Lakhapati didi yojana 2024 :
देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील 83 लाख बचत गटाशी जोडल्या गेलेल्या तब्बल 9 कोटी महिलांना होणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला. या वेळी निर्मला सितारामन यांनी महिलांच्या कल्यानासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजणांची माहिती दिली. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी लखपती दीदी योजनेचा विस्तार करत असल्याची घोषणा केली. ही योजना म्हणजे नक्की काय? महिलांना या योजनेचा कसा लाभ होतो? याविषयी अधिक जाणून घेऊ..
- ठळक मुद्दे :-
- लखपती दीदी योजना म्हणजे काय?
- योजनेबाबत काही महत्वाचे मुद्दे
- लखपती दीदी योजनेचा उद्देश
- ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य
- लखपती दीदी योजनेचे वैशिष्ट्ये
- लखपती दीदी योजनेचे फायदे
- लखपती दीदी योजना २०२४ पात्रता काय आहे
- लखपती दीदी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- लखपती दीदी योजनेचा अर्ज कसा करावा?
- या योजनेची अधिकृत वेबसाइट सुरू झाल्यावर ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- लखपती दीदी योजना 2024 ऑफलाइन अर्ज कसा भरावा?
- सारांश
- FAQ’s
What is Lakhapati Didi Yojana : लखपती दीदी योजना म्हणजे काय?
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम लखपती दीदी योजेनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना बचत गटामार्फत प्रशिक्षण देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्या नंतर 2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केली. आता सरकारने या योजनेचा विस्तार करत देशातील 3 कोटी महिलापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे लक्ष असल्याचे जाहीर केले.
तुम्हालाही कौशल्य प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करायचा आहे? आणि लखपती दीदी योजनेचा कसा फायदा होणार आहे. याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.
लखपती दीदी योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच बचत गटाशी संबंधीत असलेल्या महिलांना सरकारकडून कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत उत्तराखंड राज्य सरकार महिला बचत गटांना बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे महिलांना लखपती बनवण्यास मदत होते. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक राज्य सरकारे देखील आर्थिक मदत करत आहेत. विशेष म्हणजे यात बचत गटामध्ये बँकवाली दीदी, अंगणवाडी वाली दीदी, आदींचा समावेश आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित जवळपास 10 कोटी महिलांना एलईडी बल्ब, ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग, आदी बाबतचे प्रशिक्षण देऊन महिलांना लखपती म्हणजेच स्वावलंबी बनवले जाईल.
15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. लखपती दीदी ही योजना देशभरातील महिलांसाठी चालवल्या जात असलेल्या बचत गटाशी संबंधित आहे. लखपती दीदी हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून या द्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लखपती दीदी योजनेस पात्र असलेल्या महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना केंद्र सरकार राबवत आहे.
योजनेबाबत काही महत्वाचे मुद्दे
योजनेचे नाव | लखपति दीदी योजना |
कधी सुरू झाली | 15 ऑगष्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यात आली |
किती मिळणार कर्ज | 1 ते 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज |
कोणाला मिळणार लाभ | बचत गटाशी संबंधित असलेल्यांना |
उद्देश | महिलांना लखपति बनवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://lakhpatididi.gov.in/ |
लखपती दीदी योजनेचा उद्देश Purpose
Lakhapati didi yojana 2024 देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामुळे महिलांना रोजगार मिळेल, त्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून खऱ्या अर्थाने स्वावलंबी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत बचत गटाशी निगडीत असलेल्या महिला स्वतःचे उद्योग सुरू करत असून त्यांच्यासह काम करणाऱ्या इतर महिलांचीही आर्थिक स्थिति यामुळे सुधारत आहे. देशभरात सध्या जवळपास 83,00,000 (त्रेयांशी लाख) बचत गट असून त्यांच्याशी 9 कोटीहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या सर्व बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली.
३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना या निवडणूक वर्षात लखपती दीदी योजनेचा प्रसार केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना सितारामन म्हणाल्या की आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवले गेले आहे . त्यामुळे 9 कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे. आत्ता या योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी आम्ही 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यात या अर्थसंकल्पनात वाढ करून 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या अंतर्गत आता 1 कोटी महिलांना लखपती दिदीसाठी प्रमोट करण्यात येणार आहे
Feature of Lakhpati Didi Yojana लखपती दीदी योजनेचे वैशिष्ट्ये
- केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू केली आहे.
- प्रत्येक महिलेला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 ते 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते.
- आता पर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना लखपती दिदी बनवले गेले आहे.
- यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.
- या योजने अंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
- महिलांना या योजने अंतर्गत छोटे कर्ज सहज उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कर्ज सुविधा देण्यात आली आहे.
- लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करते.
- लखपती दीदी योजनेअंतर्गत उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते.
- महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी डिजिटल बँकिंग सेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट, आणि मोबाइल वॉलेट वापरण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केले जाते.
- या योजनेद्वारे महिलांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा दिली जाते.
- महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लखपती दीदी योजनेअंतर्गत विविध सशक्तीकरण कार्यक्रम चालवले जातात.
Lakhpati Didi Yojana benefits लखपती दीदी योजनेचे फायदे :
- देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिला आणि बचत गटांना विविध प्रकारचे फायदे मिळतात.
- लखपती दीदी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शकत्वे दिली जातात.
- यात व्यवसाय योजना, मार्केटिंग धोरणे, आणि बाजारात आपले उत्पादन कसे पोहचवावे आदिबाबत माहिती दिली जाते.
- लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक सुरक्षितेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण देते आणि आर्थिक माहितीही दिली जाते.
- या योजनेअंतर्गत सारकार एक कार्यशाळा आयोजित करते, या कार्यशाळेत बचत, गुंतवणूक, बजेट, आर्थिक पर्यायांशी संबंधित माहिती दिली जाते.
- या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी त्यांच्या मनात उत्साह निर्माण केला जातो.
- लखपती दीदी योजनेने महिलांना कर्ज सुविधा दिली आहे. ज्या मुळे त्यांना त्यांचा व्यवसाय मुलांची शिक्षण किंवा इतर काही गरजा यासाठी मदत होते. एवढेच नाही तर काही सरकार त्यांना बिनव्याजी कर्ज सुविधा देखील देतात.
हे वाचा :
लखपती दीदी योजना २०२४ पात्रता काय आहे
ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याने आपआपल्या पद्धतीने या योजनेची पात्रता ठरवली आहे. त्यापैकी काही सामान्य पात्रतेची माहिती खालीलप्रमाणे.
- लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला ही त्या राज्यात कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
- त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न ही ३,००,००० (तीन लाखापेक्षा) कमी असणे आवश्यक आहे.
- जर त्या महिलेचे वय १८ वर्ष ते ५० वर्ष च्या दरम्यान असेल तरच ती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
- लखपती दीदी योजनेसाठी फक्त आणि फक्त महिलाच अर्ज करू शकतील.
- या योजनेसाठी महिला बचत गटाशी संबंधित असणे बंधनकारक आहे (आवश्यक) आहे.
Document of Lakhpati Didi Yojana लखपती दीदी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1 आधार कार्ड
2 पॅन कार्ड
3 उत्पन्न प्रमानपत्र
4 पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड, लाइटबिल)
5 शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
6 बँक खाते पासबूक
7 मोबाइल नंबर
8 पासपोर्ट फोटो
Lakhpati Didi Yojana online apply लखपती दीदी योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड इत्यादी राज्यांमध्ये लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. सध्यातरी आपल्याला अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइटला https://lakhpatididi.gov.in/ भेट द्या. सध्या लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरुन पाहू शकता.
लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील, शहरातील स्थानिक जवळच्या बचत गटाला भेट द्या. सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या नजीकच्या (जवळच्या) अंगणवाडी केंद्रातून मिळऊ शकता.
यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तुम्ही गोळा करा. यात आधार कार्ड, बँक खाते पासबूक, स्वयं साहायता समूह (SHG) नोंदणी प्रमाणपत्र आणि व्यवसाय, योजनांचा समावेश आहे.
स्थानिक कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा अर्ज स्वयं साहायता समूह (SHG) कडे जमा करा. तो तुमच्या अर्जाची तपासणी करेल. आणि तुमचा अर्ज सरकारकडे पाठवेल.
तुम्ही केलेला अर्ज सरकारी अधिकारी तपासतील आणि तुमचा अर्ज योग्य असल्यास तुम्हाला कर्ज मिळण्यास सरकारची मदत होईल.
या योजनेची अधिकृत वेबसाइट सुरू झाल्यावर ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- लखपती दीदी योजना या योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्याकरीता सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तिथे होमपेज दिसेल.
- या नंतर तुम्हाला अप्लाय लखपती दीदी योजना apply Lakhpati Didi Yojana या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडला आहे.
- तुम्हाला तो फॉर्म काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित माहिती भरावी लागेल.
- त्या नंतर आपण वरती आवश्यक कागदपत्राची यादी दिलेली आहे त्या प्रमाणे आपली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करावी लागतील.
- या नंतर खाली सबमीट (submit) या बटनवर क्लिक करावे लागेल.
- त्या नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती मिळेल जी तुम्हाला प्रिंट करायची आहे त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.
अशाप्रकारे तुम्ही लखपती दीदी योजना
2024हा ऑनलाइन अर्ज भरू शकता.
लखपती दीदी योजना 2024 ऑफलाइन अर्ज कसा भरावा?
जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरणे शक्य नसेल तर तुम्ही ऑफलाइन अर्ज देखील खालील पद्धतीने भरू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जावे लागेल.
- तुम्हाला तेथील कर्मचाऱ्याकडून लखपती दीदी योजना हा अर्ज घ्यावा लागेल.
- तुम्हाला त्या अर्जात जी माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचून ती भरावी लागेल.
- या नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून द्यावी लागतील.
- हा फॉर्म आणि त्याला जोडलेली कागदपत्रे तुम्हाला तेथील कर्मचाऱ्याला द्यावा लागेल
- त्या नंतर ते तुम्हाला एक पावती देतील ती पावती तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवावी लागेल.
अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन देखील हा अर्ज भरुण लखपती दीदी योजनेचा फायदा घेऊ शकता.
सारांश
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात. त्यांना आर्थिक मदत होते. त्यांचे उत्पन्न वाढते त्या या योजनेच्या नावाप्रमाणेच लखपती होऊ शकतात. महिला बचत गटामध्ये एलईडी बल्ब बनविणे, प्लंबिंग, ड्रोन रीपेयरिंग इत्यादि तांत्रिक कामे शिकवले जाते आणि यातून त्यांचे उत्पन्न वाढते.
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना अनेक प्रकारची कलाकौशल्य शिकवले जाते. त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविले जाते त्यांना कर्जसुविधा दिली जाते. महिलांना आर्थिक व्यवहाराची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. या योजनेअंतर्गत त्यांना छोटी कर्जे व्यवसाइक प्रशिक्षण बचत उद्योजक्ता समर्थन आणि विमा संरक्षण दिले जाते. सरकार त्यांना चांगली बाजारपेठ मिळऊन देण्याचा प्रयत्न करते. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना स्वयं सहायता समूहाचा (SHG) भाग असणे आवश्यक असते. याचा अनेक महिला लाभ घेत आहेत.
FAQ’s lakhpati didi yogana
Q. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना कधी जाहीर केली?
- 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून मोदींनी या योजनेची घोषणा केली.
Q. लखपती दीदी योजनेचे फायदे काय?
- या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत दिली जाते.
- लखपती दीदीचा लाभ कोणाला?
- देशातील ३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ होण्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात दिली.
Q. लखपती दीदी योजनेसाठी कसा करावा अर्ज?
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित अंगणवाडीशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सरकारच्या https://lakhpatididi.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Q. या योजेसाठी कोणत्या महिला पात्र असतील?
- लखपती दीदी योजनेसाठी त्या महिलेचा बचत गटाशी संपर्क असावा आणि तिचे वय १८ ते ५० वर्षाच्या दरम्यान असावे.