Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 In Marathi : 10 हजार महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 Information In Marathi : महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 मराठी माहिती

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana नुकताच 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक योजनांची घोषणा केली. यामध्ये महिलांसाठीच्या देखील नवनवीन योजना राबवण्यात आल्या. अशाच एका योजनाची आपण आज माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पिंक ई-रिक्षा योजना 2024 Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

महाराष्ट्र सरकार महिलांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते पिंक ई-रिक्षा योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल ठरेल.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana पिंक ई-रिक्षा योजना 2024 ही लवकरात लवकर सर्व होणार आहे. या योजनेमुळे महिलांना कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिला रिक्षा खरेदी करू शकतील. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना मदत करणे. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल. महिला स्वावलंबी बनतील. त्यांना दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana या योजने दरम्यान पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 शहरातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत सरकारमार्फत केली जाणार आहे. या योजनेसाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत Pink E-Rickshaw Yojana महिलांना 10 टक्के रक्कम भरावी लागेल. 20 टक्के रक्कम सरकार कडून अनुदान मिळेल. राहिलेली 70 टक्के रक्कम बँकेतून कर्ज मिळेल.

ठळक मुद्दे

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 मराठी माहिती

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 Information In Marathi

पिंक ई-रिक्षा योजनेची थोडक्यात माहिती

Pink E-Rickshaw Yojana In Short

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचे वैशिष्ट्य

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Features

पिंक ई-रिक्षा योजनेचे फायदे

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Benefits

पिंक ई-रिक्षा योजने साठीचे शहर

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024

पिंक ई-रिक्षा योजनेसाठीचे पात्रता

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Eligibility

पिंक ई-रिक्षा योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे 

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Documents

पिंक ई-रिक्षा योजनेची अर्ज प्रक्रिया

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पिंक ई-रिक्षा योजनेची थोडक्यात माहिती

Pink E-Rickshaw Yojana In Short

योजनेचे नावपिंक ई-रिक्षा योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू झाली27 जून 2024
विभागमहिला व बालविकास विभाग
लाभार्थीमहाराष्ट्रातील महिला
उद्देशमहिलांना स्वयंरोजगार निर्माण करून देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटसध्या उपलब्ध नाही
Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचे वैशिष्ट्य

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Features

  • महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
  • ई-रिक्षा महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • महिला हा रिक्षा चालवतील.
  • या योजनेअंतर्गत रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना 20 टक्के अनुदान सरकारमार्फत मिळणार आहे.
  • महिलांना या योजनेअंतर्गत रिक्षा किमतीच्या फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागेल उरलेली 70 टक्के रक्कम बँकेत चे बँकेतून कर्ज मिळेल.

पिंक ई-रिक्षा योजनेचे फायदे

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Benefits

  • या योजनेमुळे महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
  • या योजनेमुळे महिला स्वावलंबी बनतील.
  • या योजनेमुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील.
  • शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता प्रदान केली जाईल.
Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

पिंक ई-रिक्षा योजने साठीचे शहर

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत पुढील शहरे आहेत

मुंबई शहर

मुंबई उपनगर

ठाणे

नवी मुंबई

पुणे

पनवेल

नागपूर

छत्रपती संभाजी नगर

पिंपरी चिंचवड

नाशिक

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024

विकास पत्र योजना

बीज भांडवल योजना 

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना

पिंक ई-रिक्षा योजनेसाठीची पात्रता

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Eligibility

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.  
  • महाराष्ट्र बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • महिलेचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा.

पिंक ई-रिक्षा योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे  

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

ड्रायव्हिंग लायसन

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

पिंक ई-रिक्षा योजनेची अर्ज प्रक्रिया

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Apply

पिंक ई-रिक्षा योजनेची अर्ज प्रक्रिया ही सध्या उपलब्ध झालेली नाही. जशी उपलब्ध होईल तशी तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कळविण्यात येईल.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: पिंक ई-रिक्षा योजना Pink E-Rickshaw Yojana कधी सुरू झाली?

उत्तर: महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 27 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली.

प्रश्न: पिंक ई-रिक्षा योजना Pink E-Rickshaw Yojana म्हणजे काय?

उत्तर: महाराष्ट्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे करणार आहे.

प्रश्न: महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा Pink E-Rickshaw Yojana योजनेचा कोणाला मिळणार लाभ?

उत्तर: महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ केवळ महिलांना मिळणार आहे. ज्या महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान आहे अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

प्रश्न: पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत Pink E-Rickshaw Yojana किती शहरांमध्ये रिक्षा चालेल?

उत्तर: या योजनेसाठी दहा शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पनवेल, नागपूर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, नाशिक ही प्रमुख 10 शहरे असणार आहेत.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA