PM Surya Ghar Yojana 2024 in marathi : सूर्य घर योजनेतून 1 कोटी कुटुंब होणार प्रकाशमान

PM Surya Ghar Yojana 2024 information पीएम सूर्य घर योजना 2024 मराठी माहिती

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना PM Surya Ghar Muft Bijli Yojana ही एक सरकारी योजना आहे. तिचा उद्देश देशातील घरांना मोफत वीज पुरवणे हा आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. सबसिडी सौर पॅनल च्या लागलेल्या खर्चावर 40 टक्के पर्यंत दिली जाईल या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे. या योजनेसाठी प्रति वर्ष 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे?, त्या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?, त्या योजने ची पात्रता काय आहे?, अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबीयांना मोफत वीज पुरवठा मिळणार आहे. यामुळे सरकारची 50 लाख रुपयांची बचत होणार आहे. देशातील एक कोटी नागरिकांना तर या योजनेचा फायदा होणारच आहे परंतु सरकारचा सुद्धा या योजनेमार्फत भरपूर फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबीयांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 40% पर्यंत सबसिडी देखील मिळणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमुळे  PM Surya Ghar Yojana नागरिकांना आता वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही.

PM Surya Ghar Yojana
सरासरी मासिक बिलउपयुक्त पॅनल क्षमतासबसिडी मदत  
0-1501-2 किलोवॅट30000 ते 60000
150-3002-3 किलोवॅट60000 ते 780000
3003 किलोवॅट पेक्षा अधिक780000

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सोलर ऊर्जा क्षमता वाढवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेद्वारे देशात राहणाऱ्या लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. पीएम सूर्य घरी योजनेच्या माध्यमातून देशात राहणाऱ्या एक कोटी घरांना सौर विजेचा प्रकाश देण्यात येणार आहे.

जर तुम्हालाही पीएम सूर्य घर योजना 2024 PM Surya Ghar Yojana 2024 साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.

पीएम सूर्य घर योजना म्हणजे काय?

What is PM Surya Ghar Muft Bijli Yojana

देशातील कोट्यावधी लोकांना विजेच्या बिलाने हैराण करून सोडलेले आहे. त्यामुळे पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून लोक आपली वीज बचत करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून देशभरात केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सौर पॅनल लावण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूही झाली आहे. ग्रामीण भागात पोस्टमास्तर यांच्या अंतर्गत गावातील पक्क्या घराचे सर्वे करून या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

PM Surya Ghar Yojana

ठळक मुद्दे :

पीएम सूर्य घर योजना म्हणजे काय?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची थोडक्यात माहिती

पीएम सूर्य घर योजनेचे फायदे

पीएम सूर्यघर योजनेचे PM Surya Ghar Yojana लाभ

पीएम सूर्यघर योजनेसाठीची पात्रता

पीएम सूर्यघर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा

पीएम सूर्य घर मोफत योजनेची स्थिति कशी चेक करावी?

पीएम सूर्य घर योजना कॅल्क्युलेटर

FAQ’s

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची थोडक्यात माहिती

PM Surya Ghar Yojana in short

योजनेचे नावप्रधानमंत्री सूर्य घर योजना
कधी सुरू झाली15 फेब्रुवारी 2024
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
उद्देशएक कोटी नागरिकांना मोफत वीज देणे आणि त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवणे
लाभार्थीगरीब कुटुंब
सबसिडी30,000  ते 78,000
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://pmsuryaghar.gov.in  

पीएम सूर्य घर योजनेचे फायदे

Benefits of PM Surya Ghar Yojana

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा PM Surya Ghar Muft Bijli Yojana फायदा देशातील एक कोटी नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल यावर भर दिला गेला आहे. या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.

एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल.

या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होणार आहे.

या योजनेमुळे सौर ऊर्जेचा जास्त वापर होणार असून त्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत होणार आहे.

या योजनेमुळे प्रदूषण कमी होणार आहे. कारण कोळशामुळे तयार होणारी वीज ही कमी होईल.

नागरिकांच्या घरातील आता विजेला खंड पडणार नाही, या योजनेअंतर्गत 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या अंतरीम अर्थसंकल्पात सौर ऊर्जा योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. देशातील तब्बल एक कोटी घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला PM Surya Ghar Muft Bijli Yojna मंजुरी दिली असून यासाठी 75021 कोटी रुपये खर्च येणार आहे.

या योजनेअंतर्गत एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे आणि एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लांट साठी 30000 रुपये तर दोन किलो वॅट क्षमतेच्या प्लॉटसाठी 60000 रुपये अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. तसेच जे लोक आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसतील त्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी 78 हजार रुपयापर्यंत अनुदान आणि 300 युनिट मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.

PM Surya Ghar Yojana

पीएम सूर्यघर योजनेचे PM Surya Ghar Yojana लाभ

  1. घरासाठी मोफत वीज मिळेल.
  2. सरकारसाठी विजेची मागणी कमी होईल.
  3. नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढेल.
  4. कार्बन उत्सर्जन कमी होईल.

Pradhanmantri Surya Ghar Yojana या योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे

यामुळे तुम्हाला वीज भरण्याच्या कटकटीतून मुक्तता मिळेल आणि 24 तास वीज मिळेल.

या योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण होईल. याबरोबरच सौर ऊर्जा शक्ती वाढवण्यातही मोठी मदत होणार आहे

पीएम सूर्यघर योजनेसाठीची पात्रता

Eligibility if PM Surya Ghar Yojana

  • तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • कुटुंबाकडे छत असलेले घर असणे आवश्यक आहे. कारण सौर पॅनल लावण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.
  • कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे
  • कुटुंबाने सौर पॅनलसाठी अन्य सबसिडी असलेल्या कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
  • तुमचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.
PM Surya Ghar Yojana

पीएम सूर्यघर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Documents of PM Surya Ghar Yojana

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

छत असलेल्या घराचे प्रमाणपत्र

रेशन कार्ड

आधार कार्ड

विज बिल

बँकेचे पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे

Registration of PM Surya Ghar Yojana

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी PM Surya Ghar Muft Bijli Yojana खालील प्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागते.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला क्लिक करा, तिथे तुम्हाला apply solar  हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

त्यामध्ये registration here या पर्यायावर क्लिक करा.

त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा निवडावा लागेल.

त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक तेथे टाका.

यापुढे next या बटन वर क्लिक करा.

नेक्स्ट बटन वर क्लिक केल्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मग तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाका.

त्यानंतर तुम्हाला एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या टाका नंतर सबमिट बटन वर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुमची नवीन नोंदणी झालेली होईल.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेच्या संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेच्या संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा.

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा

PM Surya Ghar Yojana online application

वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तो खालील पद्धतीने भरा.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या Pradhanmantri Surya Ghar Yojana अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल, तेथे गेल्यावर Login Here हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक टाका.

यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर नवीन होमपेज उघडेल.

त्यामध्ये Apply for Rooftop Solar Installation हा फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.

त्या फॉर्ममध्ये एप्लीकेशन डिटेल्स म्हणजे त्या मध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तिथे upload करावे लागतील.

त्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा चेक करून फायनल सबमिट करावा यानंतर तुमचा फॉर्म तपासणीसाठी जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

पीएम सूर्य घर मोफत योजनेची स्थिति कशी चेक करावी?

PM Surya Ghar Yojana या योजनेअंतर्गत अर्ज केल्यावर त्याचे स्टेटस चेक करायचे असेल तर त्याबद्दल माहिती खाली दिली आहे.

सर्वप्रथम फॉर्म भरल्यानंतर त्यांचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर Login Here  ह्या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.

मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा, आता तुम्ही भरलेल्या फॉर्मची स्थिती चेक करण्यासाठी ट्रॅक डिटेल्स हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फॉर्मची स्थिती दिसून जाईल.

पीएम सूर्य घर योजना कॅल्क्युलेटर

PM Surya Ghar Yojana calculator

पीएम सूर्यघर योजनेसाठी PM Surya Ghar Yojana किती खर्च होईल. हे पाहण्यासाठी पीएम सूर्य घर योजना कॅल्क्युलेटर तयार करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला एक साधारणपणे किती खर्च येईल ती माहिती मिळते, हे कॅल्क्युलेटर कसे वापरावे ते पाहूया.

पीएम सूर्यघर योजनेचे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तेथे Know More About Rooftop Solar या पर्यायाच्या खाली कॅल्क्युलेटर हा पर्याय आहे त्या पर्यायावर क्लिक करा.

तिथे जी माहिती विचारली जाईल ती भरा आणि कॅल्क्युलेट या बटन वर क्लिक करा, तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये अचूक जेवढी माहिती भराल तेवढे अचूक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, अशा पद्धतीने तुम्ही या कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.

FAQ’s

पीएम सूर्यघर योजना म्हणजे काय?

ही एक सरकारी योजना असून तिचा उद्देश देशातील घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे.

या योजनेचे काय काय लाभ मिळतात?

  • घरावर बसवण्यात आलेल्या सौर पॅनल साठी सबसिडी
  • घरासाठी मोफत वीज
  • विजेची मोठ्या प्रमाणात बचत
  • नवनीकरणीय ऊर्जा वाढवण्यास प्रोत्साहन देणे
  • कार्बन उत्सर्जन कमी होते

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमुळे किती लाखाची बचत होते ?

पीएम सूर्य घर योजनेमुळे सरकारची 50 लाख पर्यंतची बचत होते.

पीएम सूर्य घर योजनेची सुरुवात कधी झाली?

 पीएम सूर्य घर योजनेची सुरुवात 15 फेब्रुवारी 2024 पासून नरेंद्र मोदी यांनी केली.

किती कुटुंबाला मिळतो पीएम सूर्य घर योजनेचा लाभ?

देशातील एक कोटी कुटुंबीयांना मिळणार या योजनेचा लाभ.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी निधीची रक्कम किती?

पीएम सूर्यघर योजनेसाठी 75 हजार कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत किती सबसिडी मिळते?

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत 30 हजार ते 78 हजार रुपये पर्यंत सबसिडी मिळणार आहे मिळते

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना आणि पीएम सूर्योदय योजना यामध्ये काही फरक आहे का? पीएम सूर्य घर मोफत वीज योजना हीच पीएम सूर्योदय योजनेचे नवीन स्वरूप आहे.

कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

तुम्ही भारताचे नागरिक असावे, तुमच्याकडे छत असलेले घर पाहिजे, जिथे सोलार पॅनल लावता येईल.