ITR Filling 2025 In Marathi : तुम्ही आयकरदाता आहात

ITR Filling 2025 Start Date In Marathi : काय आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख

ITR Filling 2025 In Marathi : मार्च महिना संपून आता एप्रिल महिनाही संपत आहे. प्रत्येक आयकरदाता असलेल्या नागरिकांना प्रश्न पडला आहे की इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख काय आहे. चला तर मग आज या लेखाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे हे जाणून घेऊ. त्याबरोबरच इन्कम टॅक्स रिटर्न ची संपूर्ण माहिती या लेखनाच्या माध्यमातून पाहू.

ITR Filling 2025 सरकारने 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने अनेक करदाते कराच्या कक्षेतून बाहेर पडले आहेत. आपण इन्कम टॅक्सच्या कक्षेत नसल्याने आपल्याला आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहात. कारण नियमानुसार सर्वांना इन्कम टॅक्स रिटर्न हा भरावाच लागतो.

ITR Filling 2025 इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख माहिती आहे का? आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे.

ITR Filling 2025 तुम्ही तुमच्या संपूर्ण वर्षाच्या आर्थिक कागदपत्रे गोळा करायला सुरुवात करावी आणि ती वेळेवर दाखल करावी त्याचवेळी वित्तीय कायदा 2024 नुसार प्राप्ती तर कायद्याच्या कलम 115 बीएसी मध्ये सुधारणा करून नवीन कर स्लॅबला डिफॉल्ट कर व्यवस्था बनवण्यात आली आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही प्रणाली देखील निवडू शकता.

काय आहे फॉर्म 16

Form 16

ITR Date 2025 in Marathi नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरु झाले असून आयकरदातांना आता मागील वर्षाचे आयकर रिटर्न भरावे लागणार आहे. आयकर विभाग लवकरच २०२४-२५ किंवा कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी फायलींग फॉर्म अधिसूचित करण्याच्या शक्यता आहे आणि ते मुदत जवळ येत असताना करदात्यांनी सुरळीत आयटीआर भरण्याची प्रक्रिया करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ITR Date 2025 in Marathi पगारदार त्यासाठी सर्वात आवश्यक कागदपत्रांपैकी एक कागदपत्र म्हणजे Form 16 फॉर्म 16 हा आहे. हा फॉर्म 16 कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळतो. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारीशी आणि विशिष्ट आर्थिक वर्षात स्त्रोतावर कापलेला कर म्हणजेच TDS संबंधित महत्त्वाची माहिती असते.

फॉर्म 16 Form 16 आणि त्याचे घटक समजून घेणे कंपनी आणि कर्मचारी दोघांसाठीही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अचूक आयटीआर दाखल करण्यास मदत होते. फॉर्म 16 भरणे म्हणजे नियुक्ताने कर्मचाऱ्यात नियुक्तीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून TDS कापला आहे आणि तो आयकर विभागाकडे सादर केला आहे असा होतो.

ITR Filling 2025 Start Date आयकर रिटर्न भरणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजे फॉर्म सिक्सटीन आहे. कारण तो कर्मचाऱ्यांनी मिळवलेले एकूण उत्पन्न आणि भरलेले कर यांची माहिती देतो. जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरात नोकरी बदलली असेल तर प्रत्येक नियुक्तांकडून फॉर्म 16 गोळा करणे महत्त्वाचे आहे. हा फॉर्म दोन भागांमध्ये विभागला जातो भाग अ आणि भाग ब असे ह्याचे दोन भाग पडतात.

ITR Filling 2025 Start Date भाग अ मध्ये नियुक्तीने दर तीमाहीत कापलेल्या आणि जमा केलेल्या करांविषयी आवश्यक माहिती दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांचे संपूर्ण माहिती म्हणजेच त्याचे नाव, पत्ता आणि PAN क्रमांक असतो त्याचबरोबर नियुक्ताच्या कर वजावट आणि संकलन खाते क्रमांक म्हणजेच TAN यासारखी वैयक्तिक माहिती यामध्ये नमूद केलेली असते.

ITR Filling 2025 Start Date तर फॉर्म 16 मधील भाग ब हा भाग अ चा एक परिशिष्ट आहे आणि त्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराची आणि आयकर कायद्याच्या विविध कलमानखाली परवानगी असलेल्या कपातींची तपशीलवार माहिती आहे. भाग ब मध्ये कलम 10 अंतर्गत सूट म्हणजेच जसे की घर भाडे भत्ता किंवा इतर भत्ते आणि कलम 80 क आणि 80 ड अंतर्गत वजावटी ची माहिती असते.