Manikrao Kokate on One Rupees Crop Insurance In Marathi : पिक विमा योजना खरच बंद होणार का?
Manikrao Kokate on One Rupees Crop Insurance In Marathi : सध्या राज्यात लाडकी बहीण च्या काही अटी लागू झाल्यामुळे अनेक महिलांची नावे कमी झाली आहेत. ते होताच पिक विमा योजनेबद्दल देखील नवीन धक्का शेतकऱ्यांना बसत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पिक विमा योजनेबद्दल नक्की काय म्हणाले ते आपण पाहू.
Crop Insurance एक रुपयात पिक विमा योजनेवर संकटाचे ढग जमा झाले. सध्या पिक विमा योजनेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले. एक रुपयात पिक विमा योजने मध्ये बदल करून शेतकऱ्यांना आता 1 रुपया ऐवजी 100 रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Crop Insurance कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने सगळीकडे एकच खळबळ जनक बातमी उडाली आहे. एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना नेमके काय म्हणाले आपले कृषिमंत्री.
नक्की काय म्हणाले कृषी मंत्री
Crop Insurance Corruption Crop Insurance Scheme at Rs 1
Crop Insurance Corruption Crop Insurance Scheme at Rs 1 : राज्य सरकार सर्व समावेशक पीक विमा योजना राबवते. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पिक विमा योजनेत एक रुपया भरून या योजनेमध्ये सहभागी होता येते. परंतु बीडमध्ये पिक विमा योजनेचा गैरप्रकार समोर आल्यानंतर या योजनेवर मोठे प्रश्नचिन्ह उभरले आहे.
Crop Insurance Corruption Crop Insurance Scheme ही योजना बंद होणार का अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. त्यावर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली की, या योजनेविषयी जो काही निर्णय असेल तो कॅबिनेट मध्ये घेण्यात येईल. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
Crop Insurance Corruption Crop Insurance Scheme एक रुपयात पिक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.
पिक विमा योजनेत भ्रष्टाचार होते म्हणून ती बंद करत असाल तर सरकारमध्येही भ्रष्टाचार होतो सरकारही बंद करावे का असा प्रश्न शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केला. एक रुपयात पिक विमा योजना बंद केली तर विदर्भासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर पिक विमा योजना राज्यात सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.