Sukanya Samriddhi Yojana 2025 in marathi : सुकन्या समृद्धी योजनेबद्दल महत्वाचे
Sukanya Samriddhi Yojana 2025 : देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. जर तुमच्या घरी ही एखादी लहान मुलगी असेल तर तुम्हाला तिच्या भविष्यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही.
Sukanya Samriddhi Yojanaआज आपण या योजनेच्या माध्यमातून पाहू की, तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कसे सुरक्षित करू शकता. तुम्हालाही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर हा लेख पूर्ण वाचा.
Sukanya Samriddhi Yojanaया योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावे पालकाद्वारे एक बचत खाते उघडले जाते. या खात्यामध्ये थोडे थोडे पैसे जमा केले जातात. जे भविष्यात मुलीला कामी येतात. या योजनेअंतर्गत अन्य कुठल्याही योजनेपेक्षा तुम्हाला अधिक व्याज प्राप्त होते.
याव्यतिरिक्त ही एक सरकार द्वारे चालवली गेलेली नवीन योजना आहे. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची फसवणूक होण्याची भीतीही तुम्हाला नाही.
Sukanya Samriddhi Yojana2025सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून जर तुम्हालाही लाभ मिळवायचा आहे तर तुम्ही आपल्या मुलीच्या नावावर एक बचत खाते उघडावे. तुमच्या मुलीचे बचत खाते तेव्हाच उघडले जाईल जेव्हा तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही मुलीच्या नावावर एक बचत खाते उघडू शकता आणि पैशाची गुंतवणूक करू शकता.
Sukanya Samriddhi Yojana 2025 In Marathiतुम्ही उघडलेल्या खात्यामध्ये तुम्हाला सतत एक ठराविक रक्कम जमा करावी लागेल. ती कमीत कमी 250 रुपये असणे आवश्यक आहे. तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पर्यंत करू शकता. ही रक्कम तुम्ही वर्षभरात एकदा जमा करू शकता.
जर तुम्ही या योजनेअंतर्गत वर्षभरात एकदाही रक्कम जमा केली नाही तर तुम्हाला यासाठी पेनल्टी द्यावी लागेल. तुम्ही जमा केलेला पैसा व्याजासोबत मुलीचे वय परिपक्व होण्यापर्यंत किंवा तिच्या लग्नाच्या वेळी ही रक्कम प्राप्त करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता
Sukanya Samriddhi Yojana Eligibility
केवळ 10 वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या मुलीच या योजनेसाठी पात्र मानल्या जातील.
या योजनेअंतर्गत ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणाऱ्या मुलीच या योजनेच्या लाभार्थी ठरतील.
एका कुटुंबातील दोन मुलीच्या नावे बचत खाते उघडता येऊ शकते.
सर्व पालकांना निर्धारित निश्चित केलेल्या वेळेवर प्रीमियम रक्कम त्या खात्यामध्ये जमा करावी लागेल.
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी
Sukanya Samriddhi Yojana Duration
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलीच्या नावावर बचत खाते उघडल्यानंतर सतत 15 वर्ष ठराविक प्रीमियम रक्कम भरावी लागेल. जेव्हा तुम्ही निश्चित केलेल्या वर्षापर्यंत प्रीमियम रक्कम भरणे पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या बँकेद्वारे तुम्हाला व्याज मिळत राहील. या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये केवळ 15 वर्षापर्यंतच तुम्ही रक्कम जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठीची कागदपत्रे
Sukanya Samriddhi Yojana Documents
आधार कार्ड
पालकाचे पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडावे?
Sukanya Samriddhi Yojana Account Opening
जर तुम्हालाही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत खाते उघडायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सर्वात प्रथम तुम्हाला बचत खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या बँक मध्ये जावे लागेल.
बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्ज मिळाल्यानंतर त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.
त्यानंतर त्यासोबत द्यावयाची सर्व कागदपत्रे त्या फॉर्म सोबत जोडा.
त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज तपासून पहा.
अर्ज तपासून झाल्यानंतर तुम्ही हा अर्ज पुन्हा बँकेमध्ये जमा करा.
अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपये पर्यंत एक रकमी रक्कम जमा करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल ती पावती तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA