Skandamata Devi Information In Marathi : शारदीय नवरात्रीतील देवीचे पाचवे रूप स्कंदमाता देवी
Skandamata Devi 2024 नवरात्रातील नऊ दिवसाचे दुर्गेचे नऊ रूपे आपण पहात आहोत. त्यामध्ये आजचा दिवस पाचवा दिवस आहे. दुर्गेचे पाचवे रूप म्हणजेच स्कंदमाता देवी आहे. दुर्गेच्या पाचव्या रूपाला स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावाने ओळखले जातात. ते देवा संग्रामाचा देवतांचे सेनापती बनले होते पुरानात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
Navratri 2024 स्कंदमाता चार भुजा आहेत. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचलली आहे त्या हातात कमळाचे फुल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फुल घेतलेले आहे. या देवीचा रंग शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे. तर स्कंदमाता देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता देवी ही कमळाच्या आसणावर विराजमान असल्यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हणले जाते. नवरात्रीत पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व आहे. सर्व बंधनातून भक्ताचे मन मुक्त होऊन पद्मासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. यादरम्यान भक्ताला पूर्ण सावधगिरीने उपासना करावी लागते. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची मनोकामना पूर्ण होते. मृत्युलोकात त्याला परम शांती मिळते. या उपासनेमुळे मोक्षाचा मार्ग सोपा होतो.
Skandamata Devi स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्य मंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवी असल्यामुळे या दिवशी साधकांचे मन स्थिर झालेले असते.
Skandamata Devi दुर्गा मातेच्या पाचव्या रूपाला स्कंदमाता असे का म्हणतात तर भगवान स्कंद हे लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते म्हणून या देवीला स्कंदमाता देवी म्हणून ओळखले जाते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केला आहे. भगवान स्कंदाची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्तंदमाता म्हणून ओळखले जाते. ही स्कंदमाता चार भुजाधारी आहे. स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात देवीच्या या रूपाची आराधना केल्याने शौर्यसह करुणा वाढीस लागते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA