Kurla Bus Accident Update 2024 In Marathi : कुर्ला बस अपघात प्रकरणात फडणवीस करणार 5 लाखांची मदत

Kurla Bus Accident Update 2024 : कुर्ला बस अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडून 5 लाखांची मदत

Kurla Bus Accident Update : मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री कुर्लात हा अपघात घडला. या अपघातात बसने अनेक गाड्यांना धडक दिली. यामध्ये अनेक नागरिक चिरडले गेले आहेत. अवघ्या काही क्षणात झालेल्या ह्या अपघातामुळे खूप नुकसान झाले आहे.

Kurla Bus Accident ही बस वाकदितिकड्या रीतीने चालत होती. बसच्या रूपाने मृत्यू समोर आल्याचे पाहून लोक खूप घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. 100 मीटरच्या परिसरात त्या बसने 30 ते 40 गाड्यांना धडक दिली. या अपघाताच्या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर 49 गंभीर जखमी आहेत. या सर्वांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Kurla Bus Accident कुर्ला पश्चिमेला असलेल्या रोडवर काल सोमवार रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या बस मध्ये साधारण 60 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Kurla Bus Accident देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटर द्वारे केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 6.30 वाजता एक ट्विट करून कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर जखमी असलेल्यांना लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

Kurla Bus Accident Update कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे त्यांनी म्हटले. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्ट च्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.