PM Kisan Yojana : 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली

PM Kisan Yojana Installment In Marathi : या दिवशी जमा होणार रक्कम

PM Kisan Yojana Installment In Marathi : गेल्या अनेक दिवसापासून देशभरातील शेतकरी पीएम किसान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत होते. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण पीएम किसान योजनेच्या अधिकृत अकाउंट (X) वर 20 जून 2026 रोजी 23 वा हप्ता जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये थेट महाडीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते.

PM kisan 23rd installment on June 20

कधी येणार 23 वा हप्ता

PM Kisan Yojana 23th Installment In Marathi : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत 23 वा हप्ता 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून 23 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत होते. या बातमीमुळे ती प्रतीक्षा आता संपली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

PM Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळतो ज्यांचे नाव बेनिफिशरी यादीमध्ये असते. याबरोबरच ज्यांनी आवश्यक फॉर्मॅलिटी पूर्ण केली आहे. यामध्ये e-kyc, आधार-बँक अकाउंट लिंकिंग आणि जमिनीचे रेकॉर्ड व्हेरिफिकेशन केले आहे. यापैकी कुठल्याही गोष्टींमध्ये गोंधळ दिसल्यास हप्ता अडकू शकतो.

मोबाईलद्वारे स्टेटस चेक करण्याची प्रक्रिया

How to status check

पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल किंवा नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या मदतीने ते पाहू शकता. वेबसाईटवर काही टिप्स केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.

यासाठी सर्वात प्रथम पीएम किसान या पोर्टलवर जा.
होम पेजवर दिलेल्या बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा.
आता आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर नोंदवा.
स्क्रीनवर दिलेला कॅपच्या कोड भरा.
यानंतर गेट डेटा या पर्यायावर क्लिक करा.
एवढी प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट संबंधित संपूर्ण माहिती आणि पेमेंट संदर्भातील स्टेटस स्क्रीनवर दिसेल.