Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 in Marathi : आपण पाहतो की आजच्या काळात पैसा कमवणे हे किती महत्त्वाचं आहे. आणि तसेच तो पैसा भविष्यासाठी गुंतवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारावे आपल्या पैशाने त्यांच्या आयुष्यात हात भार लागावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठीच जीवन विमा आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आज आपण याच एका जीवन विमा योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने भरपूर योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana ही योजना सरकारी विमा योजना आहे. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2015 मध्ये केली होती. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी विमाधारकाला फक्त 436 रुपयांचा वार्षिक हप्ता भरावा लागतो. चला तर मग पाहूया जीवन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.
हेही वाचा : https://yojanamazi.com/pradhanmantri-suryoday-yojana/
ठळक मुद्दे :-
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्यात नोंदणी कशी करावी?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी कशी घ्यावी
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे वैशिष्ट्ये
PMJJBY ची नाव नोंदणी करण्यासाठी काही अटींची आवश्यकता आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा प्रीमियम
सीमा संरक्षण कोणत्या कारणामुळे समाप्त होतो
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी क्लेम कसा करावा
पीएमजेजेबीवाय योजनेचा लाभ कसा घ्यावा
FAQ’S
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना म्हणजे काय?
What is Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PM Jeevan Jyoti Bima Yojana ही सरकारी जीवन विमा योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये विमाधारकांना दोन लाख रुपयांचा विमा मिळतो. म्हणजेच याचाच अर्थ ही विमा पॉलिसी असलेल्या व्यक्तीला एक जर एखादा आजार झाला त्यांचा अपघात झाला किंवा इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये चा विमा मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. ज्यांचे वय 18 वर्षे ते 50 वर्ष च्या दरम्यान आहे. या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही बँकेत नोंदणी करू शकता. या योजनेसाठी तुम्हाला फक्त 436 रुपये वर्षाला एक वर्षाला असा हप्ता जमा करायचा आहे. आणि या योजनेचा फायदा घ्यायचा आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना |
कोणी सरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू झाली | 2015 |
किती रक्कम भरावी लागणार | वार्षिक 436 रुपये |
किती रुपये विमा मिळणार | 2 लाख |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | www.jansuraksha.gov.in |
योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्यात नोंदणी कशी करावी?
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 : ज्या व्यक्तीचे बँकेत खाते आहेत त्यांनी आपले नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदवावे ही नोंदणी बँकेद्वारेच केली जाते आणि तुमच्या खात्यातून दरवर्षाला 436 रुपये कापण्याची परवानगी बँकेला तुम्हाला द्यावी लागते. हे 436 रुपये दर वर्षाला कटतात 25 मे ते 30 जून या दरम्यान हे पैसे कपात केले जातात. नांदणी फॉर्मवर तुमची संमती मिळाल्या नंतर हे पैसे दरवर्षी तुमच्या खात्यातून कापले जातात. आणि तुमची ही विमा योजना सुरू राहते. त्यानंतर तुम्हाला ते सोडवायचे असेल तेव्हा तुम्ही ते सोडवू शकता.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojanaही सरकार योजना आहे. त्याचा लाभ तुम्हाला मृत्यू नंतरच मिळतो. ही एक मूदत विमा योजना आहे जर मूदती पूर्वी त्या व्यक्तीला काही झाले तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जात नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्ष 50 वर्षाच्या दरम्यान असावे.
इथून भरा ऑनलाइन अर्ज www.jansuraksha.gov.in
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे
Jeevan Jyoti Bima Yojana या योजनेसाठी तुम्हाला फक्त 436 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. हे पैसे तुमच्या खात्यातून तुमच्या परवानगी नंतर ऑटो डेबिट पद्धतीने कापले जातात. त्यावर तुम्हाला दोन लाख रुपयांचा विमा मिळतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही या योजनेत कधीही सामील होऊ शकता किंवा या योजनेतून बाहेरही पडू शकता. ही एक समूह योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. ज्या वर्षात तुम्ही 436 रुपये भरले तेवढे एका वर्षासाठी तुमची योजना सुरू राहते. जर तुम्ही ही रक्कम कोणत्याच वर्षात भरू शकला नाही तर विम्याची सुविधा संपुष्टात येईल. तरीही नंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जेव्हा तुम्ही या योजनेत सहभागी होणार आहात त्यावेळी पुन्हा या योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकतात. त्या बदल्यात तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. इतकी सोपी आहे ही योजना.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. जी की तर तुम्हाला जीवन विमा पोलीस मध्ये करावी लागते मात्र जर तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही ही पोलिसी घेऊ शकत नाही विमा पॉलिसीच्या संमती पत्रा या आजारांचा उल्लेख आहे तुम्हाला त्या आजाराने ग्रासलेले नसल्याचा जाहीरनामा द्यावा लागतो या योजनेअंतर्गत तुम्हाला कलम 80 सी च्या अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी कशी घ्यावी
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खाते असलेल्या बँकेतच फॉर्म मिळेल. या फॉर्मवर तुमच्याकडून संमती घेतली जाते, की तुम्ही या योजना साठी तयार आहात. तुम्ही ह्या योजना खात्यातून पैसे कापण्यासाठी तयार आहात. ही संमती तुम्ही बँकेला दिली की बाकीचे पुढील काम बँकेकडूनच केली जाते. तर काही बँकांनी नेट बँकिंग द्वारे देखील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी ऑनलाईन करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. यासाठी तुम्ही एसएमएस द्वारे देखील पॉलिसी भरू शकता. फक्त एवढेच असावे की ह्या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी हप्ता भरण्यासाठी तुमच्या खात्यात तेवढे पुरेसे पैसे हवेत. कारण या हप्त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाते. ही विमा पॉलिसी वयाच्या 55 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही. तुम्ही तुमच्या वयाचे 50 वर्षे होईपर्यंत या पॉलिसीमध्ये सहभाग घेऊ शकता, पण त्या याच्यावर वरील लोक या योजनेत सहभाग घेऊ शकणार नाहीत. पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पुरेषी रक्कम ठेवावी लागेल. जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी हे एका व्यक्तीला केवळ एका बँकेतच मिळते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे वैशिष्ट्ये
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 18 वर्षे ते 50 वर्षाच्या दरम्यान वयो मर्यादा असावी.
या पोलीस ची मॅच्युरिटी 55 वर्षापर्यंत आहे.
या योजनेतून प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते.
या योजनेद्वारे तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंतची विम्याची रक्कम मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी फक्त 436 रुपये प्रति वर्ष हप्ता आहे. ही रक्कम तुमच्या खात्यातून दर वर्षाला डेबिट केले जाते.
या योजनेच्या रकमेवर बँक प्रशासनिक शुल्क आकारते. त्याचबरोबर जीएसटी ही लागू होते.
विमा कवरच्या कालावधीत जर या विमाधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये यांची रक्कम प्राप्त होते. जर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या PMJJVY माध्यमातून विमा कवर घेणाऱ्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त बँकांमध्ये प्रीमियम भरला असेल तरीही त्याच्या मृत्यू नंतर त्याला दोन लाख याहून अधिक रक्कम मिळत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी चा कालावधी हा एक वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. जर एखाद्या व्यक्तीने दीर्घ मदतीचा पर्याय निवडला असेल, तर दरवर्षी चा प्रीमियम बँक त्याच्या खात्यातून परस्पर कट करते. ज्या दिवशी तुमच्या खात्यातून रक्कम कट होते त्या दिवसापासूनच तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची PMJJVY सुविधा मिळते.
तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा पॉलिसी वर्षातील कोणत्याही तारखेला सुरू करा तरी तुम्हाला पहिल्या वर्षासाठी त्याचे कव्हरेज 31 मे पर्यंत वैध राहते. प्रत्येक वर्षी 01 जून रोजी बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम भरून या विम्याचे नूतनीकरण केले जाते. प्र
धानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी फॉर्म वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे जसे की इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, बांगला, कन्नड, ओडिया, तेलुगु आणि तामिळ आदी भाषा आहेत.
लखपती दीदी योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या : https://yojanamazi.com/lakhapati-didi-yojana-2024-in-marathi/#more-258
फ्री शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती : https://yojanamazi.com/free-silai-machine-yojana-2024-in-marathi/#more-270
PMJJBY ची नाव नोंदणी करण्यासाठी काही अटींची आवश्यकता आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा PM Jeevan Jyoti Bima Yojana लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेलेले असावे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी ही तुम्हाला एका वर्षासाठीचा विमा देते. ते वर्ष 01 जून ते 30 मे पर्यंत आहे. या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला त्याचा फॉर्म एक जून पर्यंत भरावा लागेल, आणि जरी तुम्ही एक जून नंतर या योजनेची पॉलिसी भरत असाल किंवा तेवढ्या पूर्ण वर्षात तुम्ही कधीही या पॉलिसीचा फॉर्म भरला तरी तुम्हाला तेवढ्या पूर्ण वर्षाचा हप्ता भरावा लागतो. परंतु पॉलिसीची मुदत ही मात्र 31 मे रोजी पूर्ण होते.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 या प्रीमियम चे पैसे फक्त तुमच्या बचत खात्यातून कापले जातात. इतर कोणत्याही पद्धतीने प्रीमियम तुम्ही भरू शकत नाही. जर तुम्ही स्वयंचलित नूतनीकरण निवडले असेल, तर दरवर्षी तुमच्या बचत खात्यातून 25 मे ते 31 मे च्या दरम्यान 436 रुपये कापले जातील म्हणूनच तुम्ही तुमच्या खात्यात या तारखे दरम्यान किमान 436 रुपये ठेवावे लागतील. जर एकदा संमती झाल्यानंतर तुम्हाला पॉलिसी रद्द करायचे असेल तेव्हा तुम्ही ती रद्द करण्यात साठी विनंती करून शकता.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ तुम्ही फक्त एकाच बँक खात्यातून करून घेऊ शकता. एकापेक्षा जास्त बँकेतून तुम्हाला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ही पॉलिसी मिळते, परंतु तुम्ही जर असे केलात आणि विमा पॉलिसी परत घेताना तुम्हाला या योजनेतून फक्त एकाच खात्याचा लाभ मिळू शकतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसी धारकाला त्याच्या मृत्यूनंतर दोन लाख त्यांच्या कुटुंबाला मिळतात. मात्र पॉलिसी घेतल्याच्या 45 दिवसानंतरच या विमा संरक्षणाचा लाभ मिळतो त्यामुळे 45 दिवसा नंतर जेंव्हा मृत्यू होईल तेंव्हाच पैसे मिळतात. परंतु जर अपघातात मृत्यू झाला असेल तर त्यासाठी या 45 दिवसांची काहीही अट नाही. या पॉलिसीमध्ये पुन्हा सामील झाल्यावर 45 दिवसांचा हा कालावधी पूर्ण करावा लागेल.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana documents
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा प्रीमियम
सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना 2015 रोजी सुरू केली होती त्यानंतर सात वर्षांपर्यंत या प्रीमियम मध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती मात्र आता या प्रीमियम मध्ये वाढ होऊन आता 436 रुपयांचा प्रीमियम तुम्हाला घ्यावा लागतो. हा प्रीमियम एका वर्षासाठी असतो या प्रीमियमचा कालावधी 01 जून ते 31 मे पर्यंत वैद्य असतो.
सीमा संरक्षण कोणत्या कारणामुळे समाप्त होतो
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana : विमाधारकाचे वय 55 वर्ष झाल्यानंतर विमा संरक्षण समाप्त होते. या योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते नंबर तुम्ही दिला असेल ते बंद झाल्यास किंवा तुम्ही बंद केले असल्यास तुमचे मेसेज कव्हर बंद होईल.
याबरोबरच मे महिन्यामध्ये तुमचा बँक खात्यामध्ये पैसे असणे आवश्यक आहेत. जर बँक खात्यामध्ये पैसे शिल्लक नसेल तर विम्याचे कव्हर समाप्त होते.
जर तुमचे अनेक बँक मध्ये खाते असेल आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी हा विमा मिळवण्यासाठी अर्ज केला असेल अशावेळी ही तुमचा अर्ज बाद ठरवून तुमचे विमा चे कवच केवळ एकाच खात्याला दिले जाते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी क्लेम कसा करावा
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांनी ज्या बँक खाते बचत खातेचा नंबर दिला असेल त्या बँकेला प्रथम भेट द्यावी. तेथे वारसदाराने वेबसाईटवरून डाऊनलोड केलेल्या PMJJBY क्लेम फॉर्म सह विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
हा फॉर्म तुम्ही विमा कंपनीकडून किंवा बँकेकडून घेऊ शकता
तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यापूर्वी विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती, डिस्चार्ज पावती, एक कॅन्सल चेक आणि नॉमिनीचे बँक तपशील आधी आवश्यक कागदपत्रासह आपला भरलेला फॉर्म बँक किंवा विमा कंपनीकडे जमा करावा. त्यानंतर बँकेने किंवा विमा कंपनीने कडून तुमच्या फॉर्म ची तपासणी केल्यानंतर विम्याची रक्कम तुमच्या संबंधित बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
पीएमजेजेबीवाय योजनेचा लाभ कसा घ्यावा
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला प्रथम अर्ज करावा लागेल. हा अर्ज तुम्ही कुठल्याही बँक किंवा एलआयसी मध्ये जाऊन करू शकता हा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून करता येते.
FAQ’S
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना कधी सुरू झाली?
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना 2015 रोजी केंद्र सरकारने सुरू केली.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत किती रुपयांचा विमा मिळतो?
- या योजनेत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत वयाची अट काय?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी चे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत किती रुपयांचा हप्ता आहे?
- पीएमजेजेबीवाय योजनेत केवळ 436 रुपये वार्षिक हप्ता आहे.