The Government Is Running These 5 Schemes To Farmers 2024 In Marathi : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या पाच योजना
The Government Is Running These 5 Schemes To Farmers 2024 In Marathi : शेतकऱ्यांना PMFBY या योजने अंतर्गत पेरणी करण्यापासून ते पिकाची कापणी करेपर्यंत पिकाला विमा संरक्षण दिले जाते. नैसर्गिक आपत्ती किंवा कुठल्याही किडीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. The Government Is Running These 5 Schemes To Farmers
Shetkari Top 5 Yojana शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारसोबत विविध राज्य सरकारनेही अनेक योजना सुरू केलेले आहेत. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास 4 टक्के वाढले आहे.
Shetkari Top 5 Yojana नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार, 2012 -13 मध्ये शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न 6426 रुपये होते जे 2018 -19 मध्ये 10218 रुपये झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार केवळ नवीन योजनाच सुरू करत नाही तर आपल्या धोरणातही सतत बदल करत असते, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. The Government Is Running These 5 Schemes To Farmers
शेतकऱ्यांना आर्थिक मजबूत करतात या पाच योजना
Shetkari Top 5 Yojana
प्रधानमंत्री फसल बीमा योजना
Pradhanmantri Fasal Bima Yojana
Pradhanmantri Pik Vima Yojana शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून पिकाच्या पेरणी पासून ते कापणी पर्यंत विमा संरक्षण दिले जाते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पावसामधील खंड आदी प्रकारे शेतीचे नुकसान झाल्यास PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होते. या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा Pradhanmantr Pik Vima Yojana मुख्य उद्देश आहे. या योजनेचा देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नैसर्गिक संकटाचा शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसतो. शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. The Government Is Running These 5 Schemes To Farmers
किसान क्रेडिट कार्ड योजना
Kisan Credit Card Yojana
Kisan Credit Card Yojana शेतकऱ्यांना अल्प व्याजदरावर कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जेणेकरून शेती संबंधित कामे करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये. या योजनेच्या माध्यमातून व्याजदरामध्ये 2 टक्के सवलत दिली जाते. याव्यतिरिक्त किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून रिपेमेंट वरही प्रोत्साहन दिले जाते.
देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card च्या माध्यमातून केवळ 4 टक्के वार्षिक व्याजदरावर 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या योजनेत शेती व्यतिरिक्त पशुसंवर्धन, मत्स्यपालन करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपये कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज कोणत्याही हमी शिवाय शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला काही तारण ठेवण्याची आवश्यकता पडत नाही.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पेन्शन सुरू केली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक मदत होते. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वय असणारे शेतकरी प्रत्येक महिन्याला 55 रुपये ते 200 रुपये गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 3 हजार रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते.
केंद्र सरकारने सुरू केलेली Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana किसान मानधन योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली योजना ठरताना दिसत आहे. वयाची 60 वर्षे झाल्यानंतर अनेक शेतकरी शेतात काम करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र त्यांचे वय झाल्यानंतर त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हजार रुपये महिना पेन्शन देण्यात येते. जसे की सरकारी कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर सरकारी पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही पेन्शन मिळावे या हेतूने ही योजना सरकारने सुरू केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये प्रमाणे एकूण तीन हप्ते थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीडीच्या माध्यमातून जमा केले जातात. या योजनेची सुरुवात मोदी सरकारने 2019 मध्ये केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आली आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
नमो शेतकरी योजनेचा Namo Shetkari Yojana उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही हातभार लावतात ही योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी पेक्षा अधिक राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये निधी दिला जाणार आहे. केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6000 रुपये असे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 वर्षाला तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहेत. तुम्हीही शेतकरी आहात आणि या योजनेचा लाभ तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.
नमो ड्रोन दीदी योजना
Namo Drone Didi Yojana
Namo Drone Didi Yojana केंद्र सरकारने महिलांचा विकास करण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून शेतकरी महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवले जाऊ शकेल.
ड्रोन दीदी योजना Namo Drone Didi Scheme साठी 500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या निधीमध्ये 2.5 पट अधिक आहे. मागील वर्षी या योजनेसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान ड्रोन दीदी योजनेचे अनेक फायदे होणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम बनवणे ही प्राथमिकता आहे. ही योजना त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवेल. या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उत्पादन आणि क्षमता मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना कृषी क्षेत्रात खर्च होणाऱ्या रकमेमध्ये कमतरता आणू शकते. या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नमो ड्रोन दीदी योजना Namo Drone Didi Yojana ही भारत सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. नमो ड्रोन दीदी योजनेची सुरुवात 2022 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत 1 लाख महिलांना पुढील पाच वर्षांमध्ये प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ही योजना देशभरातील कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत लागू करण्यात येणार आहे.