Prashikshan Yojana 2024 In Marathi : तरुण-तरुणींना लघु उद्योगासाठी मिळणार निशुल्क प्रशिक्षण

Table of Contents

Prashikshan Yojana 2024 Information In Marathi : प्रशिक्षण योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Prashikshan Yojana 2024 In Marathi : राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणाानुसार त्यांच्या आवडीनुसार रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असतात. परंतु कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी निगडित एखादे कौशल्य प्रशिक्षण असावे लागते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पैशांची गरजही असते त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.

Prashikshan Yojana

Prashikshan Yojana 2024 कौशल्य प्रशिक्षण हे एखाद्या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेण्याची गरज असते, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण शुल्क भरपूर  असते. त्यामुळे योग्य कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु त्यांच्याजवळ उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील मिळत नाही. अनेक तरुणांची इच्छा असून देखील त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करण्यापासून वंचित रहावे लागते. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील तसेच मागास वर्गातील तरुण तरुणींना स्वतःचा एक लघुउद्योग सुरू करण्यासाठी व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्यात प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.

Prashikshan Yojana या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसाय संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून ते स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील आणि आत्मनिर्भर बनतील.

Prashikshan Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

प्रशिक्षण योजनेचे काय आहेत उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, फायदे आणि लाभ?, प्रशिक्षण योजनेसाठी कसा करावा अर्ज?, प्रशिक्षण योजनेसाठी काय आहेत आवश्यक कागदपत्रे?, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.

ठळक मुद्दे

प्रशिक्षण योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Prashikshan Yojana 2024 Information In Marathi

प्रशिक्षण योजनेची थोडक्यात माहिती

Prashikshan Yojana In Short

प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट

Prashikshan Yojana Purpose

प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी

Prashikshan Yojana Benefisiors

प्रशिक्षण योजनेचा लाभ

Prashikshan Yojana 2024 Benefits

प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

Prashikshan Yojana Benefits

प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण शुल्क

Prashikshan Yojana 2024 In Marathi

प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी

Prashikshan Yojana 2024

योजनेअंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण

Prashikshan Yojana 2024

प्रशिक्षण योजनेसाठीची आवश्यक पात्रता

Prashikshan Yojana Eligibility

प्रशिक्षण योजनेसाठीचे अटी व शर्ती

Prashikshan Yojana Terms and conditions

प्रशिक्षण योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

Prashikshan Yojana Documents

प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

Prashikshan Yojana Apply

प्रशिक्षण योजनेअंतर्गत तक्रार करण्याची प्रक्रिया

Prashikshan Yojana 2024

प्रशिक्षण योजनेची थोडक्यात माहिती

Prashikshan Yojana In Short

योजनेचे नावप्रशिक्षण योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी
लाभउद्योग सुरू करण्यासाठी निशुल्क प्रशिक्षण
उद्देशलघुउद्योग सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
Prashikshan Yojana

प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट

Prashikshan Yojana Purpose

राज्यातील आर्थिक दृष्ट्या सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मोफत उद्योग योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी

Prashikshan Yojana Benefisiors

राज्यातील अनुसूचित जातीतील, चर्मकार समाजातील तसेच मागास वर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यास साठी पात्र आहेत.

प्रशिक्षण योजनेचा लाभ

Prashikshan Yojana 2024 Benefits

राज्यातील चर्मकार समाजातील त्याचबरोबर मागासवर्गातील सुशिक्षित बेरोजगार नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी निगडित खाते कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेअंतर्गत राज्यातील चर्मकार तसेच मागासवर्गातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योग्य विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्यास दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारला जात नाही.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षण योजनेच्या मदतीने मागास वर्गातील तरुणांची आर्थिक परिस्थिती उंचावेल.

या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे जीवनमान सुधारेल.

प्रशिक्षण योजनेमुळे राज्यातील तरुण-तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणी स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करू शकतील.

या योजनेमुळे राज्यात नवीन उद्योग सुरू झाल्यामुळे राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

Prashikshan Yojana Benefits

प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रति विद्यार्थी दरमहा 1000 रुपये विद्यावेतन देण्यात येते.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण शुल्क

Prashikshan Yojana 2024 In Marathi

सर्वसाधारणपणे प्रशिक्षण शुल्क प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरूपानुसार ठरविण्यात येते त्याचबरोबर प्रशिक्षण अभ्यासक्रमावर प्रति विद्यार्थी जास्तीत जास्त 12 हजार रुपये पर्यंतचे प्रशिक्षण शुल्क महामंडळामार्फत अदा करण्यात येते.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी

Prashikshan Yojana 2024

या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी दोन महिने ते चार महिने पर्यंतचा असतो.

योजनेअंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण

Prashikshan Yojana 2024

शिवणकला

सौंदर्यशास्त्र

संगणक प्रशिक्षण

सर्वोद्योग प्रशिक्षण

वाहन चालक

टीव्ही व्हिडिओ दुरुस्ती

रेडिओ दुरुस्ती

टेलरिंग

वेल्डिंग

फिटर

ई-मेल व विविध व्यवसाय अनुरूप प्रशिक्षण

प्रशिक्षण योजनेसाठीची आवश्यक पात्रता

Prashikshan Yojana Eligibility

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण योजनेसाठीचे अटी व शर्ती

Prashikshan Yojana Terms and conditions

  • अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
  • फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना प्रशिक्षण योजनेचा लाभ दिल्या जाईल.
  • महाराष्ट्र बाहेर नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार हा तरुण किंवा तरुणी अनुसूचित जात किंवा मागासवर्गातील असावा.
  • अर्जदारास महाराष्ट्र राज्यात स्वतःचा उद्योग सुरू करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग सुरू करता येणार नाही.
  • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे
  • अर्जदार तरुण-तरुणीने जो व्यवसाय  निवडला आहे त्याबाबतचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार तर, शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • राज्य सरकार पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख असावे.
  • अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असावे
  • अर्जदाराने यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मार्फत सुरू असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू केला असेल तर अशा परिस्थितीत त्या अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा
  • अर्जदार व्यक्ती बँक किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदार व्यक्ति कमीत कमी सातवी पास असावा.

प्रशिक्षण योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

Prashikshan Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक खाते पासबुक
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • डोमेसाईल प्रमाणपत्र
  • शपथपत्र

प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

Prashikshan Yojana Apply

प्रशिक्षण योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो

यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.

जिल्हा कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.

सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया करून या आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रशिक्षण योजनेअंतर्गत तक्रार करण्याची प्रक्रिया

Prashikshan Yojana 2024

अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

तेथील होमपेज वर तक्रार पोस्ट करा यावर क्लिक करावे लागेल 

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Post Grievance यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून व्हेरिफाय  बटन वर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Post Grievance यावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर Grievance Form उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

त्यानंतर संपूर्ण माहिती अचूक भरून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची प्रशिक्षण योजनेअंतर्गत तक्रार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना