PM Internship Scheme 2024 Information In Marathi : पीएम इंटर्नशिप योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी माहिती
PM Internship Scheme 2024 देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव इंटर्नशिप योजना असे ठेवण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 -25 चा अर्थसंकल्प सादर करत असताना इंटर्नशिप योजना सुरू करत असल्याची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांना 12 महिने चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.
PM Internship Scheme आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पीएम इंटर्नशिप योजनेची माहिती पाहणार आहोत. पीएम इंटर्नशिप योजना ही कोणासाठी आहे. या योजनेची घोषणा कोणी केली, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू…
PM Internship Scheme 2024 या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. परंतु सध्या ती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर पासून सुरू होईल. याद्वारे निवड झालेल्या तरुणांना दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर सहभागी झाल्यानंतर त्यांना एक रक्कमी 6 हजार रुपये देखील दिले जातील. या योजनेची अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. तर 10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांची माहिती पोर्टलवर देतील. पोर्टल www.pminternship.mca.gov.in हे आहे. १० ऑक्टोंबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिपची पदाची माहिती या पोर्टलवर देतील, त्यानंतर 12 ऑक्टोंबरपासून हे पोर्टल उमेदवारांसाठी खुले होईल. पीएम इंटर्नशिप योजनेसाठी उमेदवार हे 12 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत त्यांची पात्रता आणि इतर माहिती अपलोड करून या योजनेसाठी अर्ज करू शकतील. त्यानंतर मंत्रालय एक शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी कंपन्यांना देईल. 27 ऑक्टोंबर पासून या योजनेची निवड प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कंपन्या उमेदवार निवडतील, त्यानंतर ऑफर्स स्वीकारण्यासाठी उमेदवारांना 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. उमेदवाराला पहिली ऑफर आवडत नसेल तर त्याला आणखी दोन ऑफर दिल्या जातील, त्यानंतर कोणतीही ऑफर दिली जाणार नाही म्हणजेच या योजनेअंतर्गत एकूण तीन ऑफर दिल्या जातील. उमेदवार जास्तीत जास्त पाच पदासाठी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील.
इंटर्नशिप योजना म्हणजे काय?
What Is PM Internship Scheme
PM Internship Scheme 2024 केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी सरकार इंटर्नशिप प्रदान करण्यासाठी एक नवीन योजना सुरू करत असण्याची घोषणा केली होती. तसेच पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. या योजनेच्या माध्यमातून तरुणा व्यवसायाचे वातावरण हा विविध व्यावसायिक क्षेत्रात बारा महिने काम करण्याच्या संधी देण्यात येणार आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांना लवकरच संधी उपलब्ध होईल.
ठळक मुद्दे
पीएम इंटर्नशिप योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी माहिती
PM Internship Scheme 2024 Information In Marathi
इंटर्नशिप योजना म्हणजे काय?
What Is PM Internship Scheme
पीएम इंटर्नशिप योजनेची थोडक्यात माहिती
PM Internship Scheme In Short
या कंपन्यांचा समावेश
PM Internship Scheme Involve Company
असे दिले जाणार आरक्षण
PM Internship Scheme 2024 In Marathi
इंटर्नशिप योजनेची पात्रता
PM Internship Scheme Eligibility
पीएम इंटर्नशिप योजनेची थोडक्यात माहिती
PM Internship Scheme In Short
योजनेचे नाव | पीएम इंटर्नशिप योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील तरुण |
लाभ | 1 कोटी तरुणांना नोकरी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत पोर्टल | www.pminternship.mca.gov.in |
या कंपन्यांचा समावेश
PM Internship Scheme Involve Company
पीएम इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून 3 ऑक्टोंबर ला 111 अधिक कंपन्यांनी पायलेट अंतर्गत 1077 हून अधिक ऑफर ठेवले आहेत. या कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, अलेम्बिक फार्मा, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, या कंपन्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारची ही इंटर्नशिप योजना महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि उत्तराखंड मधील तरुणांसाठी सुरू करण्यात आली आहे. या राज्यातील उमेदवारांनी कॉल सेंटर नंबर 18000161090 फोन करून इंटरसिटी योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
असे दिले जाणार आरक्षण
PM Internship Scheme 2024 In Marathi
या योजनेच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी 800 कोटी रुपये चा निधी मंजूर करण्यात आला आहे. इंटर्नशिप योजनेचा माध्यमातून केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षण देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नोकरीच्या संधीसाठी उमेदवारांना बारा महिन्याचा अनुभव म्हणजेच इंटर्नशिप दिली जाणार आहे.
इंटर्नशिप योजनेची पात्रता
PM Internship Scheme Eligibility
अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 24 वर्ष दरम्यान असावे.
अर्जदार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
या योजनेत कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या तरुणांना या योजनेत सहभागी होणार नाही.
अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असला तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
केंद्र सरकारच्या इंटरशिप योजनेसाठी निवड झालेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना संरक्षणही दिले जाणार आहे. यासाठीचा प्रीमियम हप्ता सरकारच्या वतीने धरण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त उमेदवाराची निवड करणाऱ्या कंपन्याही उमेदवारांना अतिरिक्त विमा अपघात संरक्षण देऊ शकतात.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना