Navratri Utsav 2024 in Marathi : देवी आईची नऊ रुपं, रंग, फूल आणि नैवेद्याबद्दल जाणून घेऊ!
Navratri Utsav 2024 in Marathi : नावरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीत देवीचे 9 रूप कोणते आहेत. आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसातील आईची नऊ रुपं, रंग, फूल आणि नैवेद्याबद्दल जाणून घेऊ! नवरात्रीत देवीची भक्ति, सेवा करता येईल टेनधि कमीच असते त्यामुळे आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी सेवा आपण देवीची करतो.
पहिला दिवस
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्या देवी ‘शैलपुत्री’ची पूजा केली जाते. दुर्गा आईच्या नऊ रुपांपैकी हे पहिले रुप मानले जाते. या दिवशी दुर्गा आईच्या पूजेसाठी पिवळा आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. तर आईच्या पूजेसाठी सफेद रंगाची फूलं अर्पण करावी. या दिवशी दुर्गा आईला नैवेद्य म्हणून गायीचे शुद्ध तूप ठेवावे. ज्याच्यामुळे आरोग्यासाठी आशीर्वाद मिळतो.
दुसरा दिवस
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई ‘ब्रम्हचरणी’ची पूजा केली जाते. ब्रम्हचरणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी. आई ब्रम्हचारणीच्या पूजेसाठी नारंगी आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. या दिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार अर्पण करावे. तसंच आईला साखरेचा नैवेद्य ठेवावा. त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते.
तिसरा दिवस
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रुप म्हणजे देवी ‘चंद्रघंटा’ची पूजा केली जाते. या दिवशी आईच्या पूजेसाठी क्रीम आणि राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करावे. या दिवशी आईला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करावे. तसंच आईला दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते
चौथा दिवस
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रुप म्हणजे आई ‘कुष्मांडा’ची पूजा केली जाते. या दिवशी माता कुष्मांडाच्या पूजेसाठी लाल आणि नारंगी रंगाचे वस्त्र परीधान करावे. आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला मालपोह्याचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला बुद्धी आणि त्यांच्या निर्णय शक्तीमध्ये वृध्दीचे वरदान देते.
पाचवा दिवस
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या ‘स्कंदमाता’ रुपाची पूजा केली जाते. दुर्गा आईचे पाचवे रुप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते. या दिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि क्रिम रंगाचे कपडे परिधान करावे. या दिवशी आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला केळीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
सहावा दिवस
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या् सहाव्या रुपाचे म्हणजेच आई ‘कात्यायनी’ची पूजा केली जाते. यादिवशी आईच्या पूजेसाठी लाल रंग आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. तसंच लाल आणि पिवळ्या रंगाची फूलं आईला अर्पण करावी. यादिवशी आईला मधाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे भक्ताच्या आकर्षण शक्तीमध्ये वृद्धी होते.
सातवा दिवस
नवरात्रीच्या सातव्या दिवसामध्ये आई कालरात्रीची पूजा केली जाते. आईचे हे रुप खूपच शक्तीशाली मानले जाते. यादिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. आईला निळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते.
आठवा दिवस
नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई ‘महागौरी’ची पूजा केली जाते. बरीच लोकं या दिवशी कन्या पूजन देखील करतात. आठव्या दिवशी आईची पूजा करताना मोरपंखी रंगाची कपडे परीधान करावी. आईची पूजा करताना लाल, गुलाबी आणि मोरपंखी रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते.
नववा दिवस
नवरात्रीच्या नवव्या दिवशी आई ‘सिद्धीदात्री’ची पूजा केली जाते. यादिवशी कन्या पूजन देखील केले जाते. शास्त्रानुसार आईचे हे रुप सिद्धी प्रदान करणारे आहे. या दिवशी आईच्या पूजेसाठी जांभळ्या आणि गुलाबी रंगाची कपडे परिधान करावी. या दिवशी आईला जास्वंदीची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला तीळ किंवा तीळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य ठेवावा. यामुळे चांगले परिणाम होतात.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?
नवरात्रातील 9 रंग कोणते?, आणि काय आहे शुभमुहूर्तची वेळ?
श्री रेणुकामाता प्रार्थना मराठी
नवरात्रीची संपूर्ण मराठी माहिती 2024