Unseasonal Rain 2024 In Marathi : 26 आणि 27 डिसेंबरला राज्यात अवकाळी पाऊस

Unseasonal Rain 2024 In Marathi : 26 आणि 27 डिसेंबरला राज्यात अवकाळी पाऊस

Unseasonal Rain 2024 In Marathi : राज्यात गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील काही शहरांचे तापमान चांगलेच घसरले आहेत. काही भागात पाच अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. परंतु आता वातावरणात बदल होताना दिसत आहे. हिवाळीच्या थंडीत पाऊस पडताना दिसत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील थंडी कमी होत असून पावसाला पोषक असे वातावरण सध्या तयार झालेले आहे. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा कट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व- ईशान्य कडे दाब वाढणार आहे. राज्यांमध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे 26 आणि 27 डिसेंबरला राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Unseasonal Rain अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर बीड, परभणी, हिंगोली आणि अकोला मेघगर्जानेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, बुलढाणा, वाशिम मध्ये ही पावसाचा चांगलाच अंदाज दिसून येत आहे. Rain In Winter

राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार असून 26 ते 28 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 30 डिसेंबर पासून राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार आहे. Rain In Winter