Renewable Energy Information in Marathi : अक्षय ऊर्जा निर्मितीत भारताची भरारी

Renewable Energy Information in Marathi 2024 : अक्षय ऊर्जा योजना

Renewable Energy Information in Marathi : केंद्र सरकार देशाच्या नागरिकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असते. त्याच पद्धतीने देशाच्या विकासासाठी ही मोठमोठ्या योजना राबवून देशाचा विकास केला जात असतो. यातूनच अक्षय ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच आज अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताने 200 गिगावॅट चा टप्पा पार केला आहे. आता देशाची एकूण अक्षय ऊर्जाची क्षमता 46.3% एवढी झाली आहे. ही अक्षय ऊर्जा निर्माण करताना केंद्र सरकारने नैसर्गिक साधन संपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही काळजी घेतली आहे.

Renewable Energy Information in Marathi  देशातील एकूण अक्षय ऊर्जा क्षमता 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत 200 गिगावॅटचा आकडा पार केला आहे. याबरोबरच भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणा नुसार एकूण अक्षय ऊर्जा आधारित वीज उत्पादन क्षमता आता 201.45 गिगावॅट झाली आहे, हे यश स्वच्छ उर्जेच्या प्रती भारताची वाढती प्रतिबद्धता आणि हरित भविष्य निर्माण मध्ये प्रगती दाखवते.

Renewable Energy In India भारताला मिळालेले हे यश नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्याच्या दिशेने अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे. देशांमध्ये मोठ-मोठे सौर पॅनल आणि पवन चक्की आणि जलविद्युत योजना राबविण्यात येत आहेत. भारताने सतत विविधपूर्ण अक्षय ऊर्जा निर्मितीवर भर दिलेला आहे. यामुळे जीवाश्म इंधनाच्या वापरात कमतरता आली आहे. याबरोबरच देशाला ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातही मजबूत केले आहे. 8,180 मेगावॅट परमाणु क्षमता लक्षात घेता एकूण गैर जीवाश्म इंधन आधारित वीज आता देशाची स्थापित वीज उत्पादन क्षमता मध्ये जवळपास अर्धी भागीदार झाली आहे. यामुळे जागतिक मंचावर स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारत नेतृत्व करण्याच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल टाकत आहे.

Renewable Energy Information in Marathi

भारतातील नवीकरणीय ऊर्जा

Renewable Energy In India भारताची एकूण वीज उत्पादन क्षमता 452.69 गिगावॅट पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये अक्षय ऊर्जा चे योगदान एकूण वीज उत्पादनात अधिक आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत अक्षय ऊर्जा आधारित वीज उत्पादन क्षमता 201.45 झाली आहे.

Renewable Energy In India जी देशातील एकूण ऊर्जा उत्पादनामध्ये एकूण 46.3% एवढी आहे. यामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल होणार आहे आणि देशात स्वच्छ गैर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा स्त्रोतांवर वाढत्या निर्भरताची माहिती मिळते.

Renewable Energy या प्रभावशाली आकड्यामध्ये विविध नवीकरणीय ऊर्जा साधनांचे योगदान महत्त्वाचे आहे. सौर ऊर्जा 90.76 गिगावॅट बरोबरच सर्वात अधिक आहे जी भारताला मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पासून मिळते. पवन ऊर्जा क्षेत्रात 47.36 गिगावॅट उत्पादन होते आणि ती दुसऱ्या क्रमांकावर आहे ती देशातील डोंगर भागात पवनचक्कीच्या माध्यमातून मिळवली जाते.

जलविद्युत ऊर्जाचे मोठे योगदान आहे. यात मोठ्या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज 46.921 आणि छोट्या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज 5.07 गिगावॅट उत्पन्न मिळते, ही देशातील नदी, धरणे आधी ठिकाणाहून मिळते.

Renewable Energy In India बायोगॅस ऊर्जासह बायो पावर, अक्षय ऊर्जा मिश्रणमध्ये 11.32 गिगावॅट निर्मिती करते. ही जैव ऊर्जा योजनेच्या कृषी अपविष्ठ आणि अन्य जैविक साधनाचा वापर करून वीज निर्माण केली जाते. ज्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांमध्ये अधिक विविधता येते. याबरोबरच नवीकरणीय साधने देशाला पारंपारिक जीवाश्म इंधनातील आपली निर्भरता कमी करण्यास मदत करत आहे तर एक अधिक टिकाऊ आणि लवचिक ऊर्जा भविष्याकडे घेऊन जात आहे.

Renewable Energy अक्षय ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर असणारी राज्य

Renewable Energy देशातील अनेक राज्य नवीकरणीय ऊर्जा क्षमतामध्ये समोर येत आहेत. ज्यांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. राजस्थान 29.98 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, जो आपल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जमिनीचा वापर करून सूर्यप्रकाशाचा लाभ घेत ऊर्जा निर्मिती करत आहे. 29.52 गिगावॅट क्षमतेसह गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात सौर आणि पवन ऊर्जा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा निर्मिती करत आहे. त्यानंतर तामिळनाडू 23.70 गिगावॅट उत्पन्नासह तिसऱ्या क्रमांकावर आहे तर कर्नाटक 22.47 गिगावॅट क्षमतेसह चौथ्या क्रमांकावर आहे. जो सौर आणि पवन अशा दोन्ही माध्यमातून ऊर्जा निर्मिती करत आहे, ही राज्य भारताला अक्षय ऊर्जा क्षेत्रात पुढे घेऊन जात आहेत आणि अधिक टिकाऊ ऊर्जा भविष्य निर्माण करण्यासाठी मोठी भूमिका निभावत आहेत.

Renewable Energy Information in Marathi

Renewable Energy अक्षय ऊर्जा योजना

Renewable Energy In India केंद्र सरकारने देशभरात नवीकरणीय ऊर्जा क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि यामध्ये तेजी आणण्यासाठीच्या उद्देशाने अनेक उपाय योजना केले आहेत. यामध्ये 2030 पर्यंत गैर जीवाश्म स्त्रोतापासून 500 गिगावॅट विद्युत क्षमता मिळवण्याचे महत्त्वकांक्षी लक्ष ठेवण्यात आले आहे. प्रमुख कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, पीएम कुसुम, पी एम सूर्यघर आणि सौर पी व्ही मॉडेलसाठी PLI योजनाचा समावेश आहे.

Renewable Energy Information in Marathi केंद्र सरकारचे हे प्रयत्न जलवायू परिवर्तन आणि ऊर्जा सुरक्षाद्वारे निर्माण झालेल्या समस्याचे समाधान करत ऊर्जा क्षेत्रात भविष्यला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारची प्रतिबद्धता दाखवत आहे. अन्य प्रमुख प्रयत्न खालील प्रमाणे…

आर्थिक वर्ष 2023- 24 ते 2027- 28 पर्यंत अक्षय ऊर्जा कार्यान्वय एजन्सी आरइआयएद्वारे प्रति वर्ष ५० गिगावॅट अक्षय ऊर्जा वीज निर्मिती योजनाची अधिसूचना.

गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्वयंचलित रूट अंतर्गत 100% प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीची परवानगी.

30 जून 2025 पर्यंत चालू होणाऱ्या सौर आणि पवन ऊर्जा योजनासाठी आणि डिसेंबर 2030 पर्यंत हरित हायड्रोजन योजना आणि डिसेंबर 2032 पर्यंत पवन ऊर्जा योजनासाठी आंतरराष्ट्रीय पारेषण प्रणाली शुल्क मध्ये सूट देण्यात आली आहे.

विकेंद्रीकृत नवीकरणीय ऊर्जासाठी वेगळे आरपीओ सहित 2029- 30 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा खरेदीदायित्वची घोषणा.

नवीकरणीय क्षेत्रात गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी प्रकल्प विकास कक्ष स्थापन करणे.

मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी अल्ट्रा मेगा रिमुंबल एजन्सी स्थापना करण्यात आली आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पासाठी राष्ट्रीय पुनर्शक्ती आणि जीवन विस्तार धोरण 2023 लागू करण्यात आले आहे.

2030 पर्यंत पारेषण पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी पारेषण योजना सुरू करण्यात आली आहे.

नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन एनर्जी ओपन एक्सेस नियम 2022 लागू करण्यात आला आहे.

नवीकरणीय ऊर्जा उत्पादनांना वेळेवर पैसे देण्याच्या उद्देशाने क्रेडिट पत्र किंवा आगाऊ देयक आधारावर वीज पुरवठा केला जाणार आहे.

200 गिगावॅट पेक्षा अधिक क्षमतेसह देशात अक्षय ऊर्जा प्रवासाने मोठा टप्पा गाठला आहे, हे यश सौर- पवन- जलविद्युत आणि जैव ऊर्जा या विविध प्रकारच्या नवीकरणीय स्त्रोताद्वारे समर्थक शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी राष्ट्राच्या वचन पद्धतीचा पुरावा आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, पीएम कुसुम योजना, पीएम सूर्य घरी योजना आणि सौर पीव्ही मॉडल्ससाठी PLI  योजना यासारख्या सक्रिय उपक्रम जीवाश्म इंधनावरील अवलंबत्व कमी करतात.

Renewable Energy Information in Marathi ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यावर सरकारचा धोरणात्मक जोर आहे. 2030 पर्यंत जीवाश्म असलेल्या स्त्रोतामधून 500 गिगावॅटच्या उद्दिष्टासह भविष्यासाठी निश्चित केलेल्या महत्त्वकांशी लक्ष पर्यावरणीय शाश्वतता आणि ऊर्जा सुरक्षामध्ये योगदान देत आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात जागतिक नेता म्हणून समोर यायचे आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये उदयास येण्याची भारताची स्थिती चांगली आहे, हे प्रयत्न हरित अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. भारताने केवळ आपल्या ऊर्जेच्या गरजाच पूर्ण केल्या नाहीत तर हवामान बदल संसाधनाच्या संवर्धनाच्या आव्हानासाठी ही सामोरे जात सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून प्रयत्न केले आहेत.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024