Ude Ga Ambe serial updates datta jayanti special : दत्त जयंतीच्या शुभ दिनी यल्लमाला होणार दत्तगुरूचे दर्शन
Ude Ga Ambe serial updates datta jayanti special : सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ‘उदे ग आंबे’… कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका सुरू झालेली आहे. या मालिकेचा वेळ संध्याकाळी 6.30 वाजता चा असून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. Ude Ga Ambe serial
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती सांगणाऱ्या या मालिकेत सध्या पहिले पर्व सुरू आहे. यामध्ये रेणुका देवीच्या अवतार कार्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. रेणुका मातेच्या जन्माची गोष्ट, बालवयात तिने दाखविलेले दैवी चमत्कार या मालिकेत सुरू आहेत.
रेणुकाची मैत्रीण यल्लमा या मालिकेत आता आपल्याला दिसत आहे. यल्लमा आणि रेणुका देवीच्या मैत्रीची कथा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. येत्या 14 तारखेला दत्त जयंतीच्या शुभ दिनी या मालिकेत यल्लमाला साक्षात दत्तगुरूंच दर्शन होणार आहे.
Ude Ga Ambe serial updates datta jayanti special yallamma will get dattaguru darshan यल्लमाला गेल्या काही दिवसांपासून एक स्वप्न पडत आहे या स्वप्नात यल्लमाला रेणुकेच म्हणजेच तिच्या मैत्रिणीच मस्तक एका मुखवटात रूपांतरित होताना दिसत आहे. तिच्या मनाला वाटते की रेणुकीचं मस्तक मुखवटा बनला याचा अर्थ तिच्या जीवाला काही धोका तर नाही ना? यल्लमा पाड्यावरच्या शिवलिंगापाशी जाऊन महादेवाला मनातला प्रश्न विचारते. तेव्हा महादेव एका भिल्लाच्या रूपात भेटून दत्त जयंतीला एक गोसावी येऊन तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देईल असे मला सांगतात. Ude Ga Ambe
हा गोसावी म्हणजे साक्षात दत्तगुरु आहेत. यल्लमाला स्वप्नात दिसणारा माहूरगडावरील मुखवटा हा भविष्यात निर्माण होणाऱ्या शक्तीपीठांची नांदी असल्याचं दत्तगुरु सांगणार आहेत. या मुखवट्या मागे नेमकी कोणती गोष्ट घडली आहे याची माहिती ‘उदे ग आंबे’ Ude Ga Ambe मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला कळणार आहे.