these 15 banks will be closed from 1st may In Marathi : मोदी सरकारचा मोठा निर्णय
these 15 banks will be closed from 1st may : देशातील अनेक ग्रामीण भागातील बँका 1 मे पासून बंद होत आहेत. नुकतीच सरकारने याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ग्रामीण बँकांची संख्या 43 वरून 28 पर्यंत येणार आहे. तुमचे गावातील बँकेत बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील अनेक ग्रामीण बँका 1 मे पासून बंद होत आहेत.
these 15 banks will be closed from 1st may केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक धोरण अंतर्गत या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या 43 वरून 28 पर्यंत कमी होणार आहे.
one state one RRB सरकारने हा निर्णय घेण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे बँकिंग सेवा मजबूत करणे हा आहे, तर त्याचबरोबर बँकांना अधिक प्रवाह प्रभावी करणे हा देखील या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर तुमच्या खात्यात असलेल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
one state one RRB तर आज या लेखाच्या माध्यमातून आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून 1 मे पासून कोणत्या बँका बंद होणार आहेत याची यादी पाहणार आहोत. त्याचबरोबर अशा बँकांमध्ये असलेले तुमच्या बँक खात्याचे पैसे तुम्हाला परत मिळणार का किंवा तुमच्या पैशांचं काय होईल याची देखील माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
या राज्यांचा आहे समावेश
Banking Update सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला 11 राज्यांमध्ये दिसून येणार आहे. 11 राज्यांमधील या 15 बँका बंद होणार आहे. हे कोणत्या 11 राज्य आहे ते आपण पाहू.
- आंध्र प्रदेश
- उत्तर प्रदेश
- पश्चिम बंगाल
- बिहार
- गुजरात
- जम्मू आणि काश्मीर
- कर्नाटक आणि मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- ओडिशा
- राजस्थान
या राज्यांचा समावेश आहे.
खातेदारांच्या पैशांचे काय होणार
Banking Update सरकारच्या या निर्णयानंतर ग्राहकांना पूर्वीपेक्षाही चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यामुळे डिजिटल आणि ग्राहक सेवा, पायाभूत सुविधा देखील मजबूत होतील. बँक शाखांच्या संख्येत कोणतीही कपात होणार नाही. जर तुमचेही या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही फक्त तुमच्या बँकेचे नाव बदलेल. खाती, कर्ज आणि इतर सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. या बदलानंतर बँक आपल्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक मेसेज द्वारे कळवणार आहे. त्याचबरोबर नवीन चेकबुक आणि पासबुक देखील मिळणार आहे.
कोणत्या आहेत 15 बँक
आंध्र प्रदेश
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक
आंध्र प्रगती ग्रामीण बँक
सप्तगिरी ग्रामीण बँक
आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक
उत्तर प्रदेश
बडोदा यूपी बँक
आर्यवर्त बँक
उत्तर प्रदेशातील पहिली युपी ग्रामीण बँक
पश्चिम बंगाल
बंगिया ग्रामीण विकास बँक
पश्चिम बंगाल ग्रामीण बँक
उत्तर बंगाल आरआरबी
बिहार
दक्षिण बिहार ग्रामीण बँक
उत्तर बिहार ग्रामीण बँक
गुजरात
बडोदा गुजरात ग्रामीण बँक
सौराष्ट्र ग्रामीण बँक
जम्मू आणि काश्मीर
जम्मू आणि काश्मीर ग्रामीण बँक
यासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान यांचाही त्यात समावेश आहे.