New Labour Code Impact : नवीन कामगार कायदा लागू पगारापासून ते PF वर होणार परिणाम

New Labour Code Impact In Marathi : सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. आता सरकार नवीन कामगार कायदा लागू करणार आहे. त्यामुळे याचा परिणाम पगार पासून ते PF पर्यंत होणार आहे.

नवीन कामगार कायद्याच्या अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या कायद्यामुळे अनेक बदल होणार आहेत.

नवीन कायद्यामुळे सॅलरी सेक्टर, वर्क प्लेसची प्रक्रिया आणि कंपलाईन्स सिस्टीम मध्ये बदल होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नवीन कामगार कायद्याची घोषणा केली.

यातील चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. या कायद्याने जुन्या 29 कामगार कायद्याची जागा घेतली आहे. यामध्ये वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, कामाशी संबंधित सुरक्षा इत्यादींचा समावेश आहे.

पगारात होणार बदल

ईवाय इंडियाच्या पीपल ॲडव्हायझरी सर्विसेसच्या टॅक्स विभागाने भागीदार पुनीत गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, हे कायदे प्रामुख्याने त्या क्षेत्रांना लागू होतील. जिथे केंद्र सरकारचा प्रभाव आहे म्हणजेच बँक, सर्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, हवाई वाहतूक, प्रमुख बंदरे इत्यादी ठिकाणी लागू होतील.

या नियमामुळे किमान वेतन, कामाचे तास आणि पगाराबाबत अधिक स्पष्टता आली आहे. नवीन कामगार कायद्यात कामाचे तास प्रत्येक आठवड्याला 48 तास गेले आहेत तसेच दंड, आगाउ रक्कम, नुकसान या कपातील साठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागेल.

कर्मचारी नोंदवही, पगाराची नोंद, हजेरीची नोंदवही यासाठी नियम तयार करण्यात आले आहे. याबाबत मनी कंट्रोल वृत्त दिले आहे. हा नवीन कायदा लागू केल्यामुळे आता पगारावर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येणार आहे. त्याचबरोबर PF वर देखील याचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे.