Ladki Bahin Yojana eKYC Update In Marathi : लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाही तर सरकारचा दोष नाही, ही तुमची चूक, जाणून घ्या कसे…

Ladki Bahin Yojana eKYC Update In Marathi : लाडक्या बहिनींनो काळजीपूर्वक करा eKYC

Ladki Bahin Yojana eKYC Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून सतत सांगितले जात आहे की, लाडक्या बहिणींनी या योजनेचा अंतर्गत 1500 रुपये मिळवण्यासाठी आपली ई-केवायसी अवश्य करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही ई-केवायसी प्रक्रिया दोन महिन्यामध्ये करण्याचे आवाहन केले आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Update In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून 18 सप्टेंबरला आदेश जारी करण्यात आला, नंतर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी 2 महिन्यात सर्व महिलांनी ई- केवायसी करण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्रातील महिलांनी Mukhyamantri Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करावी, असे आवाहन केले. सरकारकडून वारंवार अपील करूनही जर कोणी ई-केवायसी नाही केली तर पैसा नाही मिळाला म्हणून दोषी कोण असेल पात्र महिला की सरकार?

दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून सप्टेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता नुकताच जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून लाडकी बहीणीचा हप्ता जमा करत असल्याचे सांगितले होते. Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. योजनेची संबंधित पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे.

ई-केवायसी करणे बंधनकारक

Ladki Bahin Yojana eKYC Update In Marathi

राज्यातील पात्र लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी करावी. महाराष्ट्रातील महिला व बहिणीच्या विश्वासावर सुरू झालेली आणि क्रांतिकारक यशस्वी झालेली ही योजना आहे. ही योजना अशीच सुरू राहण्यासाठी तत्काळ आपण ई-केवायसी करणे आवश्यक असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. आमच्या सर्व लाडक्या बहिणींना आग्रहाचे आव्हान आहे की आपण लवकरात लवकर म्हणजे दोन महिन्याच्या आत ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून तुम्हाला तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता उपलब्ध होत राहील.

आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी

Ladki Bahin Yojana eKYC Update

18 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आवश्यक अपडेट समोर आले. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्हेरिफिकेशन आणि अथेंटिकेशनसाठी करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते, लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

आधार अथेंटिकेशन का आवश्यक?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार (आर्थिक आणि अन्य सबसिडी लाभ आणि सेवा) अधिनियम 2016 कलम 7 अंतर्गत 1 ऑगस्ट 2024 एका सरकारी नोटिफिकेशन काढण्यात आले होते. यानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आधार नंबर प्रमाणीत करणे आवश्यक आहे किंवा आधार अथेंटिकेशन करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाने युआयडीएआय नेsub aua/sub kua तुला नियुक्त करण्यात आले म्हणून या विभागाद्वारे योजनेसाठी पात्र महिलांची तपासणी आणि ई- केवायसी माध्यमाद्वारे आधार अतंटिकेच्या केले जात आहेत.

प्रत्येक वर्षी करावी लागेल ई-केवायसी

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसी करणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 2025-26 मध्ये सरकारीने दोन महिन्यात लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर लाभार्थी महिलांनी या काळामध्ये आधारा अथेंटिकेशन नाही केले तर त्या पुढील लाभ घेण्यास महिला पात्र नसतील.

अशी करा लाडक्या बहिणीची केवायसी

Ladki Bahin Yojana eKYC Process

Ladki Bahin Yojana e-KYC Process सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर e-KYC बॅनर हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतरही केवायसी फॉर्म उघडेल.

त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि capcha कोड नमूद करावा लागेल.

त्यानंतर send OTP या बटनवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

तो ओटीपी तिथे टाकून सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही हे समजेल. त्यामध्ये जर आधीच तुमची केवायसी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला ‘ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे’ असा मेसेज येईल.

जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला तुम्हाला जाता येईल

यानंतर लाभार्थ्यांनी पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक तसेच कॅपच्या कोड नंबर करावा

त्यानंतर सेंड ओटीपी यावर क्लिक करावे

ओटीपी संबंधित मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाकून सबमिट या बटनवर क्लिक करावे

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणेच कराव्या लागतील.

1 माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून शासकीय /विभाग /उपक्रम/ मंडळ /भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2 माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्स वर क्लिक करावे आणि सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. शेवटी ‘तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’. असा संदेश तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.