Smart Meter 2024 Information In Marathi : स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना 2024 मराठी माहिती
Smart Meter 2024 राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनन राज्य सरकारच्या महावितरण विभागाद्वारे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना 2024 लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Smart Meter 2024 या योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईल रिचार्ज प्रमाणे रिचार्ज करावे लागेल तरच त्यांना वीज पुरवठा होईल. जेवढे तुम्ही पैसे भराल तेवढीच तुम्हाला वापरता येईल. या योजनेच्या माध्यमातून स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केला आहे. याची माहिती ग्राहकाला त्याचा मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. पैसे भरले तरच वीजपुरवठा होईल अशी सुविधा या प्रीपेड मीटर मध्ये करण्यात आली आहे.

Smart Prepaid Electricity Meters चला तर मग आपण आज स्मार्ट प्रीपेड मीटर योजना 2024 Smart Meter 2024 म्हणजे काय?, या योजनेचा काय लाभ आहे?, या योजनेची कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे?, ही योजना कशी काम करते?, स्मार्ट प्रीपेड मीटर साठी रिचार्ज कसे करावे? संपूर्ण प्रश्नांची माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत.
Smart Prepaid Electricity Meters देशात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वीज बिलही थकवल्या जाते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून वीज चोरी आणि विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रणासाठी मदत होणार आहे.
Prepaid Smart Meter केंद्र सरकारची स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना लवकरच महाराष्ट्रातही लागू होणार आहे. त्यामुळे राज्यातील ग्राहकांनाही आपल्या घरी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवावे लागेल. याद्वारे वीजपुरवठ्यासाठी तुम्हाला रिचार्ज करणे आवश्यक आहे. जेवढे रिचार्ज तुम्ही कराल तेवढी वीज तुम्हाला वापरता येईल. या योजनेच्या माध्यमातून सध्या ग्राहकाकडे असलेले वीज मीटर बदलून त्या जागेवर स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवण्यात येणार आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातील वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी संघटनांनी या मीटर ला विरोध केला आहे. मात्र तरीही लवकरच ही योजना महाराष्ट्रात लागू होणार आहे.
ठळक मुद्दे
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना 2024 मराठी माहिती
Smart Meter 2024 Information In Marathi
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर म्हणजे काय
What Is Prepaid Smart Meter
स्मार्ट मीटर असे करते काम
Smart Prepaid Electricity Meters
ग्राहकावर एवढा पडेल बोजा
Smart Meter 2024 In Marathi
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर म्हणजे काय
What Is Prepaid Smart Meter
Smart Prepaid Electricity Meters सध्या राज्यात जुन्या पद्धतीचे वीज मीटर लावलेले आहेत. मात्र या योजनेच्या माध्यमातून महावितरण द्वारे ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर लावण्यात येणार आहेत. या मीटर मध्ये ग्राहकांना त्यांनी किती वीज वापरली याची माहिती पाहता येणार आहे. तसेच दर महिन्याला वीज कंपनीद्वारे नेमणूक केलेला कर्मचारी याची नोंद ठेवेल आणि त्या आधारे ग्राहकाला विज बिल पाठवण्यात येईल.
Smart Meter 2024 केंद्र सरकारची ही स्मार्ट प्रीपेड मीटर विज योजना आपल्या मोबाईल प्रमाणे काम करते. ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिचार्ज करतो त्याप्रमाणेच या स्मार्ट मीटर ला रिचार्ज करून आपण वीज वापरू शकतो. या स्मार्ट मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केला आहे याची माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये क्षणात पाहायला मिळते.
Smart Meter 2024 या स्मार्ट मीटर साठी तुम्हाला मोबाईल प्रमाणे कुठूनही रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा तुम्हाला मिळत राहील यामुळे ग्राहकांना वीज वापर कमी जास्त करता येईल आणि ग्राहक काम नसताना वीज वापरणे काही प्रमाणात कमी करतील. सध्या राज्यात ज्या ग्राहकाने वीज भरले नाही त्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो. मात्र नवीन योजनेच्या माध्यमातून विद्युत पुरवठा रिचार्ज करण्याचा आपोआप बंद होणार आहे असा दावा महावितरण कडून करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकाचे विज तोडण्यासाठी वायरमेनला जाण्याची गरज नाही यामुळे त्यांच्यात वादही होणार नाही.

स्मार्ट मीटर असे करते काम
Smart Prepaid Electricity Meters
Smart Meter स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये ग्राहकाने जेवढे रिचार्ज केले आहेत तेवढीच वीज त्या ग्राहकाला वापरता येणार आहे. ग्राहक ज्याप्रमाणे विजेचा वापर करेल त्याप्रमाणे त्याने रिचार्ज केलेले पैसे संपत जातील किती विजेचा वापर केला व त्यासाठी किती पैसे खर्च झाले याची संपूर्ण माहिती संबंधित ग्राहकाला त्याच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा स्वयंचलित पद्धतीने बंद होईल पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी ग्राहकाला रिचार्ज करणे बंधनकारक असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही रिचार्ज करून वीज पुरवठा सुरू करू शकता.
ग्राहकावर एवढा पडेल बोजा
Smart Meter 2024 In Marathi
Smart Meter राज्यात महावितरणच्या 2.25 कोटी ग्राहकाकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी 27 हजार कोटी रुपये म्हणजे प्रति मीटर 12 हजार रुपये खर्च लागणार आहे. यातील 2 हजार कोटी म्हणजे प्रति मीटर 900 रुपये केंद्र सरकार अनुदान म्हणून देणार आहे. मात्र उर्वरित रक्कम महावितरण ला कर्जरोपाने उभी करावी लागणार आहे. हे कर्ज त्यावरील व्याज घसारासह अन्य खर्च इत्यादीसाठी 1 एप्रिल 2025 पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज देयकामध्ये प्रति युनिट किमान 30 पैसे दरवाढीचा बोजा पडणार असल्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या योजनेचा फटका ग्राहकांनाही बसण्याची शक्यता आहे. डिजिटल युगात आता वीज पुरवठा ही स्मार्ट होणार आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024