Universal Pension Scheme 2025 Information In Marathi : स्वतःचा व्यवसाय असो की खाजगी नोकरी प्रत्येक भारतीयाला मिळेल युनिव्हर्सल पेन्शन?
Universal Pension Scheme : केंद्र सरकार देशात लवकरच युनिव्हर्सल पेन्शन योजना लागू करण्याची तयारी करत आहे. ही योजना आल्यानंतर सर्व नागरिकांना पेन्शन दिली जाणार आहे.
Universal Pension Scheme तो व्यवसायिक असो, खाजगी नोकरी करणारा असो किंवा स्वतःचा व्यवसाय करणारा असो किंवा कुठलेही काम करणारा प्रत्येक व्यक्तीला या योजनेअंतर्गत फायदा देण्यात येणार आहे.
Universal Pension Scheme नवीन युनिव्हर्सल पेन्शन योजना सुरू करण्यामागील सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे हा आहे.
Universal Pension Scheme एका अहवालानुसार सरकारने लेबर मिनिस्ट्री कामगार मंत्रालया अंतर्गत या योजनेचे प्रपोजल डॉक्युमेंट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या नवीन योजनेअंतर्गत सरकार विविध प्रकारच्या योजनांचा यामध्ये सहभाग करण्यासाठी एक युनिव्हर्सल पेन्शन योजना बनवत आहे. ज्याचा लाभ देशातील सर्व कामगारांना कसा देता येईल यावर काम सुरू आहे.
कोणाला मिळेल फायदा
Universal Pension Scheme Benefits
या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सूत्रानुसार 18 वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती आणि 60 वर्षानंतर ज्याला पेन्शन पाहिजे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
सरकार ही योजना ईपीएफओ द्वारे सुरू करण्याचा विचार करत आहे.
का सुरू केली जाते योजना
Universal Pension Scheme
संयुक्त राष्ट्र च्या इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार 2036 पर्यंत भारतातील वृद्धांची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के जवळ पास असेल असा अंदाज आहे, तर 2050 पर्यंत हा आकडा 20 टक्क्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सरकारला ही योजना आणणे आवश्यक आहे. अमेरिका, युरोप, चीन, कॅनडा, रशिया सारख्या देशांमध्ये अशा प्रकारची पेन्शन योजना यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारतही अशा प्रकारची योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
जुन्या योजनेपेक्षा नवीन योजना मध्ये काय बदल आहेत
Universal Pension Scheme आता सध्या एम्पलॉइज प्राइवेट फंड सारख्या योजना आहेत. त्यामध्ये सरकार आणि कंपनी दोघांकडून पैसा टाकला जातो मात्र येणाऱ्या नवीन न्यू पेन्शन योजना मध्ये सरकार कुठल्याही प्रकारची योगदान देणार नाही ही योजना संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती पैसा यामध्ये जमा करू शकता त्यानुसार तुम्हाला पेन्शन मिळेल. नॅशनल पेन्शन स्कीम ला रिप्लेस करणार आहे. नवीन स्कीम सध्या सुरू असलेल्या नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस ला रिप्लेस नाही करणार नवीन स्कीम तुम्हाला एक नवीन सुरक्षित पर्याय देईल त्यापैकी तुम्ही कुठलाही एक निवडू शकता.
पूर्वीपासूनच सुरू आहे ही योजना
Universal Pension Scheme असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने यापूर्वीच पेन्शन योजना सुरू केली आहे. यामध्ये अटल पेन्शन योजना यामध्ये 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1000 ते 1500 रुपये पेन्शन मिळते. तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ट्रीट वेंडर्स घरकामगार मजूर फळांसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी पण सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना 3000 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते.