Vasantrao Naik Loan Yojana 2024 In Marathi : व्यवसायासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज

Table of Contents

Vasantrao Naik Loan Yojana 2024 Information : वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनामराठी माहिती

Vasantrao Naik Loan Yojana  2024 देशभरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण मंडळी आहे जे सुशिक्षित असूनही त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळालेली नाही आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र त्यांना छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. मात्र यातील बहुतांश तरुणांची कुटुंबाची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांना स्वतःचा व्यवसाय भांडवल नसल्यामुळे सुरू करता येत नाही. राज्यातील भटक्या, विमुक्त जाती- जमाती व विशेष मागास वर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2024 Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana 2024 ची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुशिक्षित तसेच बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जाची रक्कम एक लाख रुपये असून त्यावर कुठलेही व्याज लागणार नाही म्हणजेच हे बिनव्याजी कर्ज असेल.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana उद्देश हा राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांतील तरुणांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे हा आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची Vasantrao Naik Karj Yojana सुरुवात केली आहे. तसेच या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यांना त्यांच्या स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश सरकारने ठेवला आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक नागरिकांना 1 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाईल तेही बिनव्याजी कर्ज असेल. Vasantrao Naik Loan Yojana

Vasantrao Naik Loan Yojana

ठळक मुद्दे :

वसंतराव नाईक कर्ज योजनेची थोडक्यात माहिती

Vasantrao Naik Loan Yojana In Short

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे उद्दिष्ट

Vasantrao Naik Karj Yojana Purpose

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे वैशिष्ट्य

Vasantrao Naik Loan Yojana Feature

वसंतराव नाईक कर्ज योजनेद्वारे करण्यात येणार आर्थिक मदत

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana

उद्योग सुरू करण्यासाठी कोणाला दिले जाते प्राधान्य

वसंतराव नाईक योजनेचे लाभार्थी कोण

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Benefisior

वसंतराव नाईक योजनेचे फायदे

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Benefits

वसंतराव नाईक योजनेसाठी तरुणांची निवड

वसंतराव नाईक योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची वसुली

वसंतराव नाईक योजनेअंतर्गत हे व्यवसाय सुरू करु शकता

वसंतराव नाईक महामंडळ योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Eligibility

वसंतराव नाईक महामंडळाचे अंतर्गतचे नियम व अटी

VJNT Loan Scheme Terms and Conditions

वसंतराव नाईक महामंडळ योजनेची आवश्यक कागदपत्रे

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Documents

वसंतराव नाईक महामंडळासाठी अर्ज प्रक्रिया

Vasantrao Naik Loan Scheme Online Application

अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत

Vasantrao Naik Loan Scheme Offline Application

FAQ’s

वसंतराव नाईक कर्ज योजनेची थोडक्यात माहिती

Vasantrao Naik Loan Yojana In Short

योजनेचे नाववसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग
लाभाची रक्कम1 लाख रुपये
उद्देशभटक्या, विमुक्त जाती-जमाती नागरिकांचा विकास करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttp://www.vjnt.in/

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे उद्दिष्ट

Vasantrao Naik Karj Yojana Purpose

  • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा Vasantrao Naik Mahamandal Loan  मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्गात प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक विकास करणे हा आहे.  
  • युवकांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.  
  • युवकांना स्वतःच्या पायावर उभे करणे.  
  • युवकांना आत्मनिर्भर बनवणे.  
  • युवकांचा आर्थिक विकास करणे.  
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्याचा औद्योगिक विकास करणे.  
  • भटक्या, विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.  
  • रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.  
Vasantrao Naik Loan Yojana

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे वैशिष्ट्य

Vasantrao Naik Loan Yojana Feature

  • Vasantrao Naik Loan Scheme वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भटक्या, विमुक्त जाती-जमाती, मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना त्यांचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • राज्यातील मागास प्रवर्गातील तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकार या तरुणांना आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देते.
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती तरुणांना आपल्या पायावर उभे करून त्यांना आत्मनिर्भर करणे हे Vasantrao Naik Loan Scheme या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
  • या माध्यमातून तरुणांचा सामाजिक आर्थिक विकास करणे.

वसंतराव नाईक कर्ज योजनेद्वारे करण्यात येणार आर्थिक मदत

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana

Vasantrao Naik Karj Yojana या योजनेच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमाती व मागास प्रवर्गातील तरुणांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी सरकारच्या वतीने एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. 1 लाख रुपयांपैकी 75 हजार रुपयांचे कर्ज पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात तरुणांना आपला व्यवसायासाठी दिले जाते व उर्वरित 25 हजार रुपयांची मदत दुसरा हप्ता प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्याच्या तीन महिन्यानंतर तुमच्या उद्योगाची जिल्हा व्यवस्थापकाच्या अंतर्गत तपासणी करून ही रक्कम दिली जाते. अशा पद्धतीने तुम्हाला सरकार एकूण 1 लाख रुपयांची आर्थिक मदत रोजगार सुरू करण्यासाठी देते.

उद्योग सुरू करण्यासाठी कोणाला दिले जाते प्राधान्य

VJNT Loan Scheme राज्यातील निराधार व्यक्ती, विधवा महिला, सरकारच्या कौशल्य विकास विभागामार्गत व सरकारी संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले आणि अनुभवी तरुण मुला-मुलींना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाते.

वसंतराव नाईक योजनेचे लाभार्थी कोण

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Benefisior

राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीतील व मागास प्रवर्गातील तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. तिचा लाभ या प्रवर्गातील सर्व तरुणांना घेता येतो.

वसंतराव नाईक योजनेचे फायदे

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Benefits

  • राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती व मागास वर्गातील तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहन करून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास या माध्यमातून होतो.
  • या प्रवर्गातील तरुणांचा जीवनमान सुधारण्यास या योजनेचा हातभार लागत आहे.
  • VJNT Loan Scheme योजनेच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल व त्यांचा आर्थिक विकासाबरोबरच औद्योगिक विकासही या माध्यमातून होणार आहे.
  • VJNT Loan Scheme या योजनेच्या माध्यमातून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज देण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच सरकारकडून देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी असणार आहे. पण बिनव्याजी कर्जासाठी तुम्हाला नियमित हप्ते भरणे आवश्यक आहेत.

वसंतराव नाईक योजनेसाठी तरुणांची निवड

Vasantrao Naik Karj Yojana

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या माध्यमातून लाभार्थी तरुणांची निवड करण्यात येते.

वसंतराव नाईक कर्ज योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा ही दिला जातो. उमेदवाराने कर्जाचे वेळेवर हप्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम त्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

Vasantrao Naik Loan Yojana

वसंतराव नाईक योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची वसुली

Vasantrao Naik Mahamandal Loan Yojana

या योजनेच्या माध्यमातून तरुणांना दिलेल्या कर्जाची परतफेड कर्ज वितरण केल्याच्या 90 दिवसानंतर सुरू करण्यात येईल. त्यानंतर लाभार्थ्याकडून कर्जाच्या परत फेडीच्या रकमेचे पुढील दिनांक चे आगाऊ चेक घेण्यात येतील.

लाभार्थी कर्जदाराने नियमित 48 महिन्यामध्ये 2085 रुपये याप्रमाणे कर्जाची परतफेड करावी.

नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्ज हप्ते थकीत होतील त्या रकमेवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येते.

लाभार्थीने कर्जाचे हप्त भरले नाही, तर वसुली न झाल्यास महामंडळाकडे ठेवलेल्या तारण जमिनीद्वारे कर्ज वसुली करण्यात येऊ शकते. त्यामुळे तरुणांनी उद्योग सुरू करताना घेतलेले कर्ज वेळेवर फेडणे आवश्यक आहे.

मागेल त्याला विहीर योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

वसंतराव नाईक योजनेअंतर्गत हे व्यवसाय सुरू करु शकता

Vasantrao Naik Scheme

मत्स्य व्यवसाय

संगणक प्रशिक्षण केंद्र

कृषी केंद्र

हार्डवेअर व पेंट शॉप

सायबर

कॅफे, चहाचा स्टॉल

सॉस प्राईज

विक्री केंद्र

झेरॉक्स

स्टेशनरी

आईस्क्रीम

पार्लर

मासोळी दुकान

भाजीपाला विक्रीचे दुकान

सलून ब्युटी पार्लर

मसाला उद्योग

पापड उद्योग

मिरची कांडप उद्योग

वडापाव गाडा

ऑटोरिक्षा

डीटीपीचे काम

स्वीट मार्ट

ड्राय क्लिअरिंग सेंटर

छोटेसे हॉटेल

टायपिंग इन्स्टिट्यूट

रिपेरिंग वर्कशॉप

मोबाईल रिपेरिंग

इलेक्ट्रिकल्स दुरुस्ती

फळ विक्री

किराणा दुकान

आठवडी बाजारामध्ये छोटेसे दुकान

टेलिफोन बूथ

अन्यतांत्रिक लघुउद्योग या माध्यमातून तुम्ही सुरू करू शकता यासाठी सरकार तुम्हाला कर्ज देते.

वसंतराव नाईक महामंडळ योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Eligibility

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जदार भटक्या विमुक्त जाती जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

वसंतराव नाईक महामंडळाचे अंतर्गतचे नियम व अटी

VJNT Loan Scheme Terms and Conditions

  • केवळ महाराष्ट्रातील तरुणांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • अर्जदार हा भटक्या विमुक्त जाती जमातीतील आणि विशेष मागासर्गी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्ड सिलिंग असणे ही गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक नसावे.
  • लाभार्थीने गैर कायदेशीर व्यवसाय केल्यास त्याला दिलेली आर्थिक मदत वसूल केली जाते व त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते.
  • अर्जदाराने नियमित कर्जाची परतफेड न केल्यास त्याला व्याज परतावा दिला जाणार नाही.
  • लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केल्याचे दोन फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला केवळ महाराष्ट्रातच व्यवसाय सुरू करावा लागेल इतर राज्यात व्यवसाय सुरू केल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे कुठल्या बँकेचे लोन थकलेले नसावे म्हणजेच थकबाकीदार नसावा.

वसंतराव नाईक महामंडळ योजनेची आवश्यक कागदपत्रे

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • फोटो
  • प्रतिज्ञा प्रमाणपत्र
  • डोमिसाईल सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • व्यवसाय उद्योग सुरू करणार त्याचे कोटेशन
  • बँक संबंधित माहिती
Vasantrao Naik Loan Yojana

वसंतराव नाईक महामंडळासाठी अर्ज प्रक्रिया

Vasantrao Naik Loan Scheme Online Application

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे

याबरोबरच तुम्ही संबंधित कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने ही जाऊन करू शकतात

अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी महामंडळाच्या किंवा अन्य महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा अन्यथा त्याचा अर्ज मंजूर केला जात नाही

या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येतो

या योजनेअंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू केल्यानंतर लाभार्थ्याने आपल्या व्यवसायाचा विमा स्वखर्चाने काढणे आवश्यक आहे. याबरोबरच दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

किंवा तुम्ही खालील दुसऱ्या पद्धतीने देखील ऑनलाइन अर्ज करू शकता

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करता येईल याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने पाहणार आहोत

टप्पा 1

वसंतराव नाईक कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे होम पेज उघडेल

होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला नोंदणी या पर्यायांवर क्लिक करायचे आहे

त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,

लाभार्थ्याची माहिती

फोटो अपलोड करणे

अर्जदाराचे संपूर्ण नाव

अर्जदाराच्या वडीलाचे अथवा पतीचे नाव

अर्जदाराच्या आईचे नाव

वय

लिंग

जन्मतारीख

मोबाईल क्रमांक

ई-मेल आयडी

जातीचा प्रवर्ग

जात

उपजात

पोट जात

पहिल्या टप्प्याची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा

टप्पा 2

दुसऱ्या टप्प्या मध्ये तुम्हाला तुमचा रहिवाशी संदर्भातील संपूर्ण माहिती भरावी लागेल. यामध्ये घर क्रमांक, रस्त्याचे नाव, गाव, विभाग, तालुका, जिल्हा, पिन कोड क्रमांक आदी माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज सेव करू शकता.

टप्पा तिसरा

यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा व्यवसायाचा बँकेचा तपशील संदर्भात माहिती भरावी लागेल. यामध्ये कौटुंबिक व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, व्यवसाय आधीच सुरू केलेला आहे का?, व्यवसाय स्थापित झाल्यास संस्था, गुंतवणूक, बँकेचे कर्ज, सहकारी कर्ज घेतले आहे काय, जमीन स्वतःच्या मालकीचे आहे का? दुकान आणि इमारत स्वतःच्या मालकीचे आहेत का, व्यवसाय भागीदारी आहे का, व्यवसाय निवडायची कारणे, व्यवसाय संबंधित परवाना, बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, आयएफसी कोड, तसेच कर्जाचे प्रकरण प्रस्तावित करणाऱ्या बँकेचे नाव, व्यवसाय करता आवश्यक कर्ज भांडवल वरील सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.

टप्पा चौथा

यामध्ये तुम्हाला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती भरायची आहे. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्माचे प्रमाणपत्र, व्यवसाय कोटेशन इत्यादी माहिती भरून अर्ज सबमिट करू शकता.

टप्पा पाचवा

तुमच्या समोर असलेल्या घोषणापत्र यावर क्लिक करून तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करावे. तुम्ही भरलेली संपूर्ण माहितीची प्रिंट काढून घेणे, अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि शेवटी सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करावा.

अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत

Vasantrao Naik Loan Scheme Offline Application

अर्जदाराला प्रथम आपल्या जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागात जाऊन वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रति जोडाव्या.

त्यानंतर अर्ज एकदा चेक करून संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री करून अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा पद्धतीने तुम्ही वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा ऑफलाइन अर्ज भरू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s

प्रश्न: वसंतराव नाईक कर्ज योजना म्हणजे काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सरकारच्या वतीने एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

प्रश्न: वसंतराव नाईक कर्ज योजनाचे लाभार्थी कोण?

उत्तर: राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व मागासवर्गीय समाजातील बेरोजगार तरुण या योजनेचे लाभार्थी आहेत.

प्रश्न: वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा लघुउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या वतीने एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

प्रश्न: वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

प्रश्न: वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी पात्र कोण?

उत्तर: विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील तरुण या योजनेसाठी पात्र आहेत.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA