Marathi Bodhkatha Swavalambnache Dhadhe : स्वावलंबनाचे धडे

Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा

Marathi Bodhkatha : आजची कथा तुमच्या फार आवडीची असणार. कारण या गोष्टीत एक मुलगा आहे आणि एक आई आहे. आई म्हटलं की किती आनंदा झालाय ना तुम्हाला. मुलांनो देवाला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्याने प्रेमळ आई निर्माण केली.

Marathi Bodhkatha आई काळजी घेते, लाड करते, प्रसंगी रागावते, चिडते पण आपल्याला आईच आवडत असते आणि कधी कधी आपल्याला आईचा राग सुद्धा येतो.

Marathi Katha तिला वाटतं माझं मूल चांगलं निघावं, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, चार लोकांनी त्याला चांगला म्हटलं पाहिजे, त्याचे भविष्य चांगलं व्हावे.

Marathi Katha मग आज आपल्या गोष्टीमध्ये अशीच एक आई आणि एक मुलगा आपल्याला भेटणार आहे. गोष्टीचे नाव आहे स्वावलंबनाचे धडे. Marathi Goshti

स्वावलंबनाचे धडे

Swavalambnache Dhadhe

Marathi Goshti मुलांनो कोणत्या आईला आपल्या मुलाला आपल्यापासून दूर पाठवायला आवडेल सांगा बरं आणि जरी मूल आईपासून दूर गेलं तरी माहिती का तुम्हाला एक गंमत असते आई फार हळवि असते. आई रागवेल, आपल्याला धपाटे देईल पण आत मध्ये मनाने मात्र ती हळवी असते.

तुम्ही जर का मामाच्या, आत्याच्या गावाला दोन दिवसांसाठी घरी गेलात ना तरी तीच आपलं चालू असतं पोहोचला असेल का? नीट राहील ना? पोट भरेल ना? त्याला भाजी आवडेल ना? त्याला झोप येईल ना? कित्ती म्हणून प्रश्न तिला पडलेले असतात.

आईला आपल्या मुलाला आपल्यापासून दूर पाठवायला आवडेल का बरं? काही मुलाच्या उज्वल भविष्यासाठी, शिक्षणासाठी, तो शिकून-सवरून चांगला मोठा व्हावा, त्याला चांगलं कल्याण व्हावं असा निर्णय घेण्याची वेळ येते ना त्या वेळेस मात्र तिला हा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे आपल्या मुलाला मुलीला बाहेरगावी पाठवत लागतं. तर असाच आपल्या गोष्टीतला रतन नावाचा मुलगा.

आता रतन आई-बाबांसोबत राहतोय. पण पुढे त्याला शिक्षणासाठी जायचं सातारच्या मिलिटरी स्कूलमध्ये. तिथे शिकायला पाठवताना त्याच्या आईला आता हा कठोर निर्णय घ्यावा लागला होता.

रतनला शिक्षणासाठी दूर पाठवताना त्याच्याही आईला खूप वाईट वाटलं होतं. पण आता रतन साताराला गेला आहे. त्याचा तिथे प्रवेश झाला आहे, शिकायला लागलाय, शाळा सुरू झालेली आहे.

त्याला जाऊन त्याला 15 दिवस झाले पण एकही दिवस असा नाही येत की आईला रतन ची आठवण येत नाही.

सतत त्याची आठवण काढत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याची आठवण तिला येत असते. त्याच्या घरातल्या वस्तूंना पाहताना तिला त्याची आठवण येत असते. एखादा पदार्थ करताना तिला आवर्जून त्याची आठवण येते आणि साधं वरण भाताचा कुकर जरी लावलं तरी सुद्धा त्याच्या आईला त्याची आठवण यायची.

कारण फक्त गरम गरम वरण भात आणि साजूक तूप आणि छान आईने दिलेला तो वरण भात खायला फार आवडायचा. आणि आईला त्याची आठवण यायची. एकदा तर कहरच झाला सकाळपासून रतन रतन नावाचा जप करत होती.

एक सारखी आठवण येत होती बर का. आता रतन ला जाऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले होते. पन ना त्याचं पत्र आलं, ना त्याचा फोन आला. पंधरा दिवस झाले रतन ला जाऊन, पण रतनने आईला पत्रही पाठवलं नाही आणि फोनही केला नाही.

आता कदाचित शाळेचा अभ्यास, या तिथल्या सवयी सगळ्या गोष्टींमध्ये त्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी लागणारा जो वेळ असतो तो वेळ दिला असेल आणि म्हणून त्याने आईला फोन केला नाही, आईला पत्र सुद्धा पाठवू शकला नाही.

आईला मात्र फार त्याची काळजी वाटायला लागली. की बाई ग, मुलगा माझा 15 दिवस झाले गेला आहे. कसा असेल, आजारी तर पडला नसेल ना? त्याला जेवण जात नसेल का? काय भानगड काही कळलेच ना. त्याला स्वावलंबी जीवन जगताना काही त्रास तर होत नसेल ना? या आणि अशा विचारांनी त्याच्या आईला जराही चैन पडत नव्हता.

आता सातारा ची मिलिटरी स्कूलमध्ये आपल्याला माहिती आहे शिस्त, नियम, स्वावलंबन आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये आपली आई आपल्याला सगळे शिकवत असते. पण आपण कानाडोळा करतो. फार मनावर घेत नाही. जाऊदे आईच्या तोंडावर आपण नाही सुद्धा म्हणतो.

आई म्हणाली ना की अरे आज हा हॉल झाडाचा राहिला आहे केर काढायचा राहिला आहे तेवढं तू करतोस का तर आपण तिला अगदी सहजपणे नाही मी केर काढणार नाही असं म्हणतो. पण आपली आई आपल्याला एक वळण लावत असते एक संस्कार आपल्यावर ती करत असते विसरू नका हं.

रतनच्या आईची बेचैनी वाढली. तिला चैन पडत नाहीये. दिवसभर सारख रतन रतन चालू आणि अचानक दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर काय पोस्टमन उभा होता. त्याने एक पाकीट त्यांच्या हातात दिला आणि तो निघून गेला.

हे पत्र हातात घेतलं त्यावरचा अक्षर पाहिलं आणि तिची ओळख पटली हे पत्र तर आपल्या रतनने लिहिलेलं आहे. तिला इतका आनंद झाला की तिच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. तिने पटकन ते पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली.

सर्वप्रथम लिहिलेलं होतं प्रिय आईस सप्रेम नमस्कार! आई मी खुप मजेत आहे. आता तू काशी आहेस? या नव्या वातावरणाशी मी आता हळूहळू रुळत आहे. इथलं वातावरण फारच शिस्तीच आणि स्वावलंबी आहे.

इथे सगळी काम आपली आपल्यालाच करावी लागतात. पण आता रतनच्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे. कारण तो सातारा मिलिटरी स्कूलमध्ये शिकायला गेला. त्याने आवर्जून सांगितले आईला ‘आई इथली सगळी काम ज्याची त्यालाच करावी लागतात’.

शिस्त पाळावी लागते. खरं सांगू का आई त्यावेळी तू मला जे शिस्तीचे स्वावलंबनाचे स्वतःचे काम स्वतः करण्याचे धडे दिलेत ना त्याचा फायदा होतोय. आज मला इथे उपयोगी पडतोय. इथे रोज सकाळी आपला आपण लवकर उठावं लागतं. उठवायला कोणी येत नाही.

आई ग तुझे मला शिस्तीचे स्वावलंबनाचे आणि स्वतःचे काम स्वतः करण्याचे धडे दिलीस ना ते सगळे आत मला इथे उपयोगी पडतात. तिथे रोज सकाळी आपणच आपलं उठायचं असतं आणि आपणच आपलं आवरायचं असतं, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे असतात.

आपल्या खोलीतला केर सुद्धा आपण काढायचं. आपली खोली आपण रोज आवरायची. रोजचा रोज अभ्यास पूर्ण करायचा आहे. या आणि अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी त्याला कराव्या लागतात. रतन आईला

त्याच्या सातारा मिलिटरी स्कूल मधल्या या सगळ्या गोष्टी आलेल्या पत्राद्वारे कळवतो. ज्या मुलांना या गोष्टीची सवय नाही ना फार त्रास होतोय. हे पाहिल्यावर त्यावेळी तुझ्याकडचे शिस्तीचे धडे शिकलो, मी त्या सगळ्या गोष्टी शिकलो.

त्या वेळी त्याचे वाईट वाटत होते. कधी कधी तर तुझा थोडासा राग सुद्धा येत होता. पण आज मात्र मला त्या सगळ्या गोष्टी करताना अजिबात त्रास पडत नाहीये. प्रत्येक गोष्टींचा मला फायदाच होतो. त्या गोष्टी मला उपयोगी पडत आहे. मला अजिबात इतर मुलांसारखा त्रास होत नाहीये.

ज्या मुलांना कामाची सवय नाहीये स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय नाहीये त्या मुलांना मात्र ते फार जड चाललय आणि मला मात्र अजिबात नाही.

तू माझ्या अंगी भिनलेल्या त्या सगळ्या चांगल्या सवयीचा आत्ता मला खूप उपयोग होतो. आणि त्यामुळे मात्र मी आज खूप मजेत आहे. मला कुठलाच त्रास होत नाहीये. रतन बघा त्याच्या पत्राची शेवटची ओळ आहे हे की आई ग माझ्या आनंदाच, सुखाच श्रेय केवळ तुलाच आहे. तुझाच लाडका रतन.

आता रतनच्या आईने हे पत्र वाचलं आणि आईचे डोळे आनंदाश्रूनी भरून आले. तिला अभिमान वाटला मुलाचा.आईला रतन ची खुप आठवण आली. तिने हातात धरलेल जे पत्र होतं त्या पत्रातच अक्षरांमध्ये रतनला शोधलं आणि त्या पत्राचे पापे घेतले. जणू की ती रतन चे पापे घेत होती.

तर मुलांनो या कथेचा बोध काय तर स्वावलंबी बना. एखादं काम सांगितलं तर नाही म्हणू नका. आई एखाद्या कामासाठी तुम्हाला तुम्ही चुकला म्हणून रागवत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. काम शिकून घ्या.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

खरे बोलल्याचे बक्षीस

 एका पैशाची चूक

संधी सोडू नका

सातत्याचा पाठ

‘मी’ चा त्‍याग

खोटं बोलू नये

बाल हट्ट

गुणांची पारख

वेळेचे मोल

कोणीच नसतं निरुपयोगी