Subhadra Yojana 2024 Update In Marathi : 80 लाखापेक्षा अधिक महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ

Subhadra Yojana 2024 Update In Marathi : मुख्यमंत्र्याकडून तिसरा हप्ता जारी

Subhadra Yojana 2024 Update सुभद्रा योजनेचा आतापर्यंत 80 लाख पेक्षा अधिक महिलांना लाभ झाला आहे. सुंदरगड जिल्ह्यातून मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी या योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील पहिला हप्ता जारी केला आहे.

Subhadra Yojana 2024 Update महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार अनेक सरकारी योजना राबवत असते अशाच प्रकारची ही एक सुभद्रा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. ही योजना ओडीसा सरकार द्वारे चालवली जाते. सुभद्रा योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत 80 लाख पेक्षा अधिक महिलांना लाभ झाला आहे. सुंदरगड जिल्हातून ओडीसाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी या योजनेच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यातील पहिला हप्ता जारी केला आहे.

किती मिळतो लाभ

Subhadra Yojana 2024 Update

Subhadra Yojana 2024 Update In Marathi ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी 20 लाख महिलांच्या खात्यामध्ये 5000 रुपये ची रक्कम हस्तांतरित केली आहे. ओडीसा सरकारचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील जवळपास 1 कोटी महिलांना योजनेशी जोडून त्यांना या योजनेचा लाभ देणे हा आहे.

महिलांची मदत करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकार द्वारे 5 हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. जेणेकरून महिला त्यांच्या विकासासाठी या पैशाचा वापर करू शकतील. राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1000 कोटी रुपये पेक्षा अधिक रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. आत्ता राज्यातील 4.59 लाख महिलांनी या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे. यातील तिसऱ्या टप्प्यातील पहिला हप्ता 3.37 लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आला आहे.

सुभद्रा योजनेची उद्दिष्टे

Subhadra Yojana Purpose 

  • ओडिसा राज्यातील महिलांना सक्षम बनवणे.
  • राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
  • ओडिसा राज्यातील महिलांना पुढील पाच वर्ष प्रत्येकी वर्षाला 10 हजार रुपये याप्रमाणे 50 हजार रुपयांचे आर्थिक मदत देणे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे.
  • योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत करून त्या महिलांचे सक्षमीकरण करणे हेही मुख्य उद्दिष्टे आहे.

सुभद्रा योजना 2024 ची वैशिष्ट्ये

 Subhadra Yojana 2024 Features

  • 17 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ओडीसा सरकारने सुभद्रा योजना सुरू केली आहे.
  • Subhadra Yojanaया योजनेच्या माध्यमातून महिलांना वार्षिक 10 हजार रुपये दिले जाणार आहेत.
  • ही रक्कम महिलांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.
  • ही योजना ओडीसा सरकार 2024 -25 ते 2028 -29 पर्यंत चालणार आहे.
  • या एकूण पाच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
  • हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातील.
  • याबरोबरच महिलांना डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.
  • प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी संस्था सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणाऱ्या 100 महिलांना 500 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत.

सुभद्रा योजनेची पात्रता

Subhadra Yojana Eligibility

  • ओडिसा राज्यातील 21 ते 60 वर्षा दरम्यानच्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  • अर्जदार महिला ओडिशाची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • सरकारी कर्मचारी असलेली महिला या योजनेसाठी पात्र नाही.
  • आयकर भरणाऱ्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  • ज्या महिला यापूर्वीपासूनच राज्य सरकारच्या 1500 रुपयांच्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया

Subhadra Yojana Online Apply ओडिसातील ज्या महिलांना सुभद्रा योजनेअंतर्गत नोंदणी करायची आहे त्यांनी सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर महिलांनी लाभार्थी यादी या पर्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या परिसराची ती माहिती मिळेल. ग्रामपंचायत बरोबरच वार्ड किंवा गाव याची माहिती मिळेल त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.

यादीत आपले नाव चेक करण्याची पद्धत

जर लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर राज्य सरकारकडून पाठवलेली रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. लाभार्थी महिलेला बँक खाते आणि आधार कार्ड सारखी आवश्यक माहिती सह आवश्यक कागदपत्रे या वेबसाईटवर अपलोड करावे लागते.