Temperatures Drop in Maharashtra 2024 In Marathi : थंडी वाढली.. शेकोटी पेटवली..
Temperatures Drop in Maharashtra : राज्यातील वातावरणात गेल्या दोन दिवसापासून बदल झाला आहे. राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील पुणे, मुंबई सह अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा हा घसरला आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळत आहे. पुण्याचे तापमान 10 अंशावर आले आहे तसेच मुंबईतील तापमानात घसरण झाली आहे. Meteorological department forecast हवामान तज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 5 दिवस थंडीचा कडाका राहणार आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. Meteorological department forecast
Temperatures Drop in Maharashtra सध्या राज्यात सर्वत्र थंडी वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. काही शहराचे तापमान 8 ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे, तर परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बदलामुळे राज्यात थंडीचा असाच कडाका पुढील पाच दिवस राहणार असल्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. पुण्याचे तापमान 10 अंशावर तर मुंबईचे तापमान 16 अंशावर आलेले आहे. त्याचबरोबर 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पाच दिवस थंडीचा कडाका
Cold in next five days in Maharashtra
Cold in next five days in Maharashtra पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर पर्यंत असण्याची शक्यता आहे. 27 नोव्हेंबर रोजी निर्माण होणारे हे चक्रीवादळ येत्या 2 दिवसात श्रीलंकेचा किनारा ओलांडून तमिळनाडूच्या दिशेने जाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर नक्कीच होणार असल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका हा पाच दिवस असेल अशी माहिती दर्शवण्यात आली आहे. Cold in next five days in Maharashtra