Soyabean Kapus Anudan Yojana 2024 In Marathi : सोयाबीन- कापूसासाठी 5 हजार रुपये अनुदान

Soyabean Kapus Anudan Yojana 2024 Information In Marathi : सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Soyabean Kapus Anudan Yojana 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन -कापूस पिकासाठी राज्य सरकारकडून पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. सोयाबीन कापूस अनुदान योजनेची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरिम बजेट 5 जुलै 2024 ला केली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2023 च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे नुकसान झाले होते, त्यावर अनुदान म्हणून 5 हजार रुपये देण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे. यापूर्वी सरकारने 2023 मध्ये इ- पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचे महाराष्ट्र सरकारला लक्षात आल्यानंतर त्यांनी हे अनुदान राज्यातील सर्व कापूस- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये नुसार देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा देखील झाले आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेली नव्हते अशा शेतकऱ्यांचे अनुदान जमा होणे सुरू आहे.

Soyabean Kapus Anudan Yojana

Soyabean Kapus Anudan Yojana सोयाबीन -कापूस अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षी दुष्काळ पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. परिणामी त्यांच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सोयाबीन- कापूस अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

Soyabean Kapus Anudan राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांच्यासाठी या योजनेचा कसा लाभ घेता येईल. सोयाबीन कापूस- अनुदान योजना म्हणजे काय? यासाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

ठळक मुद्दे

सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Soyabean Kapus Anudan Yojana 2024 Information In Marathi

सोयाबीन कापूस अनुदान योजना थोडक्यात माहिती

Soyabean Kapus Anudan Yojana In Short

सोयाबीन कापूस अनुदान योजना म्हणजे काय?

What Is Soyabean Kapus Anudan Yojana

सोयाबीन- कापूस अनुदान योजनेची पात्रता

Soyabean Kapus Anudan Yojana Eligibility

सोयाबीन- कापूस अनुदान योजनेसाठीची कागदपत्रे

Soyabean Kapus Anudan Yojana Documents

सोयाबीन कापूस अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

Soyabean Kapus Anudan Yojana Apply

सोयाबीन- कापूस अनुदान योजनेची यादी अशी पहा..

Soyabean Kapus Anudan Yojana List

सोयाबीन कापूस अनुदान योजना थोडक्यात माहिती

Soyabean Kapus Anudan Yojana In Short

योजनेचे नावसोयाबीन कापूस अनुदान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू झाली5 जुलै 2024
लाभ5 हजार रुपये प्रति हेक्टर
लाभार्थीराज्यातील शेतकरी
उद्देश कापूस- सोयाबीन पिकासाठी अनुदान
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

सोयाबीन कापूस अनुदान योजना म्हणजे काय?

What Is Soyabean Kapus Anudan Yojana

महाराष्ट्र सरकारने 5 जुलै 2024 रोजी अंतरिम बजेट सादर करत असताना राज्यातील शेतकऱ्यांचे 2023 मध्ये जे नुकसान झाले, त्यावेळी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये दोन हेक्टरची मर्यादा ठेवून त्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Soyabean Kapus Anudan या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन- कापूस अनुदान योजनेचा अर्ज जमा करणे बंधनकारक आहे. तेव्हाच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेच्या माध्यमातून 2 हेक्टरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Soyabean Kapus Anudan Yojana याव्यतिरिक्त राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन-कापूस पिकाची इ-पिक पाहणी पोर्टलवर नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी कापूस- सोयाबीन पिकाची लागवड केली होती, त्यांना 5 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर हे अनुदान जमा ही झाले आहे तर काही शेतकऱ्यांची केवायसी नसल्यामुळे त्यांचे खात्यामध्ये अनुदान जमा होत आहे.

Soyabean Kapus Anudan सोयाबीन -कापूस अनुदान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा होत आहे. शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन- कापूस अनुदान अर्ज आणि सहमती पत्र जवळच्या तलाठी कार्यालयात जमा करावे लागते. त्यानंतर त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होते.

सोयाबीन- कापूस अनुदान योजनेची पात्रता

Soyabean Kapus Anudan Yojana Eligibility

अर्जदार हा राज्यातील शेतकरी असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी इ- पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. तसेच आता ही पिक पाहणी केली नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. यासाठी शेतकऱ्याने संमती पत्र आणि सोयाबीन कापूस फॉर्म जवळच्या तलाठी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

सोयाबीन- कापूस अनुदान योजनेसाठीची कागदपत्रे

Soyabean Kapus Anudan Yojana Documents

आधार कार्ड

बँक खाते क्रमांक

संमती पत्र

ई पीक पाहणी पोर्टलवर रजिस्ट्रेशन

मोबाईल नंबर

सोयाबीन- कापूस शेतात पेरल्याचा फॉर्म

Soyabean Kapus Anudan Yojana

सोयाबीन कापूस अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

Soyabean Kapus Anudan Yojana Apply

महाराष्ट्र सरकारने दिलेले कापूस- सोयाबीन अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. सोयाबीन- कापूस अनुदान योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी इ पिक पाहणी केली असेल तरच शेतकऱ्यांना प्रथम लाभ दिला गेला, मात्र  त्यानंतर शेतकरी वंचित राहत असनाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे.

कापूस सोयाबीन संमती पत्र आणि अर्ज संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन तलाठ्याकडे हे अर्ज आणि हमीपत्र द्यायचे आहे.

त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी केवायसी केलेली असणे आवश्यक असावी.

योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रती हेक्टर 5 हजार रुपये (दोन हेक्टर ची मर्यादा नुसार) शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील.

सर्वात प्रथम अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने सोयाबीन- कापूस अनुदान संमती पत्र डाउनलोड करावे. त्याची प्रिंट काढावी, त्यानंतर संमती पत्रावर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी. यामध्ये नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर आदी. त्यानंतर खाली सही करावी.

संमती पत्रानंतर, ना हरकत प्रमाणपत्र द्यावे.

अर्ज, संमती पत्र व विचारले संपूर्ण माहिती भरावी आणि ते दोन्ही अर्ज जवळच्या तलाठी कार्यालयात जमा करावेत.

त्यानंतर तुम्हाला सोयाबीन- कापूस अनुदान योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळेल.

सोयाबीन- कापूस अनुदान योजनेची यादी अशी पहा..

Soyabean Kapus Anudan Yojana List

सर्वात प्रथम तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट पोर्टल ओपन करा.

त्यानंतर सोयाबीन कापूस अनुदान केवायसी केल्यानंतर जो व्हीआयके नंबर देण्यात येईल. तो याच पोर्टलवर सबमिट करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर सोयाबीन- कापूस अनुदान लिस्ट या पर्याय यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर सोयाबीन- कापूस अनुदान स्टेटस ओपन होईल आणि त्यावर क्लिक करून तुम्ही ते चेक करू शकता.

त्यावर तुम्हाला किती रक्कम मिळाली आहे. कोणत्या खात्यात जमा झाली आहे.

कधी झाली आहे किंवा कधी होणार आहे, याची संपूर्ण माहिती मिळू पाहायला मिळेल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सोयाबीन- कापूस अनुदान योजनेची यादी पाहू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

सौर कुंपण योजना 

मनोधर्य योजना

स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना 

प्रधानमंत्री आवास योजना 

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

संसद आदर्श ग्राम योजना

पंतप्रधान प्रमाण योजना

पीएम इंटर्नशिप योजना 

मुलींसाठीच्या सरकारच्या टॉप 10 योजना

इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 

 CBSE उडान योजना 2024 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी 2.0 साठी मंजुरी

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना