Nandani Krishak Samruddhi Yojana 2024 Information In Marathi : नंदिनी कृषक समृद्धी योजना 2024 मराठी माहिती
Nandani Krishak Samruddhi Yojana 2024 सरकार जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. त्याची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ती योजना म्हणजे नंदिनी कृषक समृद्धी योजना. नंदिनी कृषक समृद्धी योजना हा उत्तर प्रदेशातील सरकारने एक उपक्रम सुरू केला आहे. दुग्धोत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी दुग्ध व्यवसाय उघडण्यासाठी आणि जनावरांच्या जाती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सबसिडी प्रदान करते.
Nandani Krishak Samruddhi Yojana या योजनेअंतर्गत 25 प्रगत जातीच्या गाई लाभार्थ्याला मिळणार आहेत. भारतातील डेअरि उद्योगात मागणीत कमी वाढ होत आहे. त्यामुळे गरजा पूर्ण होत नाहीत. उत्तर प्रदेश सरकार दूध उत्पादन वाढवण्यासाठी अशा अनेक योजना राबवत असते .असाच एक उपक्रम म्हणजे नंदिनी कृषक समृद्धी योजना. UP Cow Subsidy Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी मिळणार आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा डेरी फार्म सुरू करायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ होईल.
Nandani Krishak Samruddhi Yojana नंदिनी कृषक योजना म्हणजे काय?, नंदिनी कृषक समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत?, या योजनेची पात्रता?, आवश्यक कागदपत्रे काय आहेत?, नंदिनी कृषक समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.
नंदिनी कृषक समृद्धी योजना
Nandani Krishak Samruddhi Yojana 2024
UP Cow Subsidy Yojana नंदिनी कृषी समृद्धी योजना ही उत्तर प्रदेश सरकारने 2023 मध्ये सुरू केली. नंदिनी कृषी समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गुरांच्या जाती सुधारणे हा आहे. राज्यात दूध उत्पादन वाढवणे या उद्देशाने नंदिनी कृषी समृद्धी योजना UP Cow Subsidy Yojana सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी साहिवाल, गीर, थारपारकर आणि गंगातील यासारख्या जाती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. डेअरी आयुक्त आणि मिशन डायरेक्टर या योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करतात.
ठळक मुद्दे
नंदिनी कृषक समृद्धी योजना 2024 मराठी माहिती
Nandani Krishak Samruddhi Yojana 2024 Information In Marathi
नंदिनी कृषक समृद्धी योजना
Nandani Krishak Samruddhi Yojana 2024
नंदिनी कृषी समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती
Nandani Krishak Samruddhi Yojana In Short
नंदिनी कृषक समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
Nandani Krishak Samruddhi Yojana 2024 Anudan
नंदिनी कृषक समृद्धी योजनेचे फायदे
Nandani Krishak Samruddhi Yojana Benefits
नंदिनी कृषक समृद्धी योजनेची पात्रता
Nandani Krishak Samruddhi Yojana Eligibility
नंदिनी कृषी समृद्धी योजनेचे कागदपत्रे
Nandani Krishak Samruddhi Yojana Documents
नंदिनी कृषी समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया
Nandani Krishak Samruddhi Yojana Online Apply
नंदिनी कृषी समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती
Nandani Krishak Samruddhi Yojana In Short
योजनेचे नाव | नंदिनी कृषक समृद्धी योजना |
कोणी सुरू केली | उत्तर प्रदेश |
कधी सुरू केली | 2023 |
लाभ | 25 प्रगत जातीच्या गाई |
लाभार्थी | उत्तर प्रदेशातील शेतकरी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | http://www.animalhusb.upsdc.gov.in/en |
नंदिनी कृषक समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
Nandani Krishak Samruddhi Yojana 2024 Anudan
नंदिनी कृषक समृद्धी योजनेअंतर्गत सरकार 25 दुबत्या गाईंचा म्हणजेच प्रगत जातीच्या गायींचा समावेश असलेल्या डेअरी युनिटची स्थापना करण्यासाठी 62.5 लाख रुपयांच्या अंदाजे खर्चावर भरीव 50 टक्के अनुदान देते. म्हणजेच या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी कमाल अनुदान 31.25 लाख रुपये आहे. सुरुवातीला ही योजना राज्यभरातील 10 विभागीय मुख्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना पशुपालनाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा आणि जमिनीच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
नंदिनी कृषक समृद्धी योजनेचे फायदे
Nandani Krishak Samruddhi Yojana Benefits
नंदिनी कृषक समृद्धी योजना ही तीन टप्प्यात उघडली जाते. प्रत्येक लाभार्थ्यांना अद्वितीय लाभ मिळतो पहिल्या टप्प्यात डेअरी युनिटच्या बांधकामासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते. दुसऱ्या टप्प्यात दुभत्या गाईंच्या खरेदीसाठी 12.5% सबसिडी त्यांचा तीन वर्षाचा विमा, वाहतूक आणि उर्वरित 12.5% प्रकल्पाच्या खर्चावर अंतिम टप्प्यात अनुदान दिले जाते.
नंदिनी कृषक समृद्धी योजनेची पात्रता
Nandani Krishak Samruddhi Yojana Eligibility
अर्जदार हा उत्तर प्रदेश चा मूळ रहिवासी असावा
अर्जदार शेतकरी असावा
अर्जदाराकडे पशुपालनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा
अर्जदाराकडे डेअरी युनिट स्थापन करण्यासाठी किमान 0.5 एकर आणि हिरव्या चाऱ्यासाठी 1.5 एकर जमीन असावी
नंदिनी कृषी समृद्धी योजनेचे कागदपत्रे
Nandani Krishak Samruddhi Yojana Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
नंदिनी कृषी समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया
Nandani Krishak Samruddhi Yojana Online Apply
नंदिनी कृषी समृद्धी योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो. सध्या ऑनलाईन पद्धत सुरू झालेली नाहीये. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुख्य पशुचिकित्सा अधिकारी किंवा मुख्य विकास अधिकारी कार्यालयात जावे. तेथील कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा अर्ज घ्यावा. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी. अर्ज कार्यालयात जमा करावा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
मुलींसाठीच्या सरकारच्या टॉप 10 योजना
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र
नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 साठी मंजुरी
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना