Devendra Fadnavis Budget Statement In Marathi : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं

Devendra Fadnavis Budget Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली संपूर्ण माहिती

Devendra Fadnavis Budget Statement In Marathi : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये महाराष्ट्र साठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

Devendra Fadnavis Budget Statement : या अर्थसंकल्पात सरकारने 53.5 लाख कोटी रुपयांच्या एकूण खर्चाचा आराखडा मांडला आहे. पायाभूत सुविधा संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. केंद्राच्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

What Maharashtra gets from union Budget 2026 अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला काय मिळाले याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई आणि मेट्रो साठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला विकसित भारताकडे नेणारा दमदार अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारे हे अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करून उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपायोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींचे गुंतवणूक, शेती, पशुपालन मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. असं फडणवीस यांनी सांगितले.

Lakhpati didi Yojana लखपती दीदी योजने संदर्भात देखील महत्त्वाची बातमी आली आहे. लखपती दीदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वस्तीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल.

मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडोरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रुपहबसाठी 5000 कोटी प्रत्येकी पाच वर्षात मिळणार आहेत. त्याचा लाभ मुंबई महानगर, पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. विकसित भारताकडे नेणारे हे अर्थसंकल्प आहे. औद्योगिक सवलतीमुळे मोठा फायदा होणार आहे. उद्योग गुंतवणुकीचा आपल्याला फायदा होणार आहे.