Saugat-e-Modi Yojana 2025 In Marathi : 32 लाख गरीब मुस्लिमांना मिळणार ईद चे गिफ्ट

Saugat-e-Modi Yojana 2025 Information In Marathi : सौगात-ए-मोदी योजना काय आहे

Saugat-e-Modi Yojana 2025 : रमजान ईद जवळ येत आहे. या रमजान ईद च्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भाजप नेत्यांकडून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशभरातील गरीब मुस्लिमांना ईद निमित्त सौगात-ए-मोदी हे गिफ्ट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे गिफ्ट तब्बल 32 लाख मुस्लिमांना मिळणार दिले जाणार आहे.

Saugat-e-Modi Yojana ईद निमित्त केंद्र सरकारने मुस्लिमांना एक खास भेट दिली आहे. जेणेकरून ते अत्यंत उत्साहाने ईद साजरी करतील त्यांना ईद साजरी करण्यात कोणती अडचण येऊ नये या मुद्द्यावर भाजप नेते नीरज कुमार म्हणाले की, आता मुस्लिम समुदायालाही काही दलाल आणि काही कंत्राटदारांच्या तावडीतून बाहेर पडावे लागेल. भाजपचे 32 हजार पदाधिकारी बत्तीस हजार मशिदींना भेट देतील आणि 32 लाख गरीब मुस्लिमांना मोदी भेट देतील.

काय आहे सौगात-ए-मोदी किट

what is saugat-e-modi yojana

Saugat-e-Modi Yojana सौगात-ए-मोदी ही गरीब मुस्लिमांसाठी एक भेट आहे. ईद साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्य या किटमध्ये असणार आहे. जसे की शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप, महिलांसाठी सुती कपडे यासह इतर काही आवश्यक वस्तूंचाही या किटमध्ये समावेश असू शकतो.

Saugat-e-Modi Yojana या योजनेमुळे मुस्लिम कुटुंबांमध्ये आनंद वाढेल व ते नागरिक अत्यंत उत्साहाने त्यांची ईद साजरी करू शकतील असे भाजपचे म्हणणे आहे. भाजपची ही मोहीम 25 मार्च 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. याची सुरुवात नवी दिल्लीतील गालीब अकादमीतुन करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपचा 1 कार्यकर्ता 100 लोकांशी संपर्क साधेल. बिहार साठी हे अभियान राबवले जात असल्याची चर्चा सुरू आहे. बिहार सह इतर राज्यांमध्ये देखील हे अभियान राबवले जाणार आहे.