Pujari Granthi Samman Yojana 2024 Information In Marathi : पुजारी ग्रंथी सन्मान योजना 2024 मराठी माहिती
Pujari Granthi Samman Yojana : दिल्लीतील आम आदमी सरकारने पुजारी आणि ग्रंथी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथींना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत पुजारी आणि ग्रंथी यांना 18 हजार रुपये मासिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. देशात पहिल्यांदा आता पुजारी आणि ग्रंथींना आर्थिक मदत करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने प्रथम घेतल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील आम आदमी सरकारने पुजारी आणि ग्रंथी सन्मान योजना ची सुरुवात दिल्लीतील मंदिर आणि गुरुद्वार मध्ये काम करणारे पुजारी आणि ग्रंथींना लक्षात ठेवून सुरू केली आहे. त्यामुळे पुजारी आणि ग्रंथींना महिन्याला 18 हजार रुपये भत्ता सरकारकडून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना
Arvind Kejriwal announced Pujari Granthi Samman Yojana दिल्ली सरकार राज्यातील जनतेसाठी विविध योजना सुरू करत असते. या योजनेचा भाग म्हणूनच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केलेली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेवर आल्यावर पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Pujari Granthi Samman Yojana 2024 In Marathi दिल्ली सरकारने महिला साठी महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर आता या नव्या योजनेअंतर्गत हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथींना प्रत्येक महिन्याला 18000 रुपये भत्ता देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून विविध योजनांची घोषणा केली जात आहे. कारण Arvind Kejriwal केजरीवाल यांचा पक्ष सलग 14 चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी विविध योजनांच्या घोषणा करत आहे.
Arvind Kejriwal announced Pujari Granthi Samman Yojana पुजारी आणि ग्रंथी हे समाजातील महत्त्वाचा भाग आहेत परंतु ते दुर्लक्षित राहिलेले घटक आहेत. देशात प्रथम आमचे सरकार त्यांना मदत करण्यासाठी एक योजना आणत आहोत. ज्या योजनेअंतर्गत त्यांना 18 हजार रुपये मासिक भत्ता दिला जाणार असल्याचे आपचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच या योजनेची नोंदणी ही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुजारी ग्रंथी सन्मान योजना दिल्ली सरकारने सुरू केली आहे. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लस येथील हनुमान मंदिराला Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल भेट देणार आहेत. तसेच पुजाऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
ठळक मुद्दे
पुजारी ग्रंथी सन्मान योजना 2024 मराठी माहिती
Pujari Granthi Samman Yojana 2024 Information In Marathi
पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची नोंदणी प्रक्रिया
Pujari Granthi Samman Yojana Registration
पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची पात्रता
Pujari Granthi Samman Yojana Eligibility
पुजारी ग्रंथी सन्मान योजना अर्ज प्रक्रिया
Pujari Granthi Samman Yojana Apply
पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची नोंदणी प्रक्रिया
Pujari Granthi Samman Yojana Registration
Pujari Granthi Samman Yojana 2024 पुजारी ग्रंथी सन्मान योजना ची नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. अरविंद केजरीवाल स्वतः कॅनोट प्लस येथील हनुमान मंदिरात जाऊन नोंदणी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाचे पदाधिकारी दिल्लीमध्ये सर्व मंदिर आणि गुरुद्वार मध्ये जाऊन पात्र असलेल्या पुजारी आणि ग्रंथींची नोंदणी करणार आहे.
नोंदणी झाल्यानंतर पुजारी आणि ग्रंथींना 18000 रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. मात्र दिल्ली मध्ये सेवा करणाऱ्या पुजारी आणि ग्रंथांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सध्या या योजनेसाठी काय अटी नियम आहेत याची माहिती समोर आलेली नाही.
पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची पात्रता
Pujari Granthi Samman Yojana Eligibility
या योजनेअंतर्गत राजधानी दिल्ली मधील मंदिर आणि गुरुद्वारामध्ये काम करणारे पुजारी आणि ग्रंथी पात्र असतील. पात्र पुजारी आणि ग्रंथींना सरकार प्रत्येक महिन्याला 18 हजार रुपये आर्थिक मदत करणार आहे.
सरकारद्वारे दिलेल्या माहितीत या व्यतिरिक्त अजून काय पात्रता असतील याबद्दल सविस्तर माहिती दिलेली नाही. आणि या योजनेमध्ये चर्च किंवा मस्जिद मधील धार्मिक गुरूंना पण या योजनेचा लाभ देणार का याबद्दलही माहिती दिलेली नाही. त्याबद्दल काय निर्णय होतो ते लवकरच आपल्याला कळेल.
पुजारी ग्रंथी सन्मान योजना अर्ज प्रक्रिया
Pujari Granthi Samman Yojana Apply
दिल्ली सरकारने सुरू केलेल्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल म्हणाले की ते स्वतः राजीव चौक कातिल प्राचीन हनुमान मंदिर मध्ये मंगळवारी म्हणजेच आज जाणार आहेत. तिथून ते स्वतः पुजाऱ्यांची नोंदणी प्रक्रिया योजना ची सुरुवात करतील.