PM Modi Best Schemes In Marathi : मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्यांनी सुरू केलेल्या महत्त्वाच्या काही योजना
PM Modi Best Schemes In Marathi : आज मोदींचा 75 वा वाढदिवस, आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2025 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देशातील सामान्य गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या जनकल्याणकारी योजनांचा आढावा आपण घेणार आहोत.
कारण याच योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व व्यक्ती त्यांना ओळखतात.
PM Modi Best Schemes देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर म्हणजेच आज वाढदिवस आहे. हा त्यांचा 75 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 ला गुजरात मध्ये झाला होता. ते सतत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.
PM Narendra Modi 75 th Birthday Best Schemes त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाच्या योजना सुरू झाल्या, ज्यामुळे त्या गरिबांसाठी वरदान ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा कुठल्या योजना आहेत ज्या योजनांमुळे मोदी देशातील प्रत्येक कुटुंबाच्या घराघरापर्यंत पोहोचले.
PM Narendra Modi 75 th Birthday Best Schemes देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 75 वर्षाचे झाले आहेत. पीएम मोदी अधिक काळापासून पंतप्रधान असलेले गैर कामगिरीचे पंतप्रधान आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यांच्या इंडिया फर्स्ट नीती चे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना महान प्रधानमंत्री असल्याचे म्हटले आहे, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनीही त्यांना बॉस असे म्हटलेले आहे.
त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत अनेक अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत ज्या देशातील गरिबांसाठी वरदान ठरल्या आहेत.
PM Modi Best Schemes यामुळे गावातील गरिबी मजूर शेतकरी यांच्या जीवनात बदल होण्यास मदत झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित योजना.
प्रधानमंत्री उज्वला योजना
Pradhanmantri Ujjwala Yojana
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 ला उत्तर प्रदेशच्या बलिया मधून प्रधानमंत्री उज्वला योजना ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण आणि वंचित कुटुंबातील लोकांना LPG सारखे स्वच्छ अन्न शिजवण्याचे साधन उपलब्ध करून देणे आहे.
ही योजना अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली जे इंधन म्हणून कोळसा, लाकूड, गौऱ्या यांचा वापर करतात आणि आपली जेवण तयार करतात. या योजनेअंतर्गत BPL कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन आणि सबसिडी वर 12 सिलेंडर सरकारकडून दिले जातात.
आतापर्यंत 10 कोटी पेक्षा अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या सरकारी योजनेने ग्रामीण भाग आणि गरीब कुटुंबातील लोकांना मोठा दिलासा दिला आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना
Pradhanmantri Fasal Bima Yojana
ही योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदान पेक्षा कमी नाही. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या पीकांचे दुष्काळ आणि अतिवृष्टी काळामध्ये संरक्षण केले जाते आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून भीमा केंद्र सरकारकडून दिला जातो.
या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत फसल बीमा दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना इन्शुरन्स प्रीमियम चे केवळ 50% रक्कम द्यावी लागते.
बाकीचे 50 % रक्कम केंद्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारे अनुदान स्वरूपात दिली जाते. 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना
PM Jan Dhan Yojna
सामान्य जनतेला बँकिंग सेक्टर शी जोडण्यासाठी केंद्र सरकारने 2014 मध्ये पीएम जनधन योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत गरिबातील गरीब लोकांना झिरो बॅलन्स द्वारे बँक मध्ये खाते उघडून देण्यात आले.
या अकाउंट द्वारे सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. खातेधारकाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये पर्यंत ची रक्कम मदत म्हणून दिली जाते. जर एखादा व्यक्ती अपंग झाल्यास त्याला 1 लाखापर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
या व्यतिरिक्त जनधन खातेदार काळात 30 हजार रुपये पर्यंतचे लाइफ इन्शुरन्स कव्हर पण दिले जाते यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित होते आणि त्यांना विमा संरक्षण मिळते.
याबरोबरच त्यांना अशा प्रकारच्या विविध सुविधा या खात्याअंतर्गत दिला जातात यामध्ये ओरड्राफ्ट सर्विस द्वारे 10,000 रुपये ची निकासी सुविधा पण दिली जाते.
पीएम आवास योजना
PM Awas Yojana
मोदी सरकारने देशातील प्रत्येक गरीबाच्या डोक्यावर घराचे छत असावे यासाठी 25 जून 2025 ला पीएम आवास योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांना त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान सरकारकडून दिले जाते. यामध्ये नवीन घर घेणाऱ्या महिलेला 2.5 लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. या योजनेअंतर्गत उत्पन्नानुसार कर्ज आणि कर्जावर अनुदान दिले जाते. या योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागामध्ये अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पीएम किसान सन्माननिधी योजना
PM Kisan Yojana
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 2019 मध्ये केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपये आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये दिली जाते.
प्रत्येक टप्प्यामध्ये 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. याचा देशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
पीएम गरीब कल्याण अन्न योजना
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेली पुढील योजना मोफत रेशन संबंधित आहे. 26 मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ची सुरुवात झाली आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल 80 कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला 5 किलो मोफत अन्न दिले जाते. सरकारकडून सतत या योजनेचा कार्यकाळ वाढवत जात आहे. आता ही योजना 2029 पर्यंत सुरू राहणार आहे.
आयुष्मान भारत योजना
PM Ayushman Bharat Yojana
आयुष्मान भारत योजना मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिले जातात. 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लोकांना आयुष्यमान कार्ड दिले जाते. त्या कार्डच्या मदतीने व्यक्ती सहज आपल्याला असलेल्या आजारावर मोफत उपचार करू शकतो.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत 34 कोटीपेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले आहेत. यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीलाही चांगले आणि दर्जेदार उपचार घेता येत आहेत.
पीएम अटल पेन्शन योजना
atal pension yojana
पीएम अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 मध्ये झाली. यामध्ये गुंतवणूक केल्यावर सरकार पेन्शनच ची गॅरंटी देत आहे. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना लक्ष ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात नियमित पद्धतीने गुंतवणूक केल्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच निवृत्तीनंतर अधिक तर 5000 रुपये पर्यंत ची पेन्शन या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीला दिली जाते.
पीएम स्वनीधी योजना
PM Svanidhi Yojana
मोदी सरकारने स्वयंरोजगाराला प्रोत्साहन करण्यासाठी प्रधानमंत्री स्वनीधी योजना ची सुरुवात केली आहे. ही योजना कोरोना काळामध्ये 1 जून 2020 सुरुवात झाली.
या योजनेअंतर्गत कामगार मजूर विना गॅरंटीचे 50 हजार रुपयांची कर्ज त्यांना दिले जाते. प्रधानमंत्री स्वनीधी योजना अंतर्गत सरकारी कर्ज योजना आहे. जी शहरी भागातील ट्रीट वेंडर यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.
पात्रतेसाठी वेंडर चे 24 मार्च 2020 पूर्वी रस्त्यावर व्यवसाय करणे आणि नगरपंचायत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ट्रीट वेंडर यांना संस्थागत आर्थिक मदत करून त्यांना त्यांचे जीवन आणि व्यवसायामध्ये साहित्य प्रदान करणे आहे.
सरकारी डॅश बोर्ड नुसार आतापर्यंत 13,790 कोटी पेक्षा अधिक रक्कम पात्र लोकांना देण्यात आली आहे.
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना
PM Surya Ghar Yojana
2024 मध्ये लोकांना मोफत वीज देण्याच्या उद्देशाने पीएम सूर्यघर योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत लोकांना सौर पॅनल लावण्यासाठी अनुदान दिले जाते.
या योजनेची सुरुवात 15 फेब्रुवारी 2024 ला झाली. या योजनेअंतर्गत लाभार्थीला 300 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाते.
याव्यतिरिक्त सोलर पॅनल लावण्यासाठी सरकारकडून 78000 रुपये पर्यंत अनुदानही दिले जाते.