PM Shri Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री श्री योजना 2024मराठी माहिती
PM Shri Yojana 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पीएम श्री शाळेची योजना 2022-23 ते 2026 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकूण 27 हजार 360 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. यातून देशातील सर्व शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
PM Shri Yojana केंद्र सरकार, राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था द्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशातील 14 हजार 500 हून अधिक शाळांचा विकास पीएम श्री शाळा योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्री शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे सर्व घटक समाविष्ट असतील.
PM Shri Yojana 2024 देशभरात या आदर्श शाळा म्हणून काम करतील याबरोबरच या शाळेच्या जवळपास असणाऱ्या शाळांनाही या शाळा मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षक देण्यात येणार आहे.
21 व्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्याने सुसज्ज सर्वांगीण आणि सर्वगुणसंपन्न व्यक्ती तयार करण्यासाठी आणि त्याच्या कौशल्याची जोपासना करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री योजना नेमकी काय आहे?, याची वैशिष्ट्ये काय?, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ची पद्धत काय आहे? आदि संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
PM Shri Yojana 2024 प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील 846 शाळा अग्रगण्य संस्थांमध्ये बदलण्यात येतील. यासाठी राज्य सरकार व फेडरल सरकारने एक करारनामा केला असून पंतप्रधान श्री योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभरात 150 हून अधिक शाळा सुरू केल्या जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रात 846 नवीन शाळा बांधण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
PM Shri Yojana महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री श्री योजनेत सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाराष्ट्रात लागू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. या योजनेचा खर्च 60 टक्के केंद्र सरकार करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक संस्थेला 5 वर्षासाठी 1 कोटी 88 लाख रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच केंद्र सरकार या संस्थांना 5 वर्षात 955 कोटी 98 लाख रुपये देणार असून राज्य सरकार 40% म्हणून 634 कोटी 50 लाख रुपये देणार आहे. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक शाळेला 5 वर्षाच्या कालावधीसाठी 75 लाख रुपये देणार आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेच्या PM Shri Yojana शाळांच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात 408 गट 28 महानगरपालिका आणि 383 नगरपालिका नगरपरिषदेमधून प्रधानमंत्री श्री योजनेसाठी शाळा निवडण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्री शाळा योजना (पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया) एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून एकूण प्रकल्प खर्च 27 हजार 360 कोटी रुपये एवढा आहे. 2022-23 ते 2026-27 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 18,128 कोटी रुपयांचा केंद्रीय हिस्सा समाविष्ट करण्यात आला आहे.
PM Shri Yojana भारताची जगभर तरुणाचा देश म्हणून ओळख आहे आणि भारतातील तरुणांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपण आपल्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणतो. पीएम श्री योजना ही योजना केंद्र सरकारने प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण मिळेल याची हमी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वकांक्षी योजना आहे.
PM SHRI School या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक आस्थापनाचे पुनर्जीवन करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या अनुकरणीय आस्थापनामध्ये रूपांतरित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री श्री योजना म्हणजे काय ?
What Is PM Shri Yojana 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जुन्या शाळांचे आधुनिकरण करणे आणि तरुणांना स्मार्ट शिक्षणाशी जोडण्यासाठी ही नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेला प्रधान मंत्री श्री योजना PM SHRI Yojana असे नाव देण्यात आले आहे. 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची माहिती ट्विटर द्वारे दिली होती. यावेळी ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, आज शिक्षक दिन आहे, मला एक नवीन योजना सुरू करताना मोठा आनंद होत आहे. प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया पीएम श्री योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात 14,500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत किंवा त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या भावनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या ह्या मॉडर्न शाळा असतील. या शाळेमध्ये सर्व आधुनिक सुविधा पुरवणे हा सरकारचा मुख्य हेतू आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षक मिळू शकेल.
प्रधानमंत्री श्री योजनेचा फुल फॉर्म
PM Shri Yojana Full Form
केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया स्कीम असे आहे.
पीएम श्री योजना अंतर्गत निवड प्रक्रिया
PM SHRI Yojana
प्रधानमंत्री श्री योजनेच्या PM Shri Yojana Scheme माध्यमातून शाळांची निवड चॅलेंज मोडद्वारे केली जाईल. याद्वारे आदर्श शाळा भरण्यासाठी शाळा एकमेकांशी स्पर्धा करतील मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी शाळांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच योजनेच्या पहिल्या दोन वर्षासाठी पोर्टल वर्षातून चार वेळा तर दर तीमाहिक एकदा उघडले जाईल.
प्राथमिक शाळा (वर्ग पहिली ते पाचवी, पहिली ते आठवी) आणि माध्यमिक वरिष्ठ माध्यमिक शाळा (वर्ग पहिली ते दहावी, पहिली ते बारावी, सहावी ते दहावी, सहावी ते बारावी) केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य व्यवस्थापित योजनेच्या माध्यमातून निवडीसाठी udise प्लस कोड असलेल्या सरकारचा विचार केला जाईल.
या योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये निवड निश्चित वेळेनुसार करण्यात येणार आहे. तीन टप्पे खालील प्रमाणे
पहिला टप्पा – या योजनेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात प्रधानमंत्री श्री शाळा म्हणून विशिष्ट गुणवत्ता पात्र करण्यासाठी, या शाळांना पाठिंबा देण्यासाठी, केंद्रासोबत nep लागू करण्यास संमती दर्शवत सामंजस्य करारावर सही करण्यात येईल.
दुसरा टप्पा – प्रधानमंत्री श्री शाळा म्हणून निवडल्या जाणाऱ्या पात्र असलेल्या शाळांचा एक पूल udise प्लस डेटा द्वारे निश्चित बेंचमार्कच्या ओळखला जाईल
तिसरा टप्पा – याद्वारे निकष पूर्ण करण्यासाठी आव्हान पद्धतीवर आधारित आहे. केवळ वरील पात्र शाळाच आव्हानात्मक परिस्थिती करण्यासाठी स्पर्धा करतील. सर्व अटींची पूर्तता राज्य केव्हीएस/ जे एन व्ही द्वारे भौतिक तपासणी द्वारे निश्चित केली जाईल.
PM Shri Yojana Scheme योजनेच्या माध्यमातून शाळांनी केलेले अर्ज राज्य, केंद्रशासित प्रदेश, KVSJNV तपासणी करतील आणि त्यानंतर या शाळांची यादी शिफारस करून केंद्र सरकारच्या मंत्रालयात पाठवून देतील.
संपूर्ण देशभरातील एकूण शाळेच्या संख्येवरून प्रत्येक ब्लॉक ULB साठी अधिकाधिक दोन शाळा (एक प्राथमिक आणि एक माध्यमिक/ वरिष्ठ माध्यमिक) ची निवड केली जाईल.
PM Shri Yojana Scheme योजनेच्या माध्यमातून शाळेची निवड आणि देखरेख करण्यासाठी शाळेचे जिओ टॅपिंग करण्यात येणार आहे. जिओ टॅपिंग आणि अन्य संबंधित कामासाठी भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लीकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स ची मदत घेण्यात येणार आहे. याबरोबरच देशभरातील शाळांची निवड करण्यासाठी अंतिम तज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल.
राज्य आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक पातळी घटनेसाठी प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. प्रत्येक मध्यम श्रेणीतील मुल अत्याधुनिक व 21 व्या शतकातील कौशल्याशी संपर्क साधेल. या योजनेच्या माध्यमातून माध्यमिक इयत्तातील मुलं किंवा एका कौशल्याने उत्तीर्ण होतील.
प्रत्येक मुलासाठी खेळ, कला, आयसीटी आवश्यक योजनेच्या माध्यमातून शाश्वत आणि हरित शाळा करणे, शाळांना मार्गदर्शनासाठी देशभरातील प्रत्येक शाळा उच्च शिक्षण संस्थाची जोडण्यात येईल. निवड झालेली शाळा स्थानिक उद्योजकीय संस्थेची जोडण्यात येईल. मुलाचे मनोवैज्ञानिक कल्याण आणि करिअर साठी समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येईल.
PM Shri Yojana Scheme शाळांमधून विद्यार्थ्यांना संपूर्ण ज्ञान मिळेल. ते भारताचे सभ्यता आणि मूल्यांचा अभिमान मिळतील समाज प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव या विद्यार्थ्यांना असेल. हे विद्यार्थी भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम बनतील. याबरोबरच सर्वसमावेशक समानतेचा आदर करतील. तसेच एक भारत श्रेष्ठ भारतच्या भावनेला हे विद्यार्थी पुढे नेतील. अशा पद्धतीचे शिक्षण या शाळेच्या माध्यमातून देण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे चारित्र्य निर्माण नागरिकत्व मूल्य मूलभूत कर्तव्य आणि राष्ट्रीय उभारण्याच्या जबाबदाऱ्या मुलांच्या सर्व विकासावर लक्ष केंद्रित करून या शाळा अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येते.
PM SHRI Yojana केंद्र सरकारने देशातील शाळांचे आधुनिकीकरण आणि तरुणांना स्मार्ट शिक्षणाची जोडण्यासाठी ही एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील काही शाळांची निवड केल्या जाईल. निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये सर्व अत्याधुनिक शिक्षण पद्धती शिकवल्या जातील. जेणेकरून या शाळेत शिकणारा विद्यार्थी सर्व गुणसंपन्न असा निर्माण होईल. याकडे केंद्रीय समितीचेही लक्ष असेल आणि त्याला त्या दर्जाचे शिक्षण दिले जाईल.
PM SHRI Yojana योजनेच्या माध्यमातून देशभरात 14,500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ह्या संपूर्ण शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या भावनेला मूर्त रूप देणाऱ्या मॉडल स्कूल असतील. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल याची हमी सरकार देईल. या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या शैक्षणिक आस्थापनाचे पुनर्जीवन करण्यात येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 ची उद्दिष्टे दर्शवणाऱ्या अनुकरणीय आस्थापनामध्ये रूपांतरित करणे हा या योजनेचा उद्देश आहे
देशभरातील 14,500 मोडकळी झालेल्या शाळांना आधुनिक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री श्री योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया स्कीम असे ठेवण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेबद्दल महत्वाचे
PM Shri Yojana Details
PM SHRI Yojana देशभरातील अशा विविध ठिकाणावरच्या शाळांची या योजनेमार्फत निवड करण्यात आली असून निवड करण्यात आलेल्या शाळांची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यांना आधुनिक करण्यात येणार आहे. अपग्रेडचा भाग म्हणून सरकारी ओळख असलेल्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार केले जातील याबरोबरच खेळाचे पुरेशे साहित्यही उपलब्ध करण्यात येईल. काही कालबाह्य झालेल्या शाळांच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यांना सुंदर बनवण्यात येणार आहे. तिथे आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही संपूर्ण कामे प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक ब्लॉगमध्ये एक शाळा तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यातील एक माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळा समाविष्ट करण्याचा सरकारचा हेतू आहे.
PM SHRI Yojana देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनानिमित्त या योजनेच्या उद्घाटन केल्यानंतर या योजनेला 7 सप्टेंबर 2022 रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून सुरु होणाऱ्या या शाळांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने केंद्राने ही योजना सुरू केली आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेच्या PM SHRI Yojana माध्यमातून पुढील 5 वर्षांमध्ये 27 हजार 360 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा सरकारचा मानस आहे. सर्व शिक्षा KVS आणि NVS च्या विद्यमाने प्रशासकीय संरचनांचा अंमलबजावणीसाठी वापर करण्यात येणार आहे. या शाळेच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल.
ठळक मुद्दे :
प्रधानमंत्री श्री योजना 2024 मराठी माहिती
PM Shri Yojana 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री श्री योजना म्हणजे काय ?
What Is PM Shri Yojana 2024
प्रधानमंत्री श्री योजनेचा फुल फॉर्म
PM Shri Yojana Full Form
पीएम श्री योजना अंतर्गत निवड प्रक्रिया
PM SHRI Yojana
प्रधानमंत्री श्री योजनेबद्दल महत्वाचे
PM Shri Yojana Details
पीएम श्री योजनेची थोडक्यात माहिती
PM SHRI Yojana In Short
प्रधानमंत्री श्री शाळेचे फायदे
PM Shri Yojana Benefits
प्रधानमंत्री श्री योजनेचे लाभार्थी
PM Shri Yojana Benefisior
प्रधानमंत्री श्री योजनेची वैशिष्ट्ये
PM Shri Yojana Features
पीएम श्री योजनेची उद्दिष्ट्ये
PM SHRI Yojana Purpose
प्रधानमंत्री श्री योजनेच्या पात्रता व अटी
PM SHRI Yojana Terms And Conditions
प्रधानमंत्री श्री योजनेसाठीची कागदपत्रे
PM Shri Yojana 2024 Documents
प्रधानमंत्री श्री योजनेसाठी शाळा नोंदणी आणि निवड
PM Shri Yojana 2024
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
पीएम श्री योजनेची थोडक्यात माहिती
PM SHRI Yojana In Short
योजनेचे नाव | पीएम श्री योजना |
योजनेचे पूर्ण नाव | प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया |
योजना कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
कधी सुरू केली | सप्टेंबर 2022 |
उद्देश | देशातील जुन्या शाळांना मॉडर्न शाळा बनवणे |
लाभार्थी | निवड करण्यात आलेल्या शाळा व त्यातील विद्यार्थी |
शाळेची संख्या | 14500 शाळांची निवड करणार |
अधिकृत वेबसाईट | https://dsel.education.gov.in/pm-shri-schools |
प्रधानमंत्री श्री शाळेचे फायदे
PM Shri Yojana Benefits
- प्रधानमंत्री श्री योजनेच्या PM SHRI Yojana 2024 माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला भाषेचे ज्ञान, शैक्षणिक क्षमता निर्माण केली जाईल.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी आणि समाजासाठी मौल्यवान योगदान देण्यासाठी त्यांचा विकास करण्यात येईल.
- पाच वर्षात प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून प्रकल्पाची एकूण रक्कम 27 हजार 360 कोटी असून या माध्यमातून देशभरात 14,500 शाळा ग्रेट करण्यात येणार आहेत. म्हणजेच आधुनिक करण्यात आल्यानंतर
- PM Shri Yojana शाळा बांधताना सोलर पॅनल, एलईडी लाइटिंग, पोषण उद्यान, नैसर्गिक शेती, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण यांच्या एकत्रीकरणासह या शाळा शाश्वतेवर लक्ष करून डिझाईन करण्यात येणार आहेत.
- हवामान बदलावरील कार्यशाळा, पर्यावरणीय पद्धतीवर संशोधन, निरोगी दृष्टिकोनासाठी प्रभावी ज्ञान, व्यवस्थापन हे सर्व अभ्यासक्रम या शाळेमध्ये शिकवण्यात येणार आहेत.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे या शाळेच्या माध्यमातून लक्ष देण्यात येणार आहे.
- प्रत्येक क्षेत्रासाठी कार्य प्रशिक्षण निकष आणि विद्यमान संसाधनाच्या प्रभावतेचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री श्री योजनेचे लाभार्थी
PM Shri Yojana Benefisior
प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून देशभरातील 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होण्याची अपेक्षा आहे, याबरोबरच प्रधानमंत्री श्री शाळेच्या जवळ असणाऱ्या शाळांना देखील मार्गदर्शन करून तेथील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेची वैशिष्ट्ये
PM Shri Yojana Features
- PM SHRI Yojana योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक शिक्षण, आनंदी वातावरण, उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री श्री योजना या शाळांना अपग्रेड करते.
- PM SHRI Yojana शाळेच्या माध्यमातून बहुभाषिक शिक्षण आणि विविध शैक्षणिक क्षमतेची पूर्तता करण्यात येणार आहे.
- PM SHRI Yojana योजनेच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता सुधारण्यात येणार आहे. आणि त्या आजूबाजूंच्या शाळांनाही मार्गदर्शन करून त्यांची ही गुणवत्ता सुधारण्यास मदत करणार आहेत.
- पाणी व्यवस्थापन, पोषण, उद्याने, सौर पॅनल, एलईडी लाइटिंग यासारख्या वैशिष्ट्यासह शाळा पर्यावरण पूरक डिझाईन केली जाईल.
- या माध्यमातून पर्यावरणीय परंपरांना प्रोत्साहन देण्यात येईल, त्यामुळे शाश्वत जीवनशैली संदर्भात जागरूकता वाढवण्यात मदत होईल.
- या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायक शिक्षण शास्त्राचा अवलंब करतात.
- प्रधानमंत्री श्री योजनेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाच्या विकासासाठी शिक्षक लक्ष देतील. यामध्ये संकल्पनात्मक आकलन, व्यवहारिक ज्ञान आदी गोष्टीकडे भर दिला जाईल.
- स्थानिक व्यवसाय सेक्टर स्किल कौन्सिलसह रोजगार क्षमता सुधारण्यासाठी या शाळेची मदत होणार आहे.
- शाळा गुणवत्ता मूल्यांकन प्रेमवर्क चा भाग म्हणून प्रमुख कामगिरी ठरतील.
- PM SHRI Yojana शाळेमध्ये कशा पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा विकास कशा पद्धतीने होईल हे या मूल्यांकनातून समोर येत राहील.
पीएम श्री योजनेची उद्दिष्ट्ये
PM SHRI Yojana Purpose
- शिक्षणात बहुभाषिक गरज, मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतेची काळजी, सर्वसमावेशक आणि आनंदी शालेय वातावरण, उच्च दर्जाचे शिक्षण प्रधानमंत्री श्री शाळेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून जवळपास असलेल्या सर्व शाळांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळेल.
- देशात प्रधानमंत्री श्री शाळांना हरित शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
- या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाच्या शिकण्यातून काय निष्पन्न झाले याचे मूल्यमापन करण्यात येईल.
- वैचारिक समाज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये ज्ञानाच्या वापरावर योग्य ते सर्व स्तरावरील मूल्यमापन करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेच्या पात्रता व अटी
PM SHRI Yojana Terms And Conditions
- प्रधानमंत्री श्री योजनेत अशा शाळा पात्र असतील ज्यांची या योजनेत निवड करण्यात येईल. त्यामुळे देशातील निवडलेल्या शाळांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेसाठीची कागदपत्रे
PM Shri Yojana 2024 Documents
प्रधानमंत्री श्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांनी किंवा शाळेला कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. कारण या शाळांची निवड सरकारची समिती करेल आणि निवड झालेल्या शाळा आधुनिक पद्धतीने बांधण्यात येतील.
प्रधानमंत्री श्री योजनेसाठी शाळा नोंदणी आणि निवड
PM Shri Yojana 2024
या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वात प्रथम शाळांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
हे पोर्टल दरवर्षी 3 महिन्यातून एकदा उघडण्यात येते
त्यानंतर कोणत्या शाळांना अपडेट करणे आवश्यक आहे हे ओळखण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची एक समिती याची संपूर्ण तपासणी करेल
त्यानंतर एक अहवाल तयार करेल प्रत्येक ब्लॉकमधून जास्तीत जास्त 2 शाळा निवडल्या जातील
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विशेष समिती च्या माध्यमातून अंतिम निवड करण्यात येईल
प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून कोणत्या शाळेचे आधुनिकीकरण करण्यात येईल याची यादी संबंधित विभागाकडून अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात येईल
जर तुमच्या शाळेने यासाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला पोर्टल वर जाऊन यादी तपासता येईल आणि त्यात आपल्या शाळेचे नाव आहे का हे कळेल
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: प्रधानमंत्री श्री योजनेचा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर: केंद्र सरकारच्या या योजनेचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया स्कीम असे आहे.
प्रश्न: प्रधानमंत्री श्री योजना म्हणजे काय?
उत्तर: प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणच्या शाळेची निवड करण्यात येईल, नियुक्त केलेल्या शाळांमध्ये सुधारणा करण्यात येतील, अपडेटचा भाग म्हणून सरकारी ओळख असलेल्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार करण्यात येणार आहेत, त्यासोबतच खेळाचे पुरेशी साहित्य पुरवण्यात येईल व कालबाह्य झालेल्या शाळांच्या इमारतीचे नूतनीकरण करून आधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील.
प्रश्न: प्रधानमंत्री श्री योजनेचे बजेट किती?
उत्तर: केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री श्री योजनेसाठी 27 हजार 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याद्वारे देशातील निवडक शाळांचा विकास करणे हा उद्देश आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA