PM Rahat Scheme 2026 In Marathi : रस्ते अपघात झाल्यास होणार मोफत उपचार मोदी सरकारचे मोठे गिफ्ट
PM Rahat Scheme : नवीन पंतप्रधान कार्यालय सेवातीर्थ मधून मोदी सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता रस्ते अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर पैसे जमा करावे लागणार नाहीत. सरकार 1.5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस मोफत उपचार देणार आहे.
PM Rahat Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पीएम राहत योजना सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा मोफत पुरवली जाणार आहे.
PM Rahat Yojana ही योजना रस्ते अपघात पिढीसाठी वरदान ठरणार आहे. अपघातात जखमी झालेल्यांना 1.5 लाख रुपयांचे कॅशलेस उपचार देण्यात येणार आहेत.
या योजनेची घोषणा करत असताना रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले की देशात दरवर्षी अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत न मिळवल्यामुळे अनेकांचे प्राण जातात.
जखमींना पहिल्या तासात रुग्णालयात दाखल केले तर यातील 50 टक्के मृत्यू कमी केले जाऊ शकतात असे एका अभ्यासातून समोर आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
PM Rahat Yojana देशभरामध्ये दरवर्षी 4.5 लाखाहून अधिक रस्ते अपघात होतात, तर दररोज 1200 ते 1500 अपघात होतात. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होतो. अनेक वेळी जखमींना वेळेवर उपचार मिळत नाहीत म्हणून त्यांचा जीव जातो. मात्र आता तसे होणार नाही, कारण केंद्र सरकारने कॅशलेस सुविधा सुरू केलेली आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. पीएम राहत योजना यासाठी वरदान ठरणार आहे.
शनिवारी पंतप्रधान कार्यालय ‘सेवातीर्थ’ येथे हलवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यालयातून पीएम राहत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना 1.5 लाख रुपये पर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अनेक अभ्यासातून समोर आले आहे की, रस्ते अपघात झाल्यानंतर वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने वैद्यकीय मदत न मिळाल्याने कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी राहत योजना सुरू केलेली आहे.
पीएम राहत योजनेअंतर्गत 112 या आपतकालीन नंबर वर कोणीही कॉल करून संबंधित अपघाताची माहिती जवळच्या नियुक्त रुग्णालयात देऊ शकतात आणि रुग्णवाहिकाची मदत मिळू शकते. यामुळे जखमींच्या जीव वाचण्यात मदत होऊ शकेल.
112 कॉल करताच मिळेल जवळच्या रुग्णालय आणि ॲम्बुलन्सची माहिती
PM Rahat Yojana In Marathi
PM Rahat Yojana In Marathi गंभीर अपघाताच्या प्रकरणांमध्ये प्राथमिक उपचार 48 तासापर्यंत आणि गैर गंभीर प्रकरणामध्ये 24 तास उपलब्ध असणार आहे. मंत्रालय च्या अधिकृत माहितीनुसार अपघातामधील जखमी व्यक्ती सोबतचा व्यक्ती किंवा आजूबाजूला उपस्थित असलेल्या कुठलाही व्यक्ती 112 नंबर वर कॉल करून जवळच्या रुग्णालय आणि ॲम्बुलन्स ची माहिती प्राप्त करू शकतो. यामुळे इमर्जन्सी टीम पोलीस आणि रुग्णालय दरम्यान वेगाने समन्वय होऊ शकेल आणि जखमींना लवकरात लवकर उपचार उपलब्ध करून देण्यात येऊ शकते.
पीएम राहत योजना म्हणजे काय
पीएम राहत योजनेअंतर्गत रस्ते अपघातील जखमी व्यक्तीला 1.5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देणे हा आहे आणि तत्काळ वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये.
जखमीला असा मिळेल उपचार
- गंभीर नसलेल्या प्रकरणांमध्ये जखमीला 24 तास पर्यंत स्टॅबिलायझेशन ट्रीटमेंट दिली जाईल.
- गंभीर प्रकरणांमध्ये हा अवधि 48 तासापर्यंत असेल.
- उपचारावर होणारा संपूर्ण खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.
रुग्णालयाला मदत कशी मिळेल
उपचारानंतर संबंधित रुग्णालय डिजिटल माध्यमातून प्लॅन दाखल करू शकते आणि सरकारद्वारे याला मंजुरी देण्यात येईल. जखमी व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता राहणार नाही.
पीएम राहत योजना साठी या गोष्टी ठेवा लक्षात
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक नाही.
- तुमचा विवाह स्नेही आवश्यक नाही.
- तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र असणे हे आवश्यक नाही.
- सर्व नागरिकांसाठी ही योजना समान पद्धतीने लागू असेल.
- या योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांचे उपचार केले जातील.
- या योजनेतून 7 दिवसापर्यंत उपचार ची सुविधा देण्यात आली आहे.
- केवळ यादीतील रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार दिले जातील दीर्घकाळ उपचारासाठी अतिरिक्त फंड लागण्याची आवश्यकता आहे.