Pradhanmantri Pik Vima Yojana
Pradhanmantri Fasal Bima Yojana
Pik vima yojana information
Pradhanmantri Pik Vima Yojana केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा Pradhanmantri Pik Vima Yojana चार कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी सभागृहात दिली.
शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होते. या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा Pradhanmantr Pik Vima Yojana मुख्य उद्देश आहे. या योजनेचा देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नैसर्गिक संकटाचा शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसतो. शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : http/:pmfby.gov.in
Pradhanmantri Fasal Bima Yojana राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र एक रुपया घेऊन पिक विमाचा हप्ता महाराष्ट्र सरकार भरणार आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपया विमा काढता येत आहे. राज्यातील एकही शेतकरी पिक विमा Pik Vima पासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पिक विमाचा हप्ता स्वतः भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात आपल्याजवळच्या सीएससी CSC केंद्रावर जाऊन आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तोही एक रुपयाचे नाममात्र शुल्क भरून. त्यामुळे वाट कसली बघतायेत लवकरात लवकर आपल्या पिकांचा विमा काढा. आणि या योजनेचा लाभ घ्या.
ठळक मुद्दे :-
पीक विमा योजना कोणी सुरू केली?
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे वैशिष्ट्य
पीक विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती
या कारणामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळते
ई-पीक पाहणी करणे आवश्यक
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतोय एक रुपयात पिक विमा
या पिकासाठी विमा संरक्षण
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्देश
असे दिले जाते पिकाच्या नुकसानीचे विमा संरक्षण
या योजनेअंतर्गत बागायती पिकांनाही या योजनेचा लाभ मिळतो
पिक विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी कसा करावा अर्ज
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
विमा पोर्टल आणि मोबाईल ॲप करता येतो अर्ज
FAQ’S
पीक विमा योजना कोणी सुरू केली?
Pradhanmantri Pik Vima Yojana गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी सारखा पाऊस देशभरात होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना Pik Vima Yojana सुरू केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास मदत मिळत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे वैशिष्ट्य
Features of Pik Vima Yojana
Pradhanmantri Pik Vima Yojana केंद्र सरकारच्या वतीने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yojana सुरू करण्यात आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे जे नुकसान होते त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना ऐच्छिक आहे. या योजनेचा लाभ देशातील कर्जदार शेतकऱ्यानां होतो. तसेच बिगर कर्जदार शेतकरी यांना देखील या योजनेत सहभागी होता येते.
पिकाचे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर्व वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पिक विमा योजनाअंतर्गत शेतकऱ्याला भरपाई म्हणून नुकसान भरपाई दिली जाते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने ही करता येतो. कुठल्याही CSC केंद्रावर जाऊन शेतकरी आपला अर्ज भरू शकतो. याबरोबरच मोबाईलच्या माध्यमातूनही या योजनेचा अर्ज भरण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आणि वेळ वाया जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल आणि योजनेचा लाभही घेता येईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची संपूर्ण माहिती : https://yojanamazi.com/pradhanmantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची संपूर्ण माहिती : https://yojanamazi.com/pradhanmantri-suryoday-yojana/
पीक विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पीक विमा योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू केली | 13 जानेवारी 2016 |
पीक विमा रक्कम | 1 रुपया |
उद्देश | पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत |
कोणाला मिळणार लाभ | सर्व शेतकरी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | http/:pmfby.gov.in |
या कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास मिळते विमा संरक्षण
Pradhanmantri Fasal Bima Yojana : हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणार नुकसान पीक पेरणी पासून काढणीपर्यंत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, शेती जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान आदि बाबींसाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे Pik Vima Yojana संरक्षण दिले जाते.
ई-पीक पाहणी करणे आवश्यक
e-pik pahani
Pradhanmantri Fasal Bima Yojana : शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेल्या पिकाची ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. विमा योजनेत निवडलेले पीक आणि ई-पीकपाहणी मध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफायतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणी मध्ये नोंदविण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, नजीकचे विविध कार्यालय कार्यकारी सोसायटी, कृषी खात्याचे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतोय एक रुपयात पिक विमा
Pradhanmantri Pik Vima Yojana राज्यात 2016 पासून खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yojana राबवली जात आहे. आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे. नवीन बदलानुसार सर्वसमावेशक पिक विमा योजना Pik Vima Yojana पुढच्या तीन वर्षासाठी राज्यात राबविण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिक विमा काढता येणार आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पिक विमा Pradhanmantri Pik Vima Yojana योजने अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी विमा संरक्षण रकमेच्या दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षण रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागायचा. आता राज्य सरकारच तो हप्ता भरत असल्याने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा काढता येणार आहे.
कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आलेली असून, भाडेतत्वावर शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि पिक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या पिकासाठी विमा संरक्षण
खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल. तर रब्बी हंगामातील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल तुम्ही स्वतः पिक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती : https://yojanamazi.com/pradhanmantri-vishwakarma-yojana-2024-in-marathi/#more-248
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्देश
Purpose of Pik Vima Yojana
शेतकऱ्यांच्या पिकाचे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना Pik Vima Yojana Maharashtra सुरू केलेली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यावर वाईट परिस्थिती निर्माण होते. या आर्थिक परिस्थितीतून शेतकऱ्याला मदत होण्यासाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे.
पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
अधिकाधिक शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
योजनेतून शेतकऱ्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे हा एक उद्देश आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत समाविष्ट पिके
तेलबिया
अन्नपीक
वार्षिक व्यावसायिक आर्थिक फलोत्पादन पिके
बारमाही फल उत्पादन व्यावसायिक पिके
आदी पिकांचा यात समावेश करण्यात आला आहे.
असे दिले जाते पिकाला नुकसानीचे विमा संरक्षण
पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली घट (पेरणी लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असावे.)
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
पीक काढणीनंतर झालेले नुकसान– चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर शेतात पसरून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास पंचनामे करून पिक विमा Pik Vima कंपनीकडून नुकसान भरपाई निश्चित केली जाते व ती शेतकऱ्यांना दिली जाते.
ही नुकसान भरपाई काढणी, कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर संबंधित विमा कंपनीला नुकसानीची माहिती 72 तासात देणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो आणि नुकसान भरपाई दिली जाते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाल्यास– प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yojana अंतर्गत विमा संरक्षण क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी पंचनामे करून योग्य ती भरपाई दिली जाते.
बागायती पिकांनाही या योजनेचा लाभ– आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा पिक विमा भरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपया मध्ये आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. तसेच या योजनेचा बागायती पिकांनाही लाभ दिला जात आहे.
पिक विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Documents of Pik Vima Yojana
शेतकऱ्याचा फोटो
शेतकऱ्याचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान आयडी कार्ड, पासपोर्ट यापैकी एक आवश्यक आहे.)
शेतकऱ्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना शेतात पिकाची पेरणी झालेली आहे याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच तसेच ग्रामपंचायत पत्र किंवा ई-पीक पहावी करणे आवश्यक आहे.
शेती करार तत्वावर करणारे जर कोणी असेल तर त्यांना ही या योजनेचा लाभ मिळतो. पण यासाठी संबंधित मालकासोबत केलेल्या कराराची कॉपी यासोबत जोडावी लागते. त्यामध्ये शेतीचा सातबारा उतारा, खासरा नंबर लिहावा लागतो.
या योजनेचे पीक नुकसानग्रस्त झाल्यास आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी कसा करावा अर्ज
Pik vima yojana Maharashtra online form
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी Pik Vima Yojana तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.
याबरोबरच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरूनही योजनेसाठी अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत साईट प्रधानमंत्री फसल बीमा योजना वर जा.
तिथे गेल्यानंतर तुम्हाला farmer corner या बटनावर क्लिक करा.
लॉगिन फॉर फार्मर या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल त्यावर क्लिक करा.
ओटीपी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक करताच तुम्ही लॉगिन व्हाल लॉगिन झाल्यानंतर पिक विमा अर्ज भरण्यास सुरुवात करा.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
शेतात पीक पेरणी केल्यानंतर दहा दिवसाच्या आत तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yojana साठी अर्ज करायचा आहे.
पिक विमा काढल्यानंतर 14 दिवसानंतर जर कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा Pradhanmantri Pik Vima Yojana योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता.
पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत तुम्ही फोन लावून किंवा कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून नुकसानीची तक्रार करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कंपनीचा कर्मचारी तुमच्या शेतात येऊन पंचनामा करून योग्य ती माहिती कंपनीला पुरवून तुम्हाला आर्थिक मदत मिळवून देईल.
विमा पोर्टल आणि मोबाईल ॲप
केंद्र सरकारने प्रशासन व एजन्सी मध्ये ताळमेळ घालण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा pradhanmantri Pik Vima Yojana प्रसार आणि प्रचार आणि प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक पोर्टल सुरू केला आहे. तसेच अँड्रॉइड आधारित पिक विमा ॲपही सरकारने सुरू केले आहे. या ॲप द्वारे पिक विमा कृषी सहाय्यक आणि शेतकरी कल्याण विभाग बीएससी आणि कुटुंब कल्याणच्या अधिकृत वेबसाईटवरून तुमच्या स्मार्टफोनमध्ये ॲप डाऊनलोड केले जाऊ शकते.
FAQ’S
प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे पीक काढणीच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्यादरम्यान आपत्ती, वादळ, दुष्काळ, पाऊस झाल्यास प्रभावित शेतीतील पिकाचे पंचनामे करून भरपाई दिली जाते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात कधी झाली?
केंद्र सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा प्रीमियम किती?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी दोन टक्के, आणि रब्बी पिकासाठी अडीच टक्के प्रीमियम भरावा लागतो. मात्र महाराष्ट्र सरकार हा प्रीमियम भरणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपये प्रीमियम भरून आपल्या शेतातील पिकाचा विमा काढता येणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अधिकृत वेबसाईट कोणती?
http/:pmfby.gov.in ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.
पीक कापणी नंतर किती दिवसात नुकसान झाल्यास तुम्हाला लाभ मिळू शकतो?
पीक कापणी नंतर 14 दिवसानंतर जर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास तुम्हाला पिक विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र यासाठी नुकसानीच्या 72 तासाच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल.