Kusum Solar Pump Yojana 2024 Information In Marathi : कुसुम सोलार पंप योजना 2024 मराठी माहिती
Kusum Solar Pump Yojana 2024 : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचे 18% योगदान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलीसाठी सरकार अनेक प्रकारच्या योजना पराभूत करत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल आणि आर्थिक मदतही त्यांना मिळेल. अशाच प्रकारची एक योजना म्हणून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सोलर पंप सबसिडी ची सुविधा मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त वीज सुविधा मिळणार आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
Kusum Solar Pump Scheme भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेती हा देशातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जातो. मात्र शेतीसाठी लागणारी वीज भार नियमन आणि रात्र अपरात्री मिळणारी शेतीसाठीची वीज यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागू नये म्हणून आणि त्यांना 24 तास शेतीसाठी वीज उपलब्ध व्हावी यासाठी तसेच त्यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागू नये म्हणून सौर कृषी पंप योजना अंतर्गत त्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे ते त्यांच्या वेळेनुसार दिवसा आपल्या शेतीला पाणी देऊ शकतील आणि त्यांची भारनियमानापासून सुटका होईल. या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना 2024 केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्याचा देशभरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे.
Kusum Solar Pump Scheme देशभरातील शेतकऱ्यांना 24 तास शेतीच्या पंपासाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने कुसुम सौर योजना सुरू केली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना कुसुम सौर पंप मोफत म्हणजेच 5 टक्के किमतीत देण्यात आला होता. या योजनेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता कुसुम सौर पंप योजनेचा दुसरा टप्पा 2024 मध्ये केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेले शेतकरी प्रधानमंत्री कुसुम योजना 2024 Pmkusum साठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला तर मग आज आपण कुसुम सौर पंप योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?, या योजनेसाठी कोण पात्र आहे?, या योजनेचा कसा करावा अर्ज या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
कुसुम सोलार पंप योजना म्हणजे काय
What Is Kusum Solar Pump Yojana
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 केंद्र सरकारच्या कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात 5 लाख पेक्षा अधिक सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या माध्यमातून 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या ठिकाणी विजेची जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप देण्यात येतील. म्हणजेच शेतकऱ्यांना फक्त 5 ते 10 टक्के रक्कम भरून आपल्या शेतात सौर कृषी पंप बसवता येईल.
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 केंद्र सरकारच्या कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषी पंपासाठी करावा. अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेचा Pmkusum लाभ घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांनी कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज करू नये. याबरोबरच अर्जदाराने एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास त्याचे सर्व अर्ज रद्द करण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतो. ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाहीये अशांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाते. कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र 2024-25 खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल या योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्याला प्राधान्य देण्यात येते.
ठळक मुद्दे :
कुसुम सोलार पंप योजना 2024 मराठी माहिती
Kusum Solar Pump Yojana 2024 Information
कुसुम सोलार पंप योजना म्हणजे काय
What Is Kusum Solar Pump Yojana
कुसुम सौर पंप योजनेची थोडक्यात माहिती
Kusum Solar Pump Scheme In Short
कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे
Kusum Solar Pump Scheme Benefits
कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये
PM Kusum Solar Pump Yojana Features
कुसुम सोलार पंप योजना अनुदान
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024
कुसुम सोलार पंप योजनेचे लाभार्थी
Kusum Solar Pump Yojana Maharashtra Benefisior
कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ
Kusum Solar Pump Yojana Benefits
कुसुम सोलर पंप योजनेचे नियम व अटी
Kusum Solar Pump Yojana Terms And Conditions
कुसुम सोलर योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Kusum Solar Pump Yojana Documents
पीएम कुसुम सौर पंप योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 Online Apply
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
कुसुम सौर पंप योजनेची थोडक्यात माहिती
Kusum Solar Pump Scheme In Short
योजनेचे नाव | महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजना |
कोणी सुरू केली | राज्य आणि केंद्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांच्या शेतात सोलर कृषी पंप बसवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://pmkusum.mnre.gov.in/ |
कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे
Kusum Solar Pump Scheme Benefits
- देशात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. म्हणून शेती क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून सतत प्रयत्न करत असतात. या योजनेचा भाग म्हणून कुसुम सोलर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत असून सरकारला देखील परवडणारी ठरत आहे.
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी पारंपारिक ऊर्जास्त्रोतांवर अवलंबून न राहता सर्व ऊर्जेचा वापर करून सौर कृषी पंप बसून आपल्या शेतीतील पिकांना योग्य वेळी पाणी देता येत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढत आहेच याबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन राखण्यासाठीही शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
- शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाद्वारे शेतीतील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे डिझेल इंजन वापरण्याची गरज शेतकऱ्यांना उरली नाही त्यामुळे त्यांच्या खर्चा मध्येही बचत होत आहे.
- कुसुम सोलार पंपामुळे Kusum Solar Pump Scheme शेतीच्या पिकांना योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यात मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागत आहे.
- Kusum Solar Pump Scheme प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना सोलार प्लांट मिळणार आहे.
- सोलार पंपाच्या मदतीने भारतातील सर्व शेतकरी आपल्या शेतात सिंचन करू शकतात.
- पीएम कुसुम सोलार पंप PM Kusum Solar Pump Yojana 2024 योजनेचा लाभ हे भारतातील सर्व शेतकरी घेऊ शकतात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज नाही असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर होईल त्यामुळे प्रदूषण कमी होईल तसेच डिझेलचा खर्च देखील वाचेल.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती
कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये
PM Kusum Solar Pump Yojana Features
- कुसुम सोलार पंप योजनेमुळे शेतकरी वर्गाला चालना मिळते.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होते.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होतो.
- या योजनेमुळे शेतकरी शेती पिकांच्या सिंचनासाठी प्रोत्साहित होतात.
- कुसुम सोलर पंप योजनेमुळे पिकांचे नुकसान टळते.
- या योजनेचा सर्वप्रथम जो अर्ज करेल त्यालाच सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल या तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
- या योजनेची सुरुवात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा मार्फत करण्यात आलेली आहे.
- PM Kusum Solar Pump Yojana योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवली आहे त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता अर्जदाराला नाही.
- या योजनेअंतर्गत पाच वर्षात 5 लाख सोलार पंप वाटप करण्याचे सरकारचे लक्ष आहे.
कुसुम सोलार पंप योजना अनुदान
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024
कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान मिळते
मोटर | खुला वर्ग | अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती |
3 hp | 19,380 | 9,690 |
5 hp | 26,975 | 1,348 |
7.5 hp | 39,440 | 18,720 |
कुसुम सोलार पंप योजनेचे लाभार्थी
Kusum Solar Pump Yojana Maharashtra Benefisior
- ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे असे शेतकरी.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नाही असे शेतकरी.
- ज्या शेतकऱ्यांना अटल कृषी पंप योजना तसेच सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ मिळालेला नाही असे शेतकरी.
- ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत कृषी पंप योजना लाभ घेतलेला नाही असे शेतकरी.
कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ
Kusum Solar Pump Yojana Benefits
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांची लोडशेडिंग पासून मुक्तता होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाही त्यांच्या शेतीमध्ये वीज उपलब्ध होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांची वीज बिलापासून मुक्तता होईल तसेच त्यांचा खर्च देखील वाचेल.
कुसुम सोलर पंप योजनेचे नियम व अटी
Kusum Solar Pump Yojana Terms And Conditions
- शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे, विहीर, बोरवेल. 12 माही वाहणारे नदी, ओढे, नाले यांच्या शेजारील शेत जमीन किंवा शाश्वत पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- सरकारच्या अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना कुसुम सौर पंप योजना अंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- ज्या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 3 एचपी सोलर पंप, 5 एकर जमीन धारक शेतकऱ्यांना 5 एचपी सौर पंप आणि त्यापेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास 7.5 एचपी सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत दिला जातो.
कुसुम सोलर योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Kusum Solar Pump Yojana Documents
सातबारा उतारा- सातबारा उतारा वर एकापेक्षा अधिक नावे असल्यास दोनशे रुपये मुद्रांक (बॉण्ड पेपर) कागदावर ना हरकत/ संमती पत्र भरून घ्यावे. मात्र सातबारावर एका शेतकऱ्याचे नाव असल्यास याची आवश्यकता नाही.
आधार कार्ड
पासबुक
रद्द केलेले चेक
पासपोर्ट फोटो
शेत जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामुहिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक आहे
रहिवासी प्रमाणपत्र
जातीचा दाखला आवश्यक असल्यास
पीएम कुसुम सौर पंप योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 Online Apply
कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम अर्जदाराला पीएम कुसुम योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतरच्या समोर या योजनेचे होम पेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला पीएम कुसुम योजनेच्या पर्याय वर क्लिक करायचे आहे
त्यानंतर एक नवीन पेज उघडेल यावर तुम्हाला नवीन नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे
त्यानंतर तुमच्यासमोर दुसरे पेज उघडेल या पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी त्यावर सबमिट करावा
त्यानंतर शेतकऱ्याची सर्वसाधारण माहिती अचूक पद्धतीने भरावी
त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जावे
त्यानंतर तुम्हाला पुन्हा माहिती भरावी लागेल या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचे आधार केवायसी बँक खात्याशी संबंधित माहिती, जात, स्वघोषणा, जमिनी संदर्भातील कागदपत्रे जसे की सातबारा आणि सौर पंपाची माहिती भरावी लागेल
त्यानंतर अर्जदाराला सेल्स डिक्लेरेशन साठी दिलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट यावर क्लिक करून पैसे भरावे लागतील
पैसे भरल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल आणि एसएमएस द्वारे देखील तुम्हाला ही माहिती मिळेल
त्यानंतर तुम्ही प्रिंट काढून सर्व माहिती तुमच्याकडे सांभाळून ठेवा जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास तुम्ही या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेऊ शकतात
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र कोणासाठी आहे?
उत्तर: महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सरकारच्या कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतला नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे आणि शेतकरी या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
प्रश्न: कुसुम सोलर पंप योजना 2024 साठी काय आहेत आवश्यक कागदपत्रे?
उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किसान क्रेडिट कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जमिनीची कागदपत्र, आधार कार्ड, मोबाईल नंबर, फोटो असणे आवश्यक आहे.
प्रश्न: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत किती अनुदान मिळते?
उत्तर: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून सौर पंप बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना खर्च करावी लागेल कारण या खर्चाच्या रकमेतील 60% रक्कम सरकार अनुदान म्हणून देईल आणि 30 टक्के पर्यंतचे कर्ज दिले जाईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA