Mahamesh Yojana 2024 Information In Marathi : महामेष योजना 2024 मराठी माहिती
Mahamesh Yojana 2024 In Marathi : आज आपण राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 ची सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रात शेती हा पारंपारिक व्यवसाय मानला जातो. तसेच शेतकरी अनेक वर्षांपासून शेती सोबत जोडधंदा म्हणून शेळ्या व मेंढ्या पालन हा व्यवसाय करतात. त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी परंतु अलीकडच्या काळात पुष्कळ कारणामुळे असे आढळून आले आहे की राज्यात शेळी व मेंढ्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे राज्यात शेळ्या व मेंढ्यांची होणारी घट थांबवण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याच पैकी एक योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आहे.
Mahamesh Yojana 2024 In Marathi राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ही 2017-18 या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळून उर्वरित 35 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत एकूण 6 घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी 45.81 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रात स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करण्यात आल्या.
Mahamesh Yojana 2024 In Marathi या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यास 20 मेंढ्या व 1 नर मेंढ्यांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर मेंढी पालनासाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देखील देण्यात येते. मेंढ्यांना लागणारे खाद्य कमी पडू नये यासाठी हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनवण्याकरिता यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार मार्फत मेंढीपालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. राज्यातील धनगर व तत्सम जातीमधील सुमारे 1 लाख मेंढीपालंकांकडून मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो.
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana राज्यातील मेंढी विविध ऋतूनुसार मेंढ्यांसाठी जेथे चारा उपलब्ध होईल अशा विविध ठिकाणी भटकंती करून मेंढ्यांचे पालन पोषण करण्याचा व्यवसाय करीत आहेत. Mahamesh Yojana महामेष योजना ही 18 मार्च 2017 रोजी सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. पशुपालनामध्ये हे नागरिक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासारखे पशु सांभाळून त्यांच्या निघणाऱ्या दुधावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे अनेक खरेदीसाठी आवश्यक पैसा नसतो. त्यामुळे एक दोन शेळ्या पाळतात शेळीच्या माध्यमातून ते त्यांचा दुधाचा दुधाच्या गरजा पूर्ण करतात तसेच त्यांना शेतीपालन व्यवसायांमधून लाभ होतो.
Mahamesh Yojana 2024 महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. सरकार मार्फत या मोठ्या प्रमाणात अनुदान देखील देण्यात येते जेणेकरून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Mahamesh Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण राज्ये यशवंतराव होळकर महामेष योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी काय या योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे?, महामेष योजनेसाठी कसा करावा अर्ज?, महामेष योजनेची काय आहे पात्रता? याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
ठळक मुद्दे
महामेष योजना 2024 मराठी माहिती
Mahamesh Yojana 2024 Information In Marathi
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची थोडक्यात माहिती
Mahamesh Yojana 2024 In Short
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची उद्दिष्टे
Mahamesh Yojana Purpose
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची वैशिष्ट्ये
Mahamesh Yojana 2024 Features
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे मुख्य घटक
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे लाभार्थी
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana Benefisiors
महामेष योजनेचा लाभ
Mahamesh Yojana Benefits
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची पात्रता
Mahamesh Yojana Eligibility
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे नियम व अटी
Mahamesh Yojana 2024 Terms And Conditions
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची कागदपत्रे
Mahamesh Yojana Documents
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची अर्ज प्रक्रिया
Mahamesh Yojana Online Apply
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची लॉगिन करण्याची प्रक्रिया
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची थोडक्यात माहिती
Mahamesh Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | राजे यशवंतराव होळकर महामेष योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | पशुसंवर्धन विभाग |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | शेळी मेंढी पालनासाठी 75 टक्के अनुदान |
उद्देश | शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | WWW.mahamesh.in |
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची उद्दिष्टे
Mahamesh Yojana Purpose
- राज्यात शेळी मेंढी पालनासाठी इच्छुक शेतकऱ्यांना त्याचबरोबर पशुपालकांना शेळी व मेंढी विकत घेण्यासाठी या योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदान व महिलांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- शेळी व मेंढ्यांची संख्यात वाढ होणे.
- राज्यातील शेळी व मेंढ्यांची संख्या वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
- शेळी व मेंढी पालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांचे पशुपालकांनी त्याचबरोबर पशुपालकांचे जीवनमान सुधारणे.
- शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
- मेंढी पालनाचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या सामाजिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यांमध्ये जास्तीत जास्त सुधारित प्रजातीच्या मेंढ्यांचा प्रसार करण्यावर भर देणे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची वैशिष्ट्ये
Mahamesh Yojana 2024 Features
- महाराष्ट्र सरकार मार्फत राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेत पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र आणि बकरी विभाग निगम नोडल एजन्सीच्या रूपात कार्य करते.
- महामेष योजनेअंतर्गत 45.81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- महाराष्ट्र सरकार कडून राज्यात शेळी व मेंढी पालन करण्याची इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारमार्फत मेंढी पालनासाठी लाभार्थ्यास 75 टक्के अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मेंढ्यांच्या चारण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
- महाराष्ट्रात ग्रामीण तसेच शहरी भागातील शेळी व मेंढी पालनासाठी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांचे जीवनमान सुधारेल.
- या योजने मुळे राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे शेतकरी पशुपालक घरी बसूनच मोबाईलच्या मदतीने अर्ज करून करू शकतो. अर्जदाराला कुठल्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेल पर्यंत अर्जाची स्थिती घरीच जाणून घेऊ शकतो.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे मुख्य घटक
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana
- या योजनेअंतर्गत 20 मेंढ्या व 1 नर मेंढी अशा मेंढी गटाचे 75 टक्के अनुदान अनुदानावर वाटप या योजनेअंतर्गत करण्यात येते.
- मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
- मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
- हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यासाठी यंत्राची खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
- पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे लाभार्थी
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana Benefisiors
अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक राजे यशवंतराव होळकर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
महामेष योजनेचा लाभ
Mahamesh Yojana Benefits
- महाराष्ट्रात शेळी मेंढी पालनासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकरी तसेच पशुपालकांना शेळी व मेंढी खरेदी विकत घेण्यासाठी 75 टक्के अनुदान व मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना महिलांसाठी 30 टक्के व अपंगांसाठी 3 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
- महामेष योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना प्राधान्य दिले जाईल.
- महामेष योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेमुळे लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील जे शेतकरी तसेच पशुपालक शेळी व मेंढी पालनासाठी उत्सुक आहेत त्यांना शेळी व मेंदी खरेदी करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची पात्रता
Mahamesh Yojana Eligibility
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा भटक्या जमाती मधील असणे आवश्यक आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे नियम व अटी
Mahamesh Yojana 2024 Terms And Conditions
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येईल.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना महामेष योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ केवळ भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनाच घेता येईल.
- या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.
- ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी महामेष योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे परंतु त्यांची निवड झाली आहे परंतु त्यांना लाभ मिळणे बाकी आहे अशा लाभार्थ्यांना पुन्हा या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.
- मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांकडे शेड बांधण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणता सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
- या योजनेचा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येईल.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची कागदपत्रे
Mahamesh Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जमिनीची कागदपत्रे
- जमिनीत सह हिस्सेदार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
- पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची अर्ज प्रक्रिया
Mahamesh Yojana Online Apply
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथील होम पेजवर महामेष योजनेवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करिता अर्जदार लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर पुन्हा एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वरील अटी व शर्ती मान्य आहेत यावर टिक करून आपला आधार कार्ड नंबर टाकून कॅपच्या कोड भरून लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर महामेष योजनेचा अर्ज उघडेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आजूकपणे भरावी लागेल.
- त्यानंतर योजनेचा अर्ज हा दोन पेज मध्ये आहे यामध्ये पहिल्या पानावर अर्जदाराची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील तसेच इतर माहिती भरायची आहे.
- संपूर्ण माहिती अचूकपणे भरून सेव या बटन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराला कुठल्या घटकांमध्ये लाभ घ्यायचा आहे याबाबतची माहिती भरावी लागेल. या योजनेअंतर्गत घटक निवड करताना तालुक्याचे उद्दिष्ट तपासून त्यानुसार योजनेमधील कोणत्या उपघटकांमध्ये लाभ घ्यायचा आहे त्याची निवड करावी लागेल.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूकपणे भरून झाल्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली असा तुम्हाला एक मेसेज येईल तो आल्यानंतर अर्जदाराचा अर्ज निवड करता सादर झाल्याचे समजावे.
- त्यानंतर व्ह्यू रिसिप्ट या बटन वर क्लिक करून अर्जाची पावती अर्जदाराला दिसेल.
अशा ऑनलाइन पद्धतीने तुम्ही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची लॉगिन करण्याची प्रक्रिया
Raje Yashavantrav Holkar Mahamesh Yojana
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा योजनेअंतर्गत लॉगिन करायचे असल्यास अर्जदाराला सर्वप्रथम राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथील होमपेज वर अर्जदार याकरिता अर्जदार लॉगिन वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर लॉगिन करण्याची प्रक्रिया.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे तुमची राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ