माहिती
Katyayani Devi Information In Marathi 2024 : नमस्कार आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण नवदुर्गेचे सहावे रूप पाहणार आहोत. आपण रोज नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या दुर्गेचे महत्त्व दुर्गेचे रूप पाहत आहोत. आजचा दिवस आहे सहावा म्हणजेच आजचे नऊ दुर्गेचे सहावे रूप हे कत्त्यायनीदेवी आहे. दुर्गा देवीची कत्त्यायनीदेवीचीसर्व माहिती, देवीची महत्त्व या देवीची पूजा विधी याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
कात्यायनी देवीची कथा
Navratri Sixth Day Katyayani Devi Puja Vidhi And Katha
Navratri 2024 दुर्गा देवीच्या सहाव्या रूपाला कत्त्यायनीअसे का म्हटले जाते. तर ऋषि कात्यायन यांच्या घरी देवी प्रगट झाल्यामुळे या देवीला कत्त्यायनीदेवी या नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कत्त्यायनीदेवीच्या पूजनाने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा आहे. कत्त्यायनीदेवीचे स्वरूप हे चतुर्भुज आहे देवीला चार भुजा आहेत. देवीच्या एका हातात खडगं आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रुपी आहेत. कत्त्यायनीदेवीचे स्वरूप दयाळू आहे. कत्त्यायनीदेवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. दुर्गेचे हे सहावे रूप आहे. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी कत्त्यायनीदेवीची पूजा, उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होते. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो.
Navratri 2024 दुर्गेचे नाव कत्त्यायनीअसे का पडले, तर कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते, त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला, या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्या यांचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली होती. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्या ऋषींची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. त्यानंतर काही काळ उलटल्यावर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराचा विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कत्त्यायनीदेवी असे नाव पडले.
अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कत्त्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी का त्यांनी देवीची पुरानात कथा सांगितली आहे.
कत्त्यायनी देवीचे स्वरूप
Katyayani Devi Puja Vidhi
Navratri 2024 कत्त्यायनीफलदायक आहे. कालिंदीच्या यमुनाकिनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रज मंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कत्त्यायनीचे रूप अत्यंत तेज आहे. या देवीला चार भुजा आहेत. कत्त्यायनीदेवीचे वाहन हे सिंह आहे. कत्त्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चारही फळाची प्राप्ती होते. जो व्यक्ती मनापासून कत्त्यायनीमातेची पूजा करतो तो रोगमुक्त होतो, भयमुक्त होतो, संताप पासून मुक्त होतो. या मातेला शरण येऊन तिची उपासना केल्याने सात जन्माचे पाप नष्ट होते.
कत्त्यायनी देवीचे पूजन कसे करावे
दुर्गादेवीच्या पूजनासह कत्त्यायनी देवीचे पूजन करतात. या देवीला गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कत्त्यायनीदेवीला मध खूप प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यात मधाचा समावेश करावा. त्याचबरोबर देवीला मालपुवा चा नैवेद्य देखील प्रिय आहे.
कत्त्यायनी देवीचा मंत्र
कत्त्यायनीदेवीचे पूजन केल्यानंतर खालील मंत्र म्हणावा
कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?
नवरात्रातील 9 रंग कोणते?, आणि काय आहे शुभमुहूर्तची वेळ?