Ladki Bahin Yojana : सरकारने दिले स्पष्टीकरण; महिलांनो सावध राहा!
Ladki Bahin Yojana WhatsApp Message in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत का? व्हाट्सॲप वर अर्ज करा आणि हप्ते पुन्हा सुरू करा अशा आशयाचा संदेश सध्या समाज माध्यमावर फिरत आहे. जाणून घ्या याबद्दलची संपूर्ण माहिती..
मुंबई : Ladki Bahin Yojana WhatsApp Message in marathi : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे तो पुन्हा सुरू करण्यासाठी व्हाट्सॲप वर अर्ज करता येतो असा दावा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच ज्या महिलांच्या हप्ता बंद झाला आहे अशा महिलांना आपला हप्ता पुन्हा सुरू होऊन आर्थिक मदत मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. चला तर मग जाणून घेऊ सरकार काय म्हणते..
तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता बंद झाला आहे. व्हाट्सॲप वर अर्ज करा आणि पुन्हा हप्ता सुरू करा अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. काही संदेशांमध्ये लिंक पाठवून महिलांना तुमची माहिती भरण्यासही सांगितली जात आहे. त्यामुळे ज्यांचा लाभ बंद झाला आहे अशा महिला मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र अशा प्रकारच्या कुठल्याही भुलतापांना महिलांनी बळी पडू नये असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारकडून कुठल्याही प्रकारची व्हाट्सॲप वर अर्ज मागवला जात नाही. तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा हप्ता का बंद झाला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या अशा संदेशापासून महिलांनी सावध होण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.
2100 रुपयांच्या हप्त्याची चर्चा
Ladki Bahin Yojana WhatsApp Message in marathi : लाडक्या बहिणींना पुढील महिन्यापासून 2100 रुपये मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. यासंदर्भात पाच ऑक्टोबरला शासन निर्णय झाल्याचे संदेशांमध्ये म्हटले जात आहे. मात्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार सप्टेंबर महिन्याचा आर्थिक लाभ देण्याबाबत किंवा मासिक लाभाची रक्कम 1500 हजार वरून 2100 रुपये करण्याबाबत असा कोणताही सरकारी निर्णय झालेला नाही.
त्यामुळे वाढीव हप्ता मिळणार किंवा बंद झालेले हप्ते व्हाट्सॲपच्या माध्यमातून अर्ज करून मिळणार असे दावे खोटे आहेत. कारण याबद्दल सरकारने कुठलेही अधिकृत माहिती दिलेली नाही. योजनेतील लाभाची रक्कम, हप्त्याची तारीख, अर्ज प्रक्रियेतील बदल या संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच तुम्ही त्यावर विश्वास ठेवा. अशा सोशल मीडियावर येणाऱ्या अफवाच्या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवू नका जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
महिलांनो.. सावध राहा
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची बोगस खाते बंद केली आहेत. त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते बंद झाले आहेत. मात्र आता सध्या सोशल मीडिया व्हाट्सॲप वर अर्ज करा आणि तुमचे हप्ते पुन्हा नव्याने सुरू करा अशा प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. मात्र लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाने कोणतेही अधिकृत व्हाट्सॲप चॅनल किंवा अर्ज भरण्याची लिंक जाहीर केलेली नाही. त्यामुळे अशा भुलथापांना महिलांनी बळी पडू नये.
सरकारच्या नावाचा वापर करून काही लोक अशा प्रकारचा संदेश प्रसारित करत आहेत. तुमच्या हप्ते बंद झालेत ते सुरू करण्यासाठी अर्ज भरा, लिंक पाठवली जात आहे. आधार क्रमांक टाका, बँक खाते तपशील टाका, ओटीपी द्या गोपनीय माहिती तुमच्याकडून माहिती करून घेतली जात आहे. कोणतीही माहिती देण्यापूर्वी संबंधित सुविधा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे का? याची खात्री जमा करा असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कुठल्याही महिलांनी सोशल मीडियाच्या अफवावर विश्वास ठेवणे असे हे स्पष्ट करण्यात आले आहे.
तुमचा हप्ता बंद झालाय, काय करावे?
Ladki Bahin Yojana WhatsApp Message in marathi तुमचाही हप्ता काही कारणामुळे बंद झाला असेल तर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासा. अर्जाची स्थिती काय आहे हे तपासा आणि सरकारकडून काही सूचना आवश्यक कारवाई प्रलंबित आहे का? याचीही माहिती तुम्ही संकेतस्थळावर जाऊन तपासा आणि या संदर्भात जर तुमचं समाधान झाले नाही आणि तक्रार करायची असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. कारण लाभ न मिळण्याचे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील संदेशाच्या आधारे पुन्हा अर्ज भरणे किंवा अनधिकृत व्यक्तीकडून मदत घेणे टाळावे. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
ई-केवायसी तक्रारीची सुविधा
e-KYC Verification
- महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही तुमची माहिती नोंदवा आणि तक्रार करू शकता.
- संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारेच महिलांनी पुढील कारवाई करावी.
- सोशल मीडियावर मिळणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका आणि स्वतःची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.
Read About : शेतकरी होणार मालामाल
website : yojanamazi.com